छत्री पेक्षा रेनकोट बरा

छत्री पेक्षा रेनकोट बरा

काल ऑफिस मध्ये असता फोन खणाणला.  घरातूनच होता मोठ्या भावाचा ..
 
हेलोss मी रेनकोट घेतोय. सातशेला आहे.  तुझ्यासाठी हि घेऊ का  अजून एक ?मी म्हटलं ? नको,  तू घेतो आहेस ना तुझ्यासाठी ? तोच वापरेन ..
मला कुठे जास्त गरज आहे.
ट्रेकिंग ला जाताना लागेल तोच …इतर वेळी छत्री आहेच.
भाऊ मात्र थोडा रागावूनच (असच गंमतीने हो ) म्हणाला.
‘माझा रेनकोट मी देणार नाही.  माझी कामे असतात अन मला बाहेर जाव लागतं रविवार हि गाडी घेऊन (आमची दुचाकी  .. मी म्हटलं बर ..ठीक आहे. घे मग माझ्यासाठी हि एक. 

ऑफिस मधून सुटलो अन नेहमीच्या नित्य क्रमानुसार ग्रंथालयात जावून बसलो.
थोडं इकडचं तिकडच वाचन केलं अन भावाच्या दुकानासमोर (संगणक दुरुश्तीच आमचं छोटस दुकान आहे ) हजर झालो. मनात त्या घेतलेल्या गोष्टीबद्दल उत्सुकता तर होतीच.

कारण ज्या ज्या वेळी मी ह्याला काही विकत घ्यायला सांगतो माझ्यासाठी म्हणून तेंव्हा ती घेतलेली वस्तू मला मुळीच पसंद पडत नाही.
मात्र घेतलेल्या वस्तू चा दर्जा तो कापड वगैरे महागडं असतं. हे खर …
‘ सस्ती चीजो का हम शौख नही रखते’ हा दुनियादारी मधला डाईलॉग अशावेळी कधीतरी आठवून जातो.  तर असो,  प्रत्येकवेळी अस घडत नाही. काही वस्तू नक्कीच पसंद पडतात. कारण त्या प्रत्येकामागे प्रेमभावना असते.  ह्या वेळेस घेतलेल ते नवं कोर रेनकोट पसंदीत आलं.

बाहेर पाउसाची रिमझिम सुरूच होती. त्यामुळे अंगात ते रेनकोट चढवलं.
अन टपोरया थेंबाचा आनंद लुटू लागलो. टप टप असा आवाज करत ‘ सरींचा’ तो टपोरा स्पर्श अन त्यातून अंगभर संचारलेली रोमांचित वलय मला  नसलेल्या पण असायला हवी असलेल्या प्रेयशिचि आठवण करू देत होते.

त्यातच छत्री पेक्षा रेनकोटच बरा ..असा एक विचार त्यावेळेस मनावर उमटून गेला .
रिमझिमत्या पाउसात मनसोक्त भिजायची फार इच्छा असते. पण भिजता येत नाही. 
अशावेळी रेनकोट अंगात असला म्हणजे रिमझिमत्या त्या पाउसाचा स्पर्श अनुभवता येतो. 
तो टपोरा थेंब अंगा खांद्यावर अलगद झेलता येतो. मनभर नाचता येत बागडता येत. 
भिजून हि न भिजण्याचा एक वेगळा आनंद मिळत असतो त्यातून .. जो छत्री बाळगून मिळत नाही.

असंच लिहिता लिहिता ..

छत्री पेक्षा रेनकोट बरा

– संकेत पाटेकर

Leave a Comment

Your email address will not be published.