जखमांचं देणं..

काही जखमा ह्या वेदना विरहित असतात. त्या कधी आपलं व्रण सोडून देतात ते कळून
येत नाही. रक्त ओघळलं तरी त्याची जाणं होत नाही. पण जेंव्हा ते नजरेआड येतं.

तेंव्हा कपाळी प्रश्नार्थी आठ्या पडतात ? हे कधी झालं ? कस झालं ?कुठे झालं ? शोधार्ती मनं मागोवा घेत राहतं. पुन्हा ते थांबतं. किंचितसं कळवळतं. पुन्हा हसतं. पुन्हा भरारी घेतं.

आयुष्यं हे अश्याच जखमांच एक गोफ आहे. काही जखमा अश्याच कळून न येणाऱ्या असतात. त्याचं काही वाटत नाही. पण काही भरून न येणाऱ्या देखील असतात. पण प्रत्येकवेळी मनाला भरारी हि घ्यावीच लागते.

रहदारीच्या त्या रस्त्यावर माणसांच्या त्या तुडुंब गर्दीत कितीसा वेळ काढतो आपण ? त्यातूनही मोकळी वाट काढावीच लागते तेंव्हा कुठे मोकळा श्वास घेता येतो.

तसंच काहीसं ह्या आयुष्याचं…

– संकेत पाटेकर

Leave a Comment

Your email address will not be published.

Translate »