जिथे प्रेम तेथे जीवन

जिथे प्रेम तेथे जीवन

प्रेम’ विना जीवनाला ना रंग आहे ना गंध आहे. हे आयुष्यं प्रेम’ विना खरचं बेरंग आहे.
सगळं काही असूनही .., केवल कुणाच्या प्रेमासाठी साठी , काळजी वाहू स्पर्शासाठी , शब्द न शब्दांसाठी माणूस आयुष्यभर कळवळत राहतो .
मनाची ती कळवळ ऐकणार कुणी भेटलं कि तो दाह तेंव्हा कुठे कमी होतो. पण तोपर्यंत..
असो..
जीवापाड असणारी आपली माणसं सोबत असली कि कसली आलेय चिंता ?
मनाच्या अंतर्बाही उसळणार्या अनेकानेक वेदना हि अश्याच मग खळखळत्या हास्य तवांगमध्ये हळूच गुडूप होवून जातात.

ते कळत हि नाही, पण त्यासाठी आपल्या माणसांची आपलेपणाची साथ मात्र हवी असते.अपेक्षेप्रमाणे सगळंच काही मिळतं अस नाही. पण अनपेक्षितपणाचे सुखद धक्के नक्कीच एखाद्याचं आयुष्य उजळून देतात.

त्यात तिळमात्र शंका नाही. असे सुखद धक्के प्रत्येकाच्या आयुष्यात येतात.असतात. पण ते कधी, कुठून कसे येतील ते मात्र सांगता येत नाही.

जीवन जगायचं तर आधार हा हवाच. अन तो प्रत्येकाला हवाच असतो, त्याशिवाय उभं राहता येत नाही.
प्रकाशाच्या दिशेने , अवकाशाकडे झेप घेत जाणाऱ्या वृक्ष-वेलींनाही हि जमिनीचा आधार हवा असतो . मग एखादं विजेच्या खांबावर हि झप-झप करत पुढे सरकणाऱ्या वेलेला हि , कसली आलेय तमा ?  ती पुढे होत जाते प्रकाशाच्या दिशेने… आधार असला कि जीवनही असंच नव्या आत्मविश्वासने, प्रेरणेने फुलत राहतं.

जिथे प्रेम तिथे जीवन .. ‘प्रेम’ अन मायेच्या स्पर्शाविना कोणीही वंचित राहू नये.
सगळ्याचं आयुष्यं हे प्रेमानं बहरून निघावं. उजळाव. अधिक अधिक ते उजळत राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना …!

जिथे प्रेम तेथे जीवन

आपलाच ,
संकेत पाटेकर उर्फ संकेत
HAPPY NEW YEAR TO ALL ..

वाचा  →दिलखुलास’

 

Leave a Comment

Your email address will not be published.