जगण्याला एक वेगळ रूपं देतं.. प्रेम | Marathi Lekh
प्रेम हे शब्दात व्यक्त करू नये असं म्हणतात ..पण ज्यांना ते आपल्या सहवासातून कळत नाही .
किंबहुना कळत असूनही त्याबद्दल हवीतशी प्रतिक्रिया त्यांसकडून मिळत नाही .
तेंव्हा मात्र मनातल्या भावनेला ‘ शब्दात’ च गुंफाव लागतं.
काही वेळा ओरडून सांगाव लागतं. अग वेडे ..प्रेम आहे तुझ्यावर …जीवापाड ..ऐकतेसं ना ?
तर काही वेळा ओरडून हि हवा तो प्रतिसाद न मिळाल्यास निशब्द राहून …
फक्त योग्य त्या क्षणाची वाट पहावी लागते.
प्रेम मिळेल न मिळेल हे कधीच सांगता येत नाही .
कारण दुसऱ्या मनाचा अचूक धागा कधीच पकडता येत नाही .
अपेक्षा तर नक्कीच असते आपली त्यांच्याकडून ते निर्मळपणानं मिळाव म्हणून ..
पण अपेक्षापूर्ती न होवूनही जिथे प्रेम केले जाते ते खरे प्रेमं …
हव्या त्या व्यक्तीचं प्रेमं मिळालं तर हे जग स्वर्गाहून हि सुंदर भासतं.
पण तेच जर नाही मिळालं तर खूप त्रास सहन करावा लागतो. सहन करण्याची तशी तयारी हि ठेवावी लागते.
पण एक मात्र नक्की ,ह्या सर्वांतून आपण हळूहळू का होईना प्रेमाचे धडे गिरवत जातो .
प्रेमा बद्दलची व्याख्या आपल्या मनी तयार होत जाते .
प्रेम मिळालं अन नाही मिळालं तरी..जगण्याला एक वेगळ रूपं देतं प्रेमं.
खऱ्या अर्थानं नवी दिशा नवा ध्यास देतं प्रेमं ..
मनातले काही ..
संकेत य पाटेकर
खालील इमेज हि नेट वरून घेतलेली आहे .