तुझा देव मला माफ करणार नाही …

तुझा देव मला माफ करणार नाही …

तुझा देव मला माफ करणार नाही …

” हृदयाशी , इथे ठेवतोस ना सगळं ” 

काही दिवसापूर्वी एका सुखद क्षणा प्रसंगी , खेळकरपणाने पण अगदी मनाच्या तळा गळातून मला संबोधलेलं हे तिचे वाक्य , हृदयाशी अगदी घर करून आहे.

क्षण वाऱ्यानिशी बदलतात . तसा माणूस हि एकाकी बदलतो. 
परिस्थितीशी झुंजाता झुंजता … 
पण तेंव्हा त्याच्या स्वभावात अन वागण्यात झालेला थोडाअधिक बदल हि आपल्या रुची पडत नाही. मस्तकात त्या गोष्टी जाताच नाही म्हणा …झालेला बदल हा आपल्याला अनपेक्षित असतो .

आपल्याला हवी असलेली, अभिप्रेत असलेली व्यक्ती कालाओघात , परिस्थितीशी दोन हात करत अशी बदलेली असते. तेंव्हा त्या बदलेल्या मनाशी नव्याने जुळवून घेताना आपल्या मनाची सुरु असलेली वारेमाप धडपड समोरचं मनं हि हेरावून घेतं  .

पण हवा तसा प्रतिसाद देत नाही. का ? त्याचं कारण हि कळत नाही.

आपलं मनं मात्र अशावेळी पूर्वीच्या सोनेरी क्षणासोबत विरघळून जातं . आत्ताचे हे क्षण अन पूर्वीचे ते क्षण ह्यात तुलना   करत….

पण एखाद दिवशी कुठे कधी अवचित भेट घडते.
अन नकळत काही शब्द नव्याने मनावर छाप उमटवून जातात . अन झाले गेलेल्या गोष्टी नकळत मनातून पुसल्या जातात . मनातला रोष – रुसवा कुठल्या कुठे निघून जातं.

असेच काही शब्द , वाक्य मनावर कोरले गेले….
त्यादिवशी ..हळुवार हृदयाशी बिलगत …..‘तुझा देव मला माफ करणार नाही’

” हृदयाशी , इथे ठेवतोस ना सगळं”…

प्रेमाचा एक शब्द अन मायेचा एक स्पर्श हि पुरेसा असतो …मनातला रोष – रुसवा घालवून देण्यासाठी …
आनंद फुलविण्यासाठी…

‘ तुझा देव मला माफ करणार नाही ‘ ह्या तिच्या वाक्यावर माझं इतकंच म्हणन आहे.

माझा देव विशाल मनाचा आहे …तो का नाही माफ करणार … नाहीच माफ केल तर मी आहेच तडजोड करायला .

असंच लिहिता लिहिता..

नातं तुझं माझं ..

संकेत पाटेकर

१२.१०.२०१४

Leave a Reply

Your email address will not be published.