खांदेरी – दुर्गदर्शन मोहीम

कधी कधीअनपेक्षितपणाच्या सौम्य सुखदक्षणांनी हिमनात चैतन्याचानिर्मळ झराखळखळून वाहूलागतो. मुक्तकंठा निशीतनमनं  अगदीसुखाने नाचूबागडू  लागतं, गाऊलागतं.
अश्याच काहीश्यास्थितीत असताखांदेरीला जाण्यचासुयोग जुळूनआला.

आदल्या दिवशीझालेली मित्रांचीगाठ भेटत्यात अनपेक्षितपणाचाएका जिवलगचा   कॉल  , अनझालेला संवाद  ह्यानेआनंदाला आधीचउधाण भरलेहोते .
त्या उधाणलेल्याआनंद सागरातूनच, आसुसलेल्या भेटओढीने , नवंचैतन्याचे  वल्हे मारतपहाटे खांदेरीसाठी प्रयाणकेले.


दहा जणांचीआमची मुंबईतली  भटकीटोळी एकत्रजमली.
त्यात आमच्याछोट्या राणीसाहेबाम्हणजे आमचीपुतणी साहेबा  अष्टमीपहिल्यांदाच  माझ्या सोबत किल्लेभटकंतीसाठी बाहेरपडली.
किल्ले भटकंतीचीओढ अन  निसर्गाचीरंगत संगतआताच इथपासूनच  लागावीह्यासाठी  तिला मुद्दामघेऊन आलोहोतो.
मनात हि  केंव्हापासूनतशी इच्छाहोती..आपलंहे शिववैभवखांदेरी उंदेरीएकदा तरीपाहुन  घ्यावं.
त्याचा योगआता जुळूनआला होता.

कला , गीतू, स्नेहल , पनूसारिका,नम्रता, अष्टमीसुशांत, स्वरूप अनमी अशीदहा जणांचीआमची  टोळकी , गेटवे वरूनसकाळी ठीकपाऊणे नऊवाजता फेरीबोटीने मांडावासाठी रवानाझाली .
अलिबाग म्हणावंतर तेमाझं आवडतंठिकाण .
अथांग पसरलेलाअन नेहमीच  उथळलेला  हा  दर्यासागर , त्यावरआच्छादलेलं  निळाईचं छतं, उनाड  मोजका वारा, त्यावर हिंदकळनारीलहरी लाट, सागरी पक्षांचामागोवा , मोठालीजहाजं  हे सारंनजरेस सामावतआम्ही पुढेजात होतो
पुढे काहीवेळातच मांडावाबेट गाठलं.
मांडावा बेटापासूनथेट पुढे  थळ  गावापर्यंत..  नारळीपोफळीच्या बागांचीगर्द सावली, तना मनावरआरूढ होऊनसुखद स्पर्शकरून  जात होती.
इथली बोलीकानावर पडतहोती . इथलीमाणसं हृदयाशीजुळत होती.
नेत्र सुद्खआनंद तनामनात रुंजीघालत  फिरक्या घेतहोता .
सागरी किनार्याचीगाज  आता दूरवरून  हिऐकू येतहोती .
थळ गावापासूनअगदीच  काही अंतरावरआता खांदेरी  उंदेरीखुणावत  होते .
नजर दूरकोणा कोनात  पसरतहोती. इतिहासाचामागोवा घेत
मुंबईच्या इंग्रजांवरवचक बसविण्यासाठीशिवाजी महाराजांनीमुंबईपासून १५मैलावर असणार्याखांदेरीबेटावरकिल्ला बांधण्याचे..१६७२ मध्येठरविले. त्याप्रमाणेकिल्ल्याची तटबंदीबांधण्यास सुरुवातझाल्यावर इंग्रज सिद्दीअस्वस्थ झाले. त्यांनी किल्ल्यालावेढा घालण्याचाप्रयत्न केला. त्यामुळे शिवरायांनीतात्पुरती माघारघेतली किल्ला बांधण्याचेकाम थांबविले. .१६७९ मायनाकभंडारी यांच्यानेतृत्वाखाली निवडक१५० माणसेदेऊन ऐनपावसाळयात खांदेरीदूर्गाच्या बांधकामासपुन्हा सुरुवातकरण्यात आली. यामुळे अस्वस्थझालेल्या इंग्रजांनीकिल्ल्याचे बांधकामथांबविण्याचा प्रयत्नकेला, पणकिल्ल्यावरुन मायनाकभंडारी किनार्यावरुन (थळच्याखुबलढा किल्ल्यावरुन) दौलतखान यांनीइंग्रजांना प्रतिकारकरुन किल्ल्यालारसद पुरवठाचालू ठेवला. या कामीमहाराजांच्या आरमारातअसलेल्या उथळतळाच्या छोटयाहोडयांनी महत्वाचीभूमिका निभावली. ओहोटीच्या वेळीउथळ पाण्यातूनया बोटींच्याहालचाली चालूअसताना इंग्रजांच्याखोल तळअसलेल्या बोटीसमुद्रात खोलपाण्यात अडकूनपडल्यामुळे इंग्रजांनाहात चोळतबसावे लागले. शेवटी इंग्रजांनी१६८० मध्येशिवाजी महाराजांशीतह केला.

पुढे मार्च, १७०१रोजी सिद्दीयाकूत खाननेखांदेरीवरहल्ला केला, पण मराठयांनीतो परतावूनलावला. १७१८मध्ये इंग्रजांनीमोठा तोफखानायुध्द नौकांवरठेवून किल्ल्यावरहल्ला केला, पण किल्लेदारमाणकोजी सूर्यवंशीयाने किल्ला५०० माणसांनीशीमहिनाभर लढवला. त्यामुळे इंग्रजांनाहात हलवितपरत जावेलागले. पुढे१८१४ मध्येखांदेरी पेशव्यांच्याताब्यात गेला. १८१७ मध्येत्याचा ताबापरत आंग्रेकडेगेला. १८१८मध्येखांदेरीकिल्ला इंग्रजांच्याताब्यात गेला.
    
असा हाखांदेरीशिवरायांच्या पदस्पर्शाने पावनझालेला  अन खुद्दशिवरायांच्या देखरेखेखालीउभारलेला   किल्ला आज  कळकळीचीआरोळी देतअश्रूढाळत उभाआहे .
या रेमाझ्या लेकरांनोया ,याकुणी तरीया ….माझीहि दुरावस्ता  मलाचबघवत नाही. असे जणूम्हणत
शत्रूवर वचकबसविण्यासाठी बांधूनघेतलेले खांदेरीउंदेरी  हे  किल्ले  आज सागरीलाटेशी ,
इथल्या नैसर्गिकआपत्तीशी इतकंवर्ष, संघर्षकरत अजूनही   दिमाखाने  उभेआहेत.
पण आपल्यालोकांना त्याचाना अभिमानना कसलीचिंता . साधीलाज हिनाही .
तिथे गेल्यावरत्याची तीदुरावस्ता पाहूनकळून आल.
जागो जागीस्वतःचं नावकोरून  रंगरंगोटी केलेलीतटबंदी.
दारू पार्ट्याकरून धिंगाणाघालणारे   लोकं ..एकेकाळीशत्रूला धडकीभरवनाऱ्या  अभिमान असलेल्यातोफांवर वरउभे राहूनसेल्फी काढणारे   महाभाग  पाहूनखरंच मनकळवलं  .
ज्या रयतेसाठीज्यांनी जीवाचीहोळी केली. किल्ले लढविले, जिंकलेघडविले , स्वराज्यनिर्माण केले.
त्या वास्तूची, त्या प्रेरितइतिहासाची , गडकिल्ल्यांची  ना तमा ना  फिकीर,
ना कसलाअभिमान, अभिमानअसला तरीतो  नावापुरता  …
जय भवानी  जयशिवाजीबस्स..झालं  संपलआज त्याची  अशी  अवस्थापाहून मनाचेरंगच पालटले.
एकटी दुकटीएखाद मुलगीसुद्धा इथेआली तरती शरमेनेमान खालीघालेल .
कारण इथल्या, इथे येणाऱ्याकाही  मानवी  नजरा हिवासनेने तुडूंबभरल्या आहेत.

च्यायला  , इथे  कुणला मारूनटाकून फेकूनदिलं तरीकळणार नाहीरे ?
असंच एकवाक्य कानाशी  धडाडलं  , मागेवळून पाहिलंतर एकउनाड टोळकीतटबंदी  वरून फिरकत  होती.
त्याकडे दुर्लक्षकरत ..आम्हीदीप गृहाच्यापुढे असलेल्या  दरवाजातूनआता शिरलो.
 
फेसाळणार्या सागरीलाटा दगडांच्याराशींची खेळीकरत होत्या.
एखाद्या नव्याजोडपाने सागरीकिनारी येउनएकमेकांवर पाण्याच्याशिडकावा करावातसंच काहीसते भासतहोत. तरअसो..
सभोवताली पसरलेल्यादगडांच्या राशींच  अनएकावर एकअश्या रचलेल्यातटबंदीतल्या त्याचीरांचं  ते शिवरायांचदुर्गविज्ञान , प्र. केघाणेकरांच्या  पुस्तकातून आधीच डोक्यातउतरलं होतं.
ते आताप्रत्यक्ष पाहतहोतो .
कित्येक सालत्या दगडांच्याराशी ह्याउधाणलेल्या सागरीलहरींना  थोपवून आहेत.
अजूनही तुम्हीखंबीर असा, ‘तटबंदीबुरुजहो  हो‘   आम्हीआहोत तोवर..अस जणूगर्वाने अभिमानानेसांगत
आम्ही कित्येकवेळ त्याराशींवर अनफेसाळणार्या लाटेशीरममाण झालोहोतो .
इथून निघूचनये असंचवाटत होतं. पण वेळेअभावी चालतेझालो .
भव्य सागरीडोहात इवल्याश्यावाटणाऱ्या  होडक्यातून सागराचेअनाहूतं  रूपं पाहत  आम्हीखांदेरी गाठले. तिथून धक्क्यापासून  पुढे हनुमानमंदिर अनदीप गृहाशीपुढे सरकतदरवाज्यापाशी  आलो. येथून ह्यासागराचे विशालरूपं  , सागरी लाटेचेतांडव , दगडांच्याराशी , तटबंदीबुरुज  न्हाहाळत होतो.
पण वेळेलाथांबण माहितनसतं  . त्यामुळे  आम्ही हिएक एककरत  पुढे सरसावलो.
आता शेवटीमी  अन नम्रताकाय तेउरलो होतो.
तेवढ्यात   तिघा चौघांचाएक टोळकं   जाण्याच्यारस्त्याला  अडून बसलं.
फोटोग्राफी करत

त्यातल्या एकाचंआमच्याकडे लक्षगेलं  . अन त्यानेउगाच डीवंचावंम्हणून विचारलं,
आमच्याकडून काहीत्रास नाहीना  ? मी  हास्यची एकरेघाटी   चेहऱ्या वरूनफिरकावली. .
अन पुढेझालो  तीला सोबतकरून ..म्ह्टल.. 
शिवरायांच्याह्या भूमीतअन खुद्दत्यांच्या ह्याकिल्ल्यात  आपण आहोत,तिथे कसलीआलेय  डर नितमा ,प्रसंगी  दोन हातकरण्याची निधडी  छातीहि ह्यागड किल्ल्याच्याप्रेरणादायी इतिहासातूनमिळवलेय राव
त्या दरवाज्यातूनबाहेर पडलो. तटबंदी वरूनचालत चालतपुढे निघालो.
अथांग पसरलेलाहा दर्यासागर  कधी  खवळलेला , कधीशांत  , तर कधीगूढ भासतहोता.
तसा तोनेहमीच भासतो.

तरीही  दर्या सागरचं  हेअस नाना वविधरूपं  मला नेहमीचआकर्षणाच ठरलंय.
काय  नि कायरहस्यं , गुपितदडलेत असतीलह्याच्या पोटी  , कुणासं  ठाव? कधी कुणालात्याचा थांगपत्ता   लागेल  का? लावता येईलकाप्रश्नच प्रश्नकधी हि उलगडलेले..
 मलातर हेएक कोडचं    वाटतं  …सुटणार
तरीही त्याचं  विशालं  रूपमात्र मनास   भावतं. कित्येक गोष्टीतो सहजसामावून घेतो…  त्याचबडेजाव करता ..
कधी कधी  आपल्यामनाशी हिमी ….त्याचसाधर्म्य जुळवू  पाहतो.

आपलं मनं  हिअसंच एककोडं आहे. विशाल सागरासारखं
त्यात नित्यनेहमी कायकोणती  ढवळा ढवळ  होतअसेल  ते आपणचजाणतो  . समोरच्याला तेकधी कळूनयेत नाहीजीवनाचेअसे एकएक धडेनिसर्गाशी असएकरूप झाल्याससहजच मिळतातत्यातूनआपण घडतजातोतर असो,तटबंदी  वरून  जात असता  आम्हीएका बुरुजाजवळ थांबलो. तिथे  एक तोफआपल्या मातीशीइमाने राखतनिवांत  पहुडली होतीसागरीशत्रूचा जणूअद्यापही  कानोसा घेत..
त्याची छानशीमाहिती , तोंडओळख  गीतू  आमच्या लहानग्याअश्तू लादेत होती.

येथूनच पुढे  दुसराएक  ‘बुरुजनजरटप्यात येतहोता. तिथेचकाहीशी  नजर  खिळून राहिली.
एकटक झालीमनाचेवारे वेगानेदौडू लागले.
काही महाभाग,धडाडनाऱ्या  त्या तोफेवरचढून सेल्फीकाढत मग्नहोते.
ते पाहूनथंडावलेलं  रक्त क्षणात   खवळलं  . अनत्या रोकनेपाउले निघूलागली.
तिथवर पोहचलोतेंव्हा त्यांचेते  कारनामे अजूनहीसुरूच होते.
फोटो साठीकायपण ‘ , कुठेपण ,’सालाजरा पणअभिमान नाही  ह्यांना, ह्यांच्या तोंडीनुसताच  जयघोष.. जय  भवानी  जयशिवाजीबस्स‘  तेतरी कशालाघ्यावं म्हणतोय.
वाटलं थोडातरी शहाणपणानंवागतील  . पण कसलंकायजरा नजरइकडून तिकडेवळली.
तोच ह्याचीसेल्फी गिरीपुन्हा  सुरु ..ते पाहूनमन पुन्हाधारेवर आलं.
त्यांना पुन्हाएकवेळ  समज दिली..तेंव्हा तेनिघून गेले. पण मनातकालवाकालव करून..
ह्यातोफातटबंदीबुरूजं आजमूकपणे हेसगळं  सहन  करत आहेत,   
 ‘आमचंदुर्दैव रेअजून काय‘  असम्हणत
तर असो
इतिहासाची  सोनेरी पानेउलगडत आम्हीवेतोबा मंदिराजवळ  आलो.
धक्याच्या बाजूलाचअसलेले हेमंदिर , त्यातली  त्रिकोणीआकाराची शेंदूरचर्चितशिळा म्हणजेचवेताळ .
हे  गावकर्यांच  श्रद्धास्थान . त्यामुळे  एखादानवस बोललंअथवा नवीहोडीगलबतघेतली  कि दर्शनासाठी  गावकरयाचं  इथवरयेण जाणं  होतंचअसतमग त्यातएखादा   बकरा वगैरेबळी हिदिला जातो
आजही येथेअसंख्यांनी गावकरीहजर होते.मंदिरात कसलातरी कार्यक्रम  चालूहोता .
आरडा ओरड, किंकाळन  सुरु होत.  . त्याअर्थीएखाद्याच्या अंगातआल्यावर मंत्रतंत्र सुरुअसतात असंचकाहीस सुरुअसावं असातर्क करतजरास आतडोकावतं  अन कानोसाघेत मीबाहेर पडलो.
मंदिरा शेजारीचकाही पाउलं  पुढेटाकत मोठमोठ्या दगडीशिला पहुडल्याआहेत . तिथेजेवणाचा वगैरेकार्यक्रम सुरुहोता.   जंगी पार्ट्याच  होत्यात्या ..

दारू मटनावरकुणी  ताव मारतहोते . कुणी  पेंगतहोते  तर कुणीडी जेच्या  तालावर मोठ्याआवाजात  दारूच्या बॉटल्स  हाताशीघेत नाचगात होते.
अस हे  बेसूरचित्र पाहनं  अनते देखीलआपल्या स्वराज्यातीलअभिमानी  किल्ल्यावर ,
नकोसं झालंतेंव्हा पुढेसरसावलो .खांदेरीचं  सौंदर्य राखूया,
स्वच्छता राखूयाअशा अर्थीफलक मोठ्याअभिमानानं  लावलेला दिसला. ज्याने लावलात्याने खरचचांगल्या हेतूनेचलावला असेल. पण येथेयेणाऱ्याच त्याकडेसाफ दुर्लक्ष..
खाउन फेकूनदिलेल्या  पत्रावळ्या, ग्लासवगैरे  सर्वत्र  पसरलेल्या दिसल्या.
जागो जागीदगडांच्या राशीवरअन खुद्दमंदिराच्या भिंतीवरहि कुणीकुणी आपलीनावे रेघाट्लेली    दिसली. इतकी स्वतःच्यानावाबद्दल  …प्रेम अनअभिमानपणकिल्ल्याबद्दल  काहीच नाही..
काय बोलावंअन कुणासबोलावंआम्हीपुढे निघालो. किल्ला जवळजवळ आतापाहण्यात आलाहोता . अजूनहीएक गोष्टमात्र आमच्यापासूनजणू आंधळीकोशिंबीर चाखेळ खेळतहोती. ती
एकमेव गोष्टम्हणजे ‘जादुईदगडी शिळा ‘ .
जिचा आम्हीइथवर आल्यापासून  शोधघेत होतो. पण कुठेते नक्कीकळेना .
धक्क्याला लागुनचसमोर खांदेरीचाआराखडा  रेघाटला आहे. त्यावर एकवार  नजरडोकावली तेंव्हाते दर्ग्याच्याआसपासच आहेते कळून  आलं  . मगपाउलं  हि पटपटपुढे निघाली.
समोरच दीपगृहआपल्या ऐटदारशैलिनीशी खुणावत  होता. आम्ही त्याचदिशेने पाउलं  टाकूलगालो .
१८६७ मध्ये, २५ मीटरउंचीच हेषटकोनी  दीपगृह  बांधण्यात आलं. सध्या ते  
मुंबई पोर्टट्रस्ट च्याअखत्यारीत आहे. अन सरखेलकान्होजी आंग्रे  ह्यांच्या  नावानेते आतारूढ झालंआहे. महाराजांच्यानिधना नंतरमराठी आरमाराचेसामर्थ्य वृद्धिगंतकरणारे  सरखेल कान्होजीआंग्रे,
आरमार प्रमुख, परकीय आरमारीसत्तांना जेरीसआणून सोडणारे, आपली दहशतवठविणारे,
त्यांना मनोमनमुजरा करतपुढे सरसावलो.

उन्हाची थोडीबहोत झळआता अंगावरयेत होती. सूर्य नारायणहि  डोक्यावर तळपूलागले होते.
एक एकपाऊलं   टाकत आम्हीगर्दछायेच्या भल्यामोठ्या वृक्षाखाली विसावलो.
येथून काहीपाउलान वर   दर्गाहोता . त्याआधी तोजादुई मेटालिकआवाज येणारादगड.


तो दिसलाअन मनातलाशीणच  निघून गेला. प्रत्येकाने एकएक  धोंडा हातीघेत त्यावरआघात करायला  सुरवातकेली . आणि  त्यातूनखरचमेटालिकसाऊण्ड  येऊ लागला.
आघातातून हास्यफुले उमळू  लागली  . मनातलीती जादुई  आसपूर्ण झाली.

आता पुढचं  पाऊलं  दीप गृहाकडेवळल
ते पाहण्यासपूर्व परवानगीलागतेहे इथेमुद्दाम नमूदकरू इच्छितो.
आमचं भाग्यअस किआमच्या सोबतअसनार्या  कलागुणी मैत्रिणीच्या भावोजींचीओळख होती.
त्यामुळे  ते सारंजवळून पाहण्याचीआयती संधीचचालून आली  . अननुसतंच पाहणं   न्हवे  तर  त्याचीकार्यप्रणाली हिसमजून घेताआली.
त्यासाठी त्याकाकांना मनोमनधन्यवाद , ज्यांनीआमच्यासाठी  तसदी घेतली. अन अगदीखुल्या मनानंमाहिती दिली.
दीप गृहहावरून समुद्राचंअचाट रूपं  अननयनरम्य परिसर  नजरेस  पडतं.
गलबत नौकासागरी लाटांवरतरंगताना दिसतात.
आम्ही तेसगळं  पाहून जाणूनअंतर्मुख होवूनबाहेर पडलो.
हा परिसरऐकूनच हवेशीरआहे  . खेळती हवा, गर्द  दांट सावलींचीझाडं, मोकळा  आवारंअथांग  समुद्रवार्याच्याझोतावर फिरकनारी  पवनचक्कीमनालासुखद अनुभवदेणारे हे  क्षण..आम्हाला जागचे  हलूदेत न्हवते. काही क्षणआम्ही तिथेचनिवांत विसावलो  .

पुढे गीतूने उंबराच्याझाडाशी शिवरायांचीअन शंभूराज्यांची प्रतिमाठेवून
शिवरायांची आरतीम्हणवून घेतली. अन सिंहगर्जनेसह ललकारी  देतपरिसर दणाणूनसोडला .
खांदेरी चीदुर्गभेट परिक्रमा  आताआमची पूर्णझाली होती. .
तेवढ्यात  तिथलेच  शिर्के नावाचेगृहस्त अनत्यांची टीमनि आमच्यात  ,  खास करूनगीतू , ह्यांच्यातइतिहासाच्या ह्याअमुल्य ठेव्याबद्दल , होतअसलेल्या अनास्थाबाद्द्लचर्चा रंगली.
रोजच्या होणार्यादारूच्या पार्ट्या, रेघाटलेली नावं  , केरकचराह्याबद्दल खंरतर  जनजागृती झालीपाहिजे . गावातल्यालोकांत तरी
दुपारी च्या आसपासत्या दीपगृहातील कर्मचाऱ्यांचानिरोप घेत  आम्हीपुन्हा थळ  साठीरवाना झालो. सागराचं  ते विशालरूपं  पुन्हा अनुभवत.
त्याच्या डोईवरीहेलकावे घेत.. तरंगत्या होडक्यातून..फेसाळल्या  लाटांचा  शिडकावा अंगावरघेत .. खांदेरीउंदेरीला  मनोमन मुजराकरत ..
संध्याकाळी वाजेपर्यंत तरीआम्ही नारलीपोफळींच्या बागेत, थळ गावीकलाच्या  गावीनिवांतपणे पणे  हिंडकतहोतो.
वरण भातभाजी, भाकरीपापडलोणचं, फ्रायकेलेली मच्छी, भुर्जी  ह्या घरीबनवलेल्या लज्जत, चवदार पदार्थांवर  तावमारत जोतो अगदीभरघोस  जेवून ,तृप्त  होवूननिवांत पहुडलेला.
कुणी बागेतचक्कर मारतहोतं. कुणीगप्पांत रंगलेलं, कुणी शांतझोप घेतहोत .
जवळ जवळदीड  एक तासआम्ही ब्रेकघेतला . अनतेथून सार्यांचानिरोप घेतपुढे निघालो.
सांजवेळी मांडावातपोचलो . तेंव्हासूर्य नारायणाची  लालतांबूस किरणेक्षितिजाशी पसरलीहोती .
तो हळुहळु ह्याअथांग  सागरात विलीनहोण्यास आसुलेलाजणू ..
त्याच तेरूपं अनकिनाऱ्याशी गाजमनाला पुन्हापुन्हा ह्या  भवसागरातढकलून देतहोती .

सूर्योदय अनसूर्यास्त हेमाझे आवडीचेक्षण , तेक्षण न्हाहाळतबसण हामाझ एकआवडता कार्यक्रम.
असे क्षणमी सहसासोडत नाहीतोएक आगळावेगळा अनुभवअसतो
तर असो..


कळत्या  सूर्यनारायनाला  निरोप देत , रात्रीअधिक गूढभासणार्या सागराशीकानगोष्टी करतआम्ही फेरीबोटीने आम्हीपुन्हा गेटवेला  पोचलो.
तेंव्हा कुणाएकाला दिलेल्याशब्दाची आठवणझालीती आधीपासूनच होतीम्हणा ..त्यासाठीपाउलं झपझप  दौडूलागलीदीर्घ कालवधी  नंतरहोणारी  एखादी भेट..मनाला वेळेच्याहि पुढेघेऊन जाते. ..
अशीच एकआसुलेली हिभेट ..माझ्यामनाला दौडूलागलीतुगडूक  ..तुगडूक  ..तुगडूक 
 आपलाच,
संकेत पाटेकर
०४.०४.२०१५ 

इतिहास  संदर्भट्रेक क्षितीज  
                         जल दुर्गांच्या सहवासातप्र. के घाणेकर
                         भटकंती मराठ्यांच्या धारातीर्थांचीपराग लिमये 

    प्र. ची  – 1 
    गेट वे ते मांडावा ..साठी रवाना 

 
     प्र. ची  – 2

 
     प्र. ची  – 3

     प्र. ची  – 4

 
     प्र. ची  – 5

     प्र. ची  – 6
    रंगाची उधळण

   
    प्र. ची  – 7

 
     प्र. ची  – 8
    लक्ष्मी आईची कृपा..

   
     प्र. ची  – 9
    वल्हव रे नाखवा .. वल्हव वल्हव..

      प्र. ची  – 10
     खांदेरी – उंदेरी

     प्र. ची  – 11
    दिसलेला डॉल्फिन ..

   
     प्र. ची  – 12

     प्र. ची  – 13

   
    प्र. ची  – 14

   
    प्र. ची  – 15

     प्र. ची  – 16

 
    प्र. ची  – 17
   तटबंदी बुरुज ..

     प्र. ची  – 19

 
     प्र. ची  – 20
     उन्ह वाऱ्यांनी अन सागरी लाटांनी ढासळत चाललेली तटबंदी  ..

 
     प्र. ची  – 21
     मोठ मोठाल्या दगडी चिरा एकमेकांवर ठेवून रचलेला   बुरुज…

   प्र. ची  – 22
  हनुमान मंदिर..

   प्र. ची  -23

  बुद्ध विहार

 
     प्र. ची  – 24
     दरवाजा..

 
    प्र. ची  – 25
    तटबंदी बुरुज अन फेसाळणार्या लाटा ..

 
     प्र. ची  – 26

 
    प्र. ची  – 27
    शिवरायांच  दुर्ग विज्ञान…. लाटांचा तडाखा बसू नये म्हणून घेतलेली काळजी ..दगडांची रास ..

 
     प्र. ची  – 28

 प्र. ची  – 29

    
    प्र. ची  – 30
    प्र. ची  – 31
     
     प्र. ची  – 33
     फेसाळ नाऱ्या लाटांना थोपून ठेवणारी दगडांची रास 

   
     प्र. ची  – 34
    अथांग पसरलेला सागर अन निळाई  …चौकटीतून

     
    प्र. ची  – 35
   एकांत , वपुंच्या   शैलीत म्हणायचं तर परिसराच मौन म्हणजे एकांत…तो एकांत  साधताना ..

   
    प्र. ची  – 36

                          आमची चिमुकली …, पुढची पिढी

   प्र. ची  – 37
    दगडांच्या राशी अन बुरुज ..

       प्र. ची  – 38
     तोफा हि सुटल्या  नाहीत …रंगून टाकलंय अगदी नावांनी ..  
      कधीकाळी   धडाड  नाऱ्या ह्या तोफा …आज मूकपणे उभ्या आहेत.

   
     प्र. ची  – 39
    गीतू अन आमची छोटी…माहितीची देवान घेवाण करताना ..

 
    प्र. ची  – 40
     खुद्द शिवारायंनी हि त्याचं नाव कुठे लिहून ठेवल नाही . पण आपण कपाळ करंटे ..अजून काय बोलणार .
   प्र. ची  – 41
   वेतोबा मंदिर …

    प्र. ची  – 42
    पाटी नुसती नावाला…

    प्र. ची  – 43   
प्र. ची  – 44
खांदेरी वर येणारे गावकरी ..

                            चिरया मध्ये रोवलेली तोफ…

     प्र. ची  – 48
    भांड्याचा आवाज येणारा एकमेव  जादुई  दगड …

   
     प्र. ची  – 49
    धडाडनारी तोफ अन रडार ..

    प्र. ची  – 50

   पवन चक्की..

    प्र. ची  – 51

    प्र. ची  – 52

    प्र. ची  – 53

    प्र. ची  – 54
   आमची छोटी …

    प्र. ची  – 56

 
    प्र. ची  – 57
    निवांत पहुडलेल्या नौका..

 
     प्र. ची  – 58

 
    प्र. ची  – 59

 
   प्र. ची  – 60

 
    प्र. ची  – 61

    सांजवेळ ..

    सूर्योदय अन सूर्यास्त हे दोन क्षण माझे आवडते…

    परतीची  वाट @ मांडवा ..

0 thoughts on “खांदेरी – दुर्गदर्शन मोहीम”

Leave a Reply

Your email address will not be published.