ती मी आणि हा …बेधुंद पाऊस | Marathi Lekh | Sanket Patekar

BharatMatrimony® - Trusted Matrimony, Shaadi App

Install now

ती मी आणि हा …बेधुंद पाऊस | Marathi Lekh | Sanket Patekar

पावसाचं आता आगमन होईल . तशी चिन्ह हि दिसू लागलीत.
जीव सृष्टी त्याचा आगममाने आनंदाने मोहरून जाईल. 
प्रेम कविता उदयास येतील.
अनामिक ओढीनं आणि हुरहुरीने एखाद नातं हि पावसाच्या सरीत चिंब होत …जवळ येईल.
नव्या आयुष्याला इथूनच सुरवात होईल.
अश्याच …आशयाची हि एक गोष्ट. 
एक प्रयत्न … 🙂 😀

ती…मी आणि हा बेधुंद पाऊस :

ग्रीष्म ऋतू ने इंद्रलोकी निरोप धाडला आणि वर्षा ऋतू चाल धरून भू धर्तीवर आवेगाने बरसू लागली.
उन्हाच्या काहिलीने आधीच कालवटलेलं अंग वर्षा ऋतूच्या आगमनानं मोहरलं जाऊ लागलं.
चला भटक्याहो , चला ..मनानं मनालाच आवताण धाडलं .
निसर्गाच्या जादुई रंगसाधनेला आता खरी सुरवात झाली.
बदल घडू लागला.

मातीला मायेचा कोंब फुटला. मृदगंध आसमंती झाला . हिरविशार सृष्टी.. साज शृंगारात नटू- धटू लागली.
डोंगर दऱ्या सुखावू लागल्या . जलप्रपातांचा तर अगणित सोहळाच सुरू झाला . लहान सहान भावंडं (धबधबे ) मिळून खेळ रंगवू लागली .
आभाळी , इंद्रधनू ने हि आपलं सप्तरंग उधळायला सुरवात केली .
दिशा दिशा त्यानं मोहित संचित झाल्या. आनंद कैकपटणे वाढीस लागला . वाढीत व्होता
कारण पाऊस जो सुरु झाला होता.

पाऊस , हृदयी ठाव घेणारा…
पाऊस आनंदी आनंद मिळवून देणारा ..

वर्षा ऋतूच आगमन होऊन आता महिना उलटून गेला. फिरतीचे वारे पुन्हा जोमानं वाहू लागले. पुन्हा नव्याचा डाव सुरु झाला
ये , आपण जाऊया का कुठेतरी ?
कुठे ?
कुठे हि , तू सांग ? फक्त जवळ नको , दूर असं कुठेतरी ?
आपण दोघेच ?
हो ?
तुझी बाईक काढ, आपण दोघेच जाऊ ?
ओह्ह….How romantic ..! मनातल्या मनात तो सुखावू लागला. नजरेशी ते क्षण आठवू लागला.
ती मी आणि हा बेधुंद पाऊस …अहा….!

पाऊस माझा जीवाचा दोस्त रे…
पाऊस हृदयात बरसतो रे ..

ठीकाय ?
कधी जाऊया ?
उद्या ?
आईंग..लगेच ? अजून काही प्लान नाही , कश्यात काही नाही आणि ?
मग कर ना प्लान ? एकदिवसाच तर प्रश्न आहे आणि मला जायचंच आहे, समजलास ?
ठीकाय , पण सुट्टीच काय ?
त्यात काय , दांडी..
बरं …त्ये हि ठीक , पण तुझं ? घरी काय सांगशील ?
किती रे प्रश्न ?
सांगेन , मैत्रिणीसोबत बाहेर जातेय पिकनिक ला , येईल संध्याकाळी परत, ऑफिसला काय दांडी ?
वाह वाह , हे बरंय हं ?
पण खरं काय कळलं तर ?
काय नाय कळणार रे , तू ठरव काय ते पटकन .
हं , येडं,
पण मला घरी सांगावं लागेल ? कुणासोबत कुठे चाललोय ते.
ओके , बघ काय ते ,
बघतो …आमच्या वडील बंधूंना विचारून ? काय म्हणतायेत ,
आणि कळवितो तुला..
बरं ,
मी वाट बघतेय ..हं
हं ठीकाय …
आणि लवकर काय ते ठरव .
हो बाई …
हं …

अ अ …
दादा ,
हा बोल…
मी उद्या आपल्या गावी निघतोय , आपल्या गावी म्हणजे पाली ला , बल्लाळेश्वर गणपती दर्शन ..आणि जवळची थोडीफार भटकंती, आपली बाईक घेऊन ,
हा , ठीकाय ,
पण उद्या तर गुरवार आहे ना ?
मध्येच काय ?
हा ..
हा काय ?
कोण आहे सोबत , कुणासोबत ?
अ अ …ते , त्ये नाही का ..मी.. मी बोललो होतो . ते.. ते तिच्याबद्दल
कोण ? काय ते स्पष्ट बोल .
ते ..तिला ..नाही का , लग्नाचं विचारलं होत …
कोण..

अच्छा , साहेबांचा तिच्यासोबत प्लान चाललंय तर
हा ..
ती कशी काय तयार झाली पण ? वहिनीने मध्येच सवाल टाकला ?
जाऊ का ?
ठीकाय , जा…पण गाडी हळू ने.
हो ,

Yessss..Yesssss , मनातल्या मनात, दादाकडून परवानगी मिल्याने तो खुशीतच नाचू लागला.
(नकळत धावून येणारे हे असे सुखाचे क्षण, आपल्याला उधळून देतात , सारं मी पण विसरून …)
त्या आनंद भरात त्याने तिला फोन लावला.
हॅलो ,
हा बोल ..
काय ठरलं ?
तर ऐक, आमच्या वडील बंधूंनि आम्हास म्हणजे आपल्याला परमिशन दिलेली आहे .आपण जाऊ शकतो.
आणि आपण माझ्या गावी निघतोय , उद्या … पाली ला..अष्टविनायक मंदिर ,बाप्पाचं दर्शन.
आणी तिथून जवळच असलेल्या लेणी , त्यांना भेट देऊन रात्रीपर्यंत घरी..
ओके …
ओके चालेल .
पण मला चिंब भिजायचंय हं ?
हं ,आहेत ग , ओहोळ नदी वगैरे , चिंब भिजायला आणि डुबायला हि , सोबत पाऊस हि असलेच
हं ,
बरं , काय काय घेऊ आणि किती वाजता निघायचं ?
एक जोड घे कपड्यांची आणि विंड चीटर हि घेऊन ठेव . पहाटे लवकर निघू ,
पण किती वाजता, किती वाजता निघायचं .
पाच एक वाजता निघ . मी मुलुंड स्टेशनला तुला पिकअप करेन. तिथून निघू
ओके
ठरलं तर मग …
हा ..
मज्जा नु लाईफ …

चल मी कॉल करते तुला संध्याकाळी .
हा ठीकाय .

आयुष्यात येणारे पहिले वाहिले क्षण …एक वेगळाच अनुभव जोडून देतात आपल्याला.
त्याचा सुगंध काही वेगळाच असतो. भारलेला , कायम स्मरणात उरणारा …आणि स्मित हास्य जोडून देणारा …

तो हि त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहू लागला.

ती मी आणि हा …बेधुंद पाऊस | Marathi Lekh | Sanket Patekar

सांजवेळ पुढं होंऊ लागली आणि रुणझुणत्या पाऊस सरीनं वातावरण भाव मुग्ध होंऊ लागलं.
सुखावणारा गारवा सर्वत्र पसरला गेला. कांदा भजी आणि चहाचा बेतानं मुद्दामहून उकल घेतली.
टपरीवरचा चहा हि संमोहित करू लागला.
”ये..चल , मस्तपैकी , कांदा भजी खाऊ …गरमागरम ” विथ कटिंग …त्ये बघ तिथं आहे.
ऑफिस मधून बाहेर पडतानाच मित्राने आपली इच्छा प्रकट केली.
”नाही रे, आज नको, थोडी घाई आहे, मग बघू ”
” ओके, ओकेय, पण माझी इच्छा आहे ब्बा आणि ती मी मोडणार नाही. ”
बरं ,
” कसंय, जिथं आणि जेंव्हा जेंव्हा शक्य आहे आणि आपल्याला सहज जमणार आहे, स्वतःच्या आपल्याच इच्छा पूर्ण करणं ,
तिथे आपण आपल्याच मनाला बांधून ठेवू नये. मोकळं करावं, करून घ्यावं ”
काय म्हणतोस ?
”हो हो , अगदी बरोबर आहे तुझं ”
आणि हे खाण्याच्या बाबतीत तर नाहीच. तडजोड नाहीच नाही.
हा ,
” चल …मी खाऊन घेतो, तू हो पुढे ”
” ओके बॉस , मी निघतो. भेटू मग ..”
”हा , बाय …”
बाय…
कलिगला निरोप देत तो पुढे होंऊ लागला.
रस्त्याला रस्ता जोडू लागला. पायवाट मोकळी होऊ लागली.

जिथं नजर जाईल तिथे सगळं लक्ख आणि उठून दिसत होतं . पावसानं सगळंच शुचिर्भूत झाल्यासारखं झालं होतं. वाहनं ,उंच इमारती, दुकानाची छपरं , बैठ्या चाळीतली घरं, ठीक ठिकाण्यावर असणारी मोजकी झाडं आणि छत्री नं बाळगलेली माणसं देखील पाऊस सरीत चिंब न्हाऊन निघाली होती . प्रसन्नतेचा गंध मनभर दरवळा जात होता .
त्यात गाण्याच्या ओळी अधून मधून मुखाशी नाचून गात होत्या..
” छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा ”
”गोड आहेस ग तू …. हसरं काळीज माझं ” मनाची शुद्ध हरपली होती .
चालत चालता पुन्हा पुन्हा नजरेशी तेच तेच क्षण उभे राहात होते. ” उद्याच्या स्वप्नं वटीतले.. ”
कसा असेल उद्याचा दिवस ? ती मी आणि हा पाऊस…
ते एकूणच रोमहषर्क क्षण …?
आठवणीनेच तो शहारला जाई. उत्कंठा आता तर क्षणो क्षणी वाढीस लागली होती.
अवघ्या क्षणांची काय ती प्रतीक्षा , बस्स…
नजरेतील स्वप्नं सत्यात उतरायला अवकाश काय तो ..
तो झपाझप पुढे होऊ लागला.

मनाचं गायन अद्यपही सुरुच होतं . पाऊलं चालतच होती. दादर इतक्यात आलं देखील , कसं काय ? त्याचं त्यालाच नवल वाटलं.
आपण इतके व्यापून गेलोत उद्याच्या क्षणात , हुश्श ,
त्याने स्वतःला जागवलं .. धावत्या गर्दीतून माग काढत तो पुढे सरला आणि ठाणे लोकल पडकली .
पुढचा अर्धा पाऊण तासाचा प्रवास सुरु झाला .
आणि तो संपला देखील .

ठाणे आलं. तसा प्लॅटफॉर्म वरून बाहेर पडत तो स्टेशन बाहेर पडला.
पावसाची रिमझिम अद्यापही सुरूच होती. अंधारून आलं होतं.
घरी जाऊन आपल्याला तयारी करायची आहे. काय नाय ते बघायचंय .ह्यासाठी लवकर गेलं पाहिजे .
ह्या विचारात तो पटपट पाऊल टाकू लागला.
रस्ते वळणे घेतच होती . त्यातच
नेहमीचाच ‘मन सुखावणारा’ रस्ता दाखल झाला .
दुर्तफा झाडीने गर्द व्यापलेला , फारशी रहदारी नसलेला , मनमोकळा एकांत मनाला पुरवणारा हा रस्ता , आज वेगळ्याच अंगानं तरारून आल्यासारखं भासत होता त्यात गाण्याची नशा अजून पाठ सोडत नव्हती .
तंन- मन आनंदात न्हात होतं. गात हि होतं…. गाणं ओठाशी झुलत होतं .
”एक मैं और एक तू ,
दोनों मिले इस तरह , और जो तन मन में हो रहा है…”

खिशाआतला मोबाईल तितक्यात खणखणू लागला. .
”लागिरं लागिरं झालं जी ..त्याचा ध्वनी सर्वत्र उमटला गेला.

हॅलो ,
हा बोल .
कुठे आहेस ?
पाच एक मिनिटात घरी पोहचेन ?
आणि तू ?
मी पोहचली केंव्हाच …
अच्छा , छानच कि …
झाली तयारी ? घेतलं सगळं ?
हा, त्याब्ब्दलच बोलायचं आहे .
बोल न ?
उद्याचं आपण ….
इतकं वाक्य ऐकूनच , त्याचा श्वास रोखला गेला.
हि नाही तर म्हणणार नाही ना ?

ती मी आणि हा …बेधुंद पाऊस | Marathi Lekh | Sanket Patekar 

क्षणभर त्याचा श्वास रोखला गेला.
हृदय आतुरत्या आवाज ओढीनं धाकधूक करू लागलं.
हे स्वप्नं सत्यात आणायचं कि नाही हे आता सर्वस्व तिच्यावर होतं. तिच्या एका ‘हो’ आणि ‘नाही’ वर..
बोल…”
झाली तयारी ? घेतलंस सगळं ?
हा, त्याबद्दलच अरे बोलायचं आहे .
बोल नं ?
उद्याचं जाणं ….Cancel केलं तर ?
कायssssss ?
हृदयावर आघात व्हावा तसा त्याचा चेहरा त्या वाक्यानं कळवळला गेला.
सुट्टी नाही मिळत आहे रे , ऑफिसला जावं लागेल ?
ऐकतोयस का ?
हॅलोsss ?
इतका वेळ, आत दडून बसलेली, शांतता ही त्यावर शेवटी खदखदून हसली. आणि क्षणभरात, क्षणांसाठी भावनासकट शब्द हि मूक-अंध झाले.
स्वप्नांचा पाऊस … बरसण्याधीच आधीच ठप्प्प झाला.
ऐकतोयस का ?
हा..
सॉरी …
ठीकायं …
रागावलास ?
नाही..
खरं बोल ..?
रागावलास ना..?
नाही गं …
रागावून काय करू ? आणि काय मिळणार ?
जे आहे ते आहे …चालतंय,
वादळी वावटळीसारखं त्याच्या मनाची अवस्था झाली होती. चलबिचलता वाढली होती. पण तरीही त्याने स्वतःला कसंबसं सावरून घेतलं.
सॉरी रे….
खरंच ….माझी मनापासून इच्छा होती.
पण ,
ठीकायं… नं,
असू दे आता …जाऊ पुन्हा कधी…
मला माहित्ये ? तू रागावला आहे माझ्यावर ?
नाही..
हो..
नाही ग बाबा ..सांगितलं ना ?
मग रागाव ना माझ्यावर ..येडपट
हे काय आता नवं ?
मी नाही म्हणत आहे आणि तू काहीच बोलत नाही आहेस.
नुसता , ठीकाय ठीकाय.. चालतंय ,
असं असतं का कुठे ?
बोल ना..जायचंच म्हणून.. .गुस्सा हो माझ्यावर .. शब्दांचा मारा कर , ओरड ..
माझा स्वभाव तुला माहित्ये ना ?
म्हणूनच म्हणतेय ?
मी नाही म्हणत असताना , तुझ्याकडून मला हे असं अपेक्षित नाही.
मग काय अपेक्षित आहे?
तू भांडावस , मला राजी करावंस ? येण्यासाठी भाग पाडावस..
हे काय आता ?
तूच म्हणालीस , सुट्टी नाही आहे मिळत आहे म्हणून…?
आणि आता …?
त्येच तर ..
”मी शुद्ध खोटं बोलले हे हि तुला खरं वाटलं ” ?
काय ?
हीहीहीही ,
तू हे काय बोलतेस ?
मी खोटं बोलले , नाही जमणार म्हणून …
तू येडी आहेस काय गं ?
हो ..
येडपट
मला ना ..तुझा आता जीव घ्यावासा वाटतोय, हू ..
हाहाहा …
हैच तर मला हवं होतं . भांड तू…भांड .. भारी वाटतंय बघ ? तूला रागावलेलं मी पाहिलं नाही. पाहायचं मला..
तू भेट ग आता …बघतोच तुला .. सोडणार नाही.
तुझ्या नाही बोलण्याने, माझी काय अवस्था झाली असेल माहित्ये तुला ?
आयुष्यातले हे असे पहिले वाहिले गोजिरे क्षण …अनुभवयाला मिळणार म्हणून किती आनंदात होतो . मस्त आपण दोघे आणि आपला प्रवास..
क्षणात पाणी फेरलंस त्यावर ,
उद्या सुट्टी नाही आहे , नाही जमणार …ह्यावं त्यावं बोलून ,
सॉरी बाबा ? माफ कर , त्ये तर जरा असंच ..
चल कान पकड आता ?
कोणाचे ?
अssssssss, नाटकी नको करू,
बरं बरं ,
पण , मग रे , बोलणार कशी मी ?
आणि मोबाईल कोण धरणार ?
बरं , राहू दे, भेटच तू आता .. हिशोब चुकता करून घेईन.
आता सोडतोय.
हाहाहा ..
कर कर तुझा हिशोब चुकता कर..
भेटू उद्या..
ठीकाय .
ठीक , पहाटे साडे पाच वाजता , मुलुंड स्टेशन…ओके ..?
येस ..
वेळेत ये …?
हो बाई ..
बाई नाही. लग्न झालंय का माझं ?
तुला पण डिवचलं पाहिजे ना जरा ..मला एवढं पिडलंस त्ये,
हू.., चल भेटू उद्या…
byeeee…ssssss
ह, भेटू
byeeee…ssssss
मनातलं पाखरू पुन्हा आनंदाने भिरभरु लागलं . उद्याची नवी स्वप्नं घेऊन ,
नव्या दिवसाची आणि दिशाची वाट पाहत..
क्रमश :
संकेत पाटेकर  

ती मी आणि हा …बेधुंद पाऊस | Marathi Lekh | Sanket Patekar

ती मी आणि हा ...बेधुंद पाऊस | Marathi Lekh | Sanket Patekar
Umbrellas for Women with UV Protection
Vaishnavi Marble handicraft Polyresin Love Couple with Metal Umbrella Decor

Leave a Comment

Your email address will not be published.