जीवनाचं खरं सूत्र काय ?

जीवनाचं खरं सूत्र काय ?
कुणीतरी आपलंस आहे. आपलं म्हणणारं आहे . आपल्याशी सु:ख- दु:ख वाटून घेणार आहे. ह्यातच किती धन्यता वाटते.
” Hi संकु ” ..ओळखीचाच होता. जवळच्याच व्यक्तीचा, बरेच दिवसाने आलेला हा मेसेज पाहून मी त्या मेसेज ला प्रतीउत्तर दिल आणि मग पुढे पुढे प्रश्न – उत्तरांची साखळीच निर्माण झाली.

तिचे प्रश्न फार निराळे होते. नैराश्याचे, हताश झालेले, जीवनाबद्दल कटुता निर्माण व्हावे तसे, काहीतरी विपरीत घडलेलं असावं ? काय घडलं ते मलाही न्हवतं ठाऊक, पण आम्ही बोलत होतो ..एकमेकांशी मेसेज द्वारे..

प्रत्येकच दुःख कसं निराळ असतं. आनंदित सुरळीत सारं काही चालू असताना, नियती अचानक काही वेगळाच खेळ खेळते, काय असतं तिच्या मनात काही कळत नाही. आपलं मन मात्र त्यात फार पोखरलं जातं. अन त्यातून बाहेर पडणं कठीण होवून जातं.

जीवनाचं सूत्रच नक्की काय ते कळत नाही. पावला पावलांवर अनेक असह्य धक्के खात जावे लागते. जो त्या धक्यातुनच सावरून सांभाळून पुढे येतो. तोच जीवनाचं खर सूत्र काय आहे ते समजू शकतो.

संकेत य पाटेकर

Leave a Comment

Your email address will not be published.