‘खाऊ दे नाहीतर पैसे दे’

‘खाऊ दे नाहीतर पैसे दे’

काल ट्रेक दरम्यान एका पायवाटेवरती त्या कोवळ्या चिमुरड्यांच हे वाक्य अजूनहि त्या स्वरानिशी कानाशी गुंजतंय. आयुष्याच्या व्याख्या पुन्हा नव्याने सांगून देत.

त्यावेळेस मनालाच ते वाक्य इतकं सर्रकन घासून गेलं कि खोल जखम व्हावी इतपत.
त्यावेळेस हाती जे होतं ते देऊ केलं पण त्याने मन काही समाधानी झालं नाही.
कुठेतरी ते चित्रं अन ते वाक्य मनात सळ करून राहिलंय.

कळसुबाईची ती छोटी ताई असो,
पोटाच्या खळगीसाठी म्हणून भर उन्हा तान्हात झाडाचा आडोशा पकडून , ‘दादाss दादाss ताक घ्याना ? असं म्हणत मोठ्या आशेने बघणारी .

नको म्हणताच मागे मागे पळत येउन केविलवाण्या स्वराने ‘ दादा काही खायला द्याना ?
म्हणत काळजाच पाणी पाणी करणारी ..वा ‘खाऊ दे नाहीतर पैसे दे’ म्हणणारी हि चिमुरडी.
मनाला विचारांच्या गर्तेत झोकून देतात. .
अजूनही कुणाला कुणाची तरी गरज आहे. आधाराची गरज आहे . प्रेमाची गरज आहे.
मायेच्या स्पर्शाची गरज आहे. मदतीची गरज आहे. आपलेपणाची गरज आहे.

– संकेत

 

Leave a Comment

Your email address will not be published.