जाणीवतेचा स्पर्श

काही महिन्यापूर्वी चा एक प्रसंग …ज्याने हृदयास छेद दिला होता , हृदयाची स्पंदनच जणू काही सेकंदासाठी आपलं ‘धडधडण’ बाजूला सारून बंद झाली होती. तो प्रसंग काल पुन्हा अनुभवास आला .म्हणून थोडं लिहावसं वाटलं.

जाणीवतेचा स्पर्श

स्पर्श- मग तो परकेपणाचा असो व आपलेपणाचा ..मनातल्या भावनांना तो अलगद उचंबळून घेतो. प्रेमाची सांगता स्पर्शाशिवाय होत नाही. हे वपुंच वाक्य तसं फ़ेमसच आहे.

पण पण हर एक नात्यातला स्पर्श , त्या भावना वेगवेगळ्या असतात.

काही महिन्या पूर्वीची गोष्ट ,ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने ऐन गर्दीतून मार्ग काढत मी अन माझी मानस बहिण(मानस म्हटलं तरी सक्खीच बहिण म्हणा ) चालत बोलत रस्त्याने कडेकडे ने जात होतो. ठाणे हे तसं गजबजलेलं शहर असल्याने,नेहमी प्रमाणे रस्त्याला रहदारी हि होतीच. त्यामुळे तिला कुणाचा धक्का लागू नये (कारण वासनेने आचरटलेले लोक समाजात हर एक ठिकाणी वावरत असतात ) ह्याची काळजी मी घेत होतो . अर्थात आपली बहिण असो वा इतर कुणी स्त्री , काळजी घेण्याची जबाबदरी हि सर्वस्वा आपलीच असते त्यांसोबत असता . त्यामुळे काळजीघेण्या हेतूने , कुणाचा धक्का लागू नये म्हणून हाताला धरून मी तिला बाजूला सारत होतो तितकंच..

पण कुणास ठाऊक , त्या दिवशी स्वप्नात हि कधी विचार करावा लागला नसेल तो विचार करण्यास भाग पडलं .

ठाणे स्थानकातून आम्ही आपआपल्या मार्गी लागलो. तेंव्हा ती तिच्या घरा दिशेने निघू लागली ..अन मी माझ्या वाटेने … काही वेळ निघून गेला. रस्ताने चालत होतो. तेवढ्यात मोबाईल बीप झाला. पाहिलं तर whatsapp वर मेसेज ची हि रीघ लागलेली . एका पाठोपाठ एक..

संकेतssss अस रस्त्याने मला हात लावत जावू नकोस, माहित आहे तू काळजी घेतोयस , . बहिण ह्या नात्याने आहे…पण Sorry माझं लग्न ठरलंय आता,  कुणी पाहिलं तर .. ?

मी क्षणभर भांबावलो . त्या मेसेज ने , रागाचा पार तर क्षणात वर चढला. काय बोलावं ते कळेना . मनात हि कधी असा विचार शिवला न्हवता . त्यामुळे भावनांचा एकदाच कल्लोळ माजला अन शेवटी रागाने लालबुंद झालेले शब्द सर्कन पुढे निघून गेले.

जिला बहिण मानतो . तिच्याकडून असं ऐकायला मिळन. ह्यावर खरं तर विश्वासच बसत न्हवता . वासनेने अन स्पर्शाला हासूसलेला मी आहे का ? मी तिला तर बहिण मानतो. माझ्या मनात असा कधी विचार हि शिवला नाही. पण आज का हे असं ? मनातल्या मनात विचारांच्या भाव गर्दीत मी स्वतहाला लोटत होतो. घरी जाता जाता भेटलेला मित्र , माझ्या चेहऱ्यावरच्या ह्या अचानक बदललेल्या रूप रेखा पाहून तो हि विचारात पडला. आता तर हसत खेळत बोलण वगैरे चाललं होतं नि अचानक अस काय घडलं . ? त्याला हि काही सांगू शकलो नाही ..पण

जे घडलं होतं ते मात्र माझ्या मनावर विपरीत परिणाम करणार, त्यामुळे पुढे कित्येक दिवस तो परिणाम तसाच कायम होता. आजही आहे. त्यांनतर मात्र मी तिच्याशी संवाद साधून माफी मागितली होती.

जाणीवतेचा स्पर्श

तिचं हि कुठे चुकलं होतं म्हणा , नातं आमच्या दोघातच बहिण भावाचं.. तिच्या घरच्यांशी नि माझी नाही काही ओळख ना पाळख ? बर त्यात आता तिचं तर लग्न हि ठरलं होतं. त्यामुळे साहजिकच जे घडणार होत ते घडल होतं.

पण मी हि कुठे चुकलो होतो. माझी हि काय चूक होती. जे काय होत ते काळजी पोटी . बहिणीच्या रक्षणार्थ म्हणा /// पण कुणास ठाऊक तिथपासून जरा भीतीच वाटते. कुणाच्या अगदीच जवळ जायचं म्हणजे मग ती बहिण का असू दे. जरा दूर असलेलंच बर …असं वाटतं .

तसं आईचा घरी दंडकच असायचा , मुलाने मुलातच राहावे , अन मुलींनी मुलींमध्ये , मग बहिण भाऊ असले तरी चालेल , बाजूला बसायचं हि नाही. ह्यावर मात्र मी चिडायचो. बहिणीच्या बाजूला बसायचं नाही. हे काय , काहीतरीच असं म्हणायचो ? आई नि माझं त्यावेळेसचा हा संवाद अचानक डोळ्यासमोर आला. अन डोळे पाणावले.

आज कित्येक दिवसा नंतर पुन्हा त्याच क्षणाची पुनरुत्ति झाली. ह्या वेळेसच बहिण न्हवती , होती ती ऑफिस मधलीच एक , सोबत एकत्र काम करणारे आम्ही दर वेळेस एकत्रच ऑफिस बाहेर पडतो. तस ह्यावेळेसही बाहेर पडलो . रस्त्यावरनं गप्पा मारत…

पुढे लाल बावट्याने वाहनांना रोखून धरलं होतं . म्हणून घाई गडबडीत रस्ता क्रॉस करायचा म्हणून आम्ही धावत पळत सुटलो. अर्धवट आलो नि तोच पुढे सिग्नल सुटला . अन नकळत पुन्हा तेच घडलं. काही अघटीत घडू नये म्हणून …काळजी पोटी हात धरला गेला माझ्या नकळत … अन तिच्या तोंडून पुढे शब्द बाहेर आले.

संकेत . मी Married आहे. लग्न झालंय माझं , रस्त्यावर असं हाथ पकडनं …

शरमेने मान खाली गेली. Sorry म्हटलं . अन पुन्हा दीर्घ विचारात गढून गेलो.

हे क्षण देखील अजब असतात. पुन्हा घडतात . त्या त्या क्षणाची ‘जाणीवतेची ‘ पुन्हा जान करून देत. पण जे घडतं ते नकळतच …त्यात चुकी कुणाची नसते. चुकतात ते त्यावेळेसचे क्षण …

टीप;- इथे कुणाच्याही भावना दुखावण्याचा मुळीच हेतू नाही. मुख्यत्वेकरून ह्या संबंधित व्यक्तीचा..मन कुणाचे दुखावलेच गेलं तर क्षमस्व 🙂

जाणीवतेचा स्पर्श

– संकेत य पाटेकर

Leave a Comment

Your email address will not be published.