चाळ

चाळीचं आपल एक वेगळंच वैशिष्ट्य असतं.
कधी हशा तर कधी भांडण तंटा तर कधी भजन कीर्तन, उत्सवांच उत्सव, नाच गाणी, सांस्कृतिक कार्यक्रम हे ते चालूच असतं.
एकत्रितपणे रसमिसळून राहणं ..हे चाळीतल्या लोकांच एक मुख्य वैशिष्ट्य.

अनेकानेक घडामोडी इथे दिवसभर घडत असतात.
तसा मी सुद्धा चाळीतच राहतो नि आज आमच्या चाळीत एकच मोठाच हशा पिकला. त्याच काय झालं.

विषय जरा गंभीरच आहे तसा ….
आमच्या चाळीत, मध्य रात्री म्हणजेच दोनच्या आसपास एका घरात चोरी झाली.
एक मोबाईल, काही कपडे, काही रक्कम चोरांनी लंपास केली.
हे आमाच्या ध्यानी मनी मात्र न्हवतं. कारण रात्रीची वेळ, गाढ झोपेतच सर्व …कसलं काय कुणास कळतंय..
सकाळी सकाळी मात्र हे सर्वत्र झालं आणि संध्याकाळ पर्यंत पोलिसांची येर झारा सुरु झाली.
नि चाळीतले मंडळी एकत्रित आली.

चोरीचा विषय निघाला.., कुजबूज सुरू झाली.
काय कसं झालं हे ?
इकडच्या तिकडच्या गोष्टी निघाल्या ..
जो तो ब …आपलं आपलं अनुभव कथन करू लागला.
गप्पांना बहर आला.
त्यात एक जण गंभीरपणे…

एक ठराविक खूण लक्षात ठेवायची , रात्री अपरात्री घरी येण्यास उशीर झाला कि ..

सर्व जण कान लावून ऐकू लागतात.

मी काय करतो माहित आहे.

रात्री जर घरी येण्यास फारच उशीर झाला म्हणजे मी दोन वेळा दरवाजा ठोठावतो.
आतून जर काहीच प्रतिसाद मिळाल नाही तर , मात्र मी गाण बोलू लागतो.

जादू तेरी नजरssssss…
आतून प्रतिसाद येतो (बायकोचा )

खुशबू मेरा बदनsssssss …
आणि तेंव्हा कुठे दरवाजा खुलतो.

आणि एकच हशा पिकतो …चोरीचा विषय मात्र काही वेळ बाजूलाच राहतो.

चाळ म्हटली कि अशा घडामोडी होतंच राहतात ओ …….
🙂 🙂


– संकेत य पाटेकर


भटकंती सिंधुदुर्ग जिल्ह्याची

‘येवा कोकण आपलोच असा’

एकीकडे अथांग पसरलेला सागर दुसऱ्या बाजूला कर्ली खाडीचा संथ प्रवाह आणि त्या दोहांचा चंद्र सूर्य ताऱ्यांच्या साक्षीने नित्य नेमाने होणारा सुरेख संगम. सृष्टी सौंदर्याचा अनोखा मिलाफच म्हणावा असा हा देवबाग . कोकणातील विविध पारंपारिक अशी संस्कृती… काय काय पाहिलं आम्ही..त्यापेक्षा काय नाही पाहिलं आम्ही . कोकण मनी भावला तो असा.. ‘येवा कोकण आपलोच असा”

Leave a Comment

Your email address will not be published.