घरचे अन घरच्याबाहेरचे..

घरचे अन घरच्याबाहेरचे..

काल योगायोग म्हणा , माझं  नशीब म्हणा …माझं ज्या व्यक्तीवर मनापासून अन जीवापाड प्रेम आहे त्या व्यक्तीची नि माझी बरेच दिवसाने भेट घडली.

तसं हे मनं नेहमीच आतुरलेलं  असतं. जिच्यावर आपल जीव असतो …भरभरून प्रेमं  असत .
त्या व्यक्तीच्या भेटीसाठी ..
आपलेपणाचे तिचे गोड प्रेमळ  शब्द ऐकण्यासाठी …
तिला भरभरून नजरेनी पाहण्यासाठी..
तिच्या सहवासाच्या चाह्येखाली निवांत पहुडण्यासाठी ..
मग ती  कोणत्याही नात्यातली व्यक्ती असो, प्रेम माणसाला त्या रेशीम बंधनात अडकवून ठेवतो ..

घरचे अन घरच्याबाहेरचे..

काल ती भेटली.
नाही नाही  मीच भेटलो तिला   .. .सायंकाळी.
रिक्षाने घरी परतत असता,  वाटेतल्या  रस्ताच्या कडेला फोन वर कुणाशी तरी बोलत असता दिसली.
बस्स तेंव्हाच ठरवलं आज हिला भेटूनच जायचं . मनातल सारं  बोलून टाकायचं .
तसं हि मनात मी काही ठेवत नाही . तरीही वाटत मनातल्या त्या भावना,
ज्या सतत वादळासारखे घुन्गावत राहतात  ते बोलून द्याव अन शांत करावं  ह्या वादळी मनाला .

तसं  बऱ्याच दिवसापासून ..कित्येक महिन्या पासून पाहतोय.  तिचं वागणं, तिचं बोलणं..
बदललंय. खुपसा फरक पडला आहे.
पूर्वीची अन आताची.. ती., ह्यात…

क्षण हे असे का ? का बर्र बदलावेत अस राहून राहून वाटत कधी..
सुखाचे अवघे क्षण ..ते हि अगदी मोजून अन दुख हा  पाठशिवणी सारखा मागेच सतत… का हे अस ?
का हे क्षण असे बदलतात ?
असत्याच न्हवतं  करून टाकतात . एखाद्या मनाला घुसमटून देतात ?

कुठे ते हास्य लहरीत गुंफलेले , बहरलेले  सोनेरी  क्षण ? अन कुठे हे अत्ताच्चे तळपत्या उन्हात पार काळपटून गेलेले  मरगळलेले  निरुत्साही क्षण….

परिस्थिती सार वेळ , वेळेनुसार  परिस्थिती  अन वेळ- परिस्थिती  नुसार माणसाचे आचार विचार , त्याचं   वागणं , बोलणं सार काही बदलतं.
अन ह्याचा होणारा परिणाम त्या व्यक्तीसोबत इतर  मनावर हि होतोच.
हे नातच तसं असत .
म्हणून आपण हि आपल्याच विचारात बुडतो. आठवणीचं  गाठोड हळूच उघडून  स्वताहाशीच  संवाद  साधत.

किती सुंदर आणिक सोनेरी क्षण होते ते ..किती आनंद..अन उत्साहाने  बहरलेले  दिवस होते ते ….
पण सांर  अचानक कुठे गेलं ? कस गायब झालं.
बहरलेला तो हास्य गंध कुठे नाहीसा झाला ? .कुठे गेले ते दिवस ?
मन  चाचपडतं  ..गढून जातं  त्या अश्या असंख्य विचारांच्या भाव गर्दीत ….

काल ती दिसली .
रस्त्याच्या कडेला उभी कुणाची तर प्रतीक्षेत….मी  रिक्षाने जात असता ,तेंव्हा ठरवलं आज भेटूनच जावू तिला ..कित्येक दिवस भेट न्हवती .म्हणून रिक्षातून उतरलो नि थेट तिच्या समोर उभा राहिलो.

क्षणभर तिच्या चेहऱ्यांकडे नजर खिळून राहिली.
असंख्य विचारांच्या छटा अन कुठल्यातरी विवंचनेत असलेला तिचा  हताश,  निराश,अन थकलेला निरुत्साही चेहरा पाहून मन काळवंडल अन मनोमन म्हणून लागलं.

हीच का ती ? हसऱ्या  मनाची ..खेळकर वृत्तीची, माझी प्रिय अन प्रेमळ…

काही वेळ  तसाच अगदी  शांत उभा  होतो तिच्या  चेहऱ्यावरील  भाव टकमकते ने  निरखत .
काहीच क्षण असेच गेले… निशब्दतेत..  पण मीच पुढे  बोलण्यास सुरवात केली .

मनात असलेल्या अनेक विचारांना , मनातल्या शंकांना अन माझ्या त्या प्रेमळ रागाला तिच्या समोर कसं   मांडाव , कसं  व्यक्त करावं हाच  एक मोठा  प्रश्न होता.
त्यातही तिची ती अवस्था पाहून खरचं  आपण आता बोलावं  का ? बोलत व्हावं का ?
अगोदरच ताणतणावा खाली असेल , अन अस असताना आपल्या बोलण्याने तिला अजून त्रास झाला तर ? ह्याविचाराने मन पुन्हा हळवं झालं. पण ना ना म्हणता मी बोलण्यास सुरवात केली.

कशी  आहेस ?
ठीक…
एक विचारू ?
बोल  …,
का अशी वागतेस ?

संकेत , Please..
मला पुन्हा पुन्हा ह्या गोष्टीत खेचू नकोस.
अंतर मनाला  भिडलेल्या त्या माझ्या प्रश्नांनी तिला बोलतं  केल.

मी अगोदरच खूप ताण तणावात आहे . मलाच नकोस झालं  आहे सगळ .
तूच बघतोयस ना ..
क्षणभर ती  थांबली , एक निश्वास टाकत पुन्हा बोलती झाली .
‘संकेत,  खरच इतकं जीव नको लावूस  कुणावर…
हव तर घरच्यांवर जीव लाव,  पण  बाहेरच्यांनवर नको ..’
ह्या तिच्या शब्दांनी काळजावरच  घाव पडला.
मग तू घरातली नाही आहेस का  ? तिच्या प्रश्नाला कसबसं उत्तर देत मी म्हटलं. 

ह्या प्रश्नवार तिने उत्तर दिल नाही. पण पुढे बोलत राहिली.

काही नाही  रे मिळत ह्यातून… . त्रासाच होतो खूप ….
मनातल्या  सार्या अनुभवी क्षणांना  एकवटून  ती पुन्हा बोलती  झाली

तुझ्यात आता ‘मी’ पाहतेय …’संकेत’
माझ्या जागी  आता तू आहेस , वेड लागेल अश्याने .. . त्रास होईल खूप  ..नको जीव लावूस माझ्यावर . 
खरच …
क्षणभर सगळ शांत झालं…..
पुढे काय बोलावं ते माझाच मला  कळेना .

मी तसाच हताश अन पोखरल्या मनाने तिचा निरोप घेत मागे फिरलो.
मनात पुन्हा विचारांचं वादळी वादळ  उठल.

इतके दिवस ती मला का टाळू पाहते ह्याच कारण आज मला मिळाल होत .
का तर तिच्यासारखं मला हि तसा त्रास होऊ नये,  त्या ताणतणावातून मी जावू नये म्हणून ..
माझ्या काळजी पोटी .. इतक्या तळमळीने ती बोलली  आज…

तिने तिच्या परीने माझा विचार केला होता . पण माझ्या मनाची वेदना काय  कशी बर सांगावी ….
मला त्रास तर होणारच…मी तयार हि आहे त्रास सोसायला.

पण असं टाळाटाळ नको…..आपलेपणात तुट नको…दुरावा नको ..
मनापासून प्रेम आहे ग …

अन प्रेमं  हे आंधळ असतं. अन ते घरातले अन बाहेरचं असं   बघून कधी होत नाही .
नाती हि रक्ताचीच असतात असं हि नाही .
मनात घर केलेली माणसं  हि  तितक्याच रक्तमोलाची , प्रेमाची  अन ..आपलेपणाची …

नातं कुठलेही असो   एकदा ते जुळलं कि ते शेवटपर्यंत निभवावं.
प्रेमाचं पारड  हि शेवटच्या श्वासापर्यंत … तोलून राहावं
भले त्यात कितीही खाचखळगी   येवोत.

माझ प्रेम हि असंच आहे . भले त्यात थोडा स्वार्थ असेल पण ते निखळ आहे अन तसंच राहील शेवटच्या श्वासागणिक ….

घरचे अन घरच्याबाहेरचे..

संकेत य पाटेकर
मनातले काही …
११.०९.२०१२

Leave a Comment

Your email address will not be published.