क्षण क्षण वेचूनि जगलो मी..

क्षण क्षण वेचूनि जगलो मी..

घाव कुठूनही कसाही पडला तरी  तो अलगद झेलायचा  अन हळूच थोपवायचा , हे  कसब आपल्यात असलं ना  कि  नात्याला हि कसा गोडवा प्राप्त होतो….
‘हा माझा बेस्ट फ्रेंड संकेत ..’
नुकतेच लग्नाच्या  बेडीत  विराजमान झालेल्या आपल्या नवऱ्याशी तिने माझी ओळख करून दिली.
एकमेकांचा तसा वरवरचा  आमचा  परिचय झाला.  वरवर  का , कारण  इतक्या घोळक्यात , माणसांच्या  त्या राशींमध्ये , तिच्याकडचे अन त्याच्याकडचे आप्तमंडळी , कधी न भेटलेले , ना पाहिलेले , ना  कधी कुठे बोललेले,  पहिल्यांदा  भेटतात  तेंव्हा असंच काहीस होतं असावं नाही  का ? इतका वेळ असतोस कुठे म्हणा तेंव्हा ,
त्याच हि तेच  झालं. त्याने  हळूच माझ्याकडे पाहिलं. ‘अच्छा’ असं काहीस म्हणत  हलकंसं स्मित केलं .
तुम्हा दोघांनाही लग्नाच्या भरभरून शुभेच्छा असं म्हणत , मी हि पुढे होऊ  लागलो.
तोच वधूच्या बोहल्यात नटलेल्या माझ्या मैत्रणीने अडवलं.
थांब ना , फोटो…
तिने माझ्याकडे एकवार पाहत नवऱ्याकडे कटाक्ष टाकला.
तिच्या मनातील फोटोसाठीची तळमळ चेहऱयावर स्पष्टपणे दिसू लागली .
तसं लग्नाला तिच्याशिवाय मला कुणी परिचयाचंच  न्हवतं.  आलो सुद्धा एकटाच होतो . कारण दोघात घट्ट मैत्रीचे संबंध, येणे अगतिकाचे होतेच.  त्याकरीताच आज रजा घेतली होती .
दादरच्या , छबिलदास शाळे जवळील, एका लग्न सभामंडपात ,  विवाह सोहळा यथोच्छित पार पडत होता
मी आपला आलो, बसलो , जेवलो अन  आणि निमूटपणे  प्रेजेंट देण्याकरिता वाट पाहत बसून होतो .
प्रशस्त असा तो एसी हॉल, अलवार ताल देत  सुरु असलेले श्रवणीय Instrumental Song ,  नाकी गंधळत असलेला अत्तराचा सुगंधी शिडकावा , शुभेच्छांचा मोकळ्या वर्षावा  करिता, नटून थटून आलेल्या सगे सोयरे , त्यांची  उडालेली धांदल , लगभग…..नजर एकटक टेहाळत होती.
घोळक्या घोळक्याने , कुटुंब  कबिलासह  वधू वरांच्या   भेटीकरिता , सगळ्यांचीच  घाई गर्दी  उसळली  होती. रांगेत हळूहळू  जो तो पुढे सरत होता . नव्या जोडप्याला भेटून , ग्रुप  ग्रुपने  फोटो काढणाऱ्यांचीतर  संख्याच  जास्त दिसून येत  होती. अपवाद काय तो माझ्या एकट्याचा असावा बहुदा ,  कारण मी एकटाच असा  होतो .
एकटाच असल्यामुळे , आपण कधी पुढे व्हावं  ?  हा प्रश्न मनाशी उभा ठाकलेला . त्यात  शिवाजी पार्क ची ओढ खुणावू लागलेली . पुढे फावला वेळ होताच. अन  दुपारचे दोनच वाजले होते.  
अधिक वेळ खर्च न करता आपल्याला आता निघायला हवं,  ह्या उद्देशाने मी शेवटी जागेवरून उठलो अन  त्या घोळक्यात मिसळून गेलो . अर्थात  रांगेत उभं राहूनचं ,  त्या दोघांचीही भेट घेतली. शुभेच्छा दिल्या, थोडं बोलणं झालं  आणि निघण्याच्या तयारीत असता…
मैत्रणीचे बोल उमटले ‘थांब ना..फोटो …
नाही नाही म्हटलं तरी मैत्रिणीच्या आग्रहातर थांबणं होतंच…
पण तोपर्यंत घोळक्या घोळक्याने  इतर  ग्रुप हि आमच्यात  समाविष्ट  झाला.
बोलण्याबोलण्यामध्ये हास्याचे मनोरे चेहऱयावर उमटवत   सगळे फ़ोटोकरीता रांगेत उभे राहिले. त्यात मी हि होतो  , मैत्रिणीच्या बाजूलाच , दोघांच्या डावीकडे ..कॅमेराशी पाहत …उभा,
फोटोग्राफर तयार होताच …फक्त क्लीक  करायचा अवधी होता.
तितक्यात  कुठूनसा हलकासा स्वर कानी आला..अर्थात तिच्या नवऱ्याने तिला उद्देशून म्हटलेले ते बोल,
एकत्रित फोटो काढला तर चालेल ना ?
ते बोल ऐकून मी हसलो स्वतःशीच , विचाराचं पर्व एकाकी सुरु झालं  माझ्या  मनाशी …
वाईट वाटण्यासारखं असं काही नव्हतं.  पण तिला दोघासमवेत , म्हणजे नवरा बायको अन मी असा , एक त्रिकोणी फोटो घ्यायचा होता.  पण इतर मंडळी त्यात मिसळल्याने  तो बेत तिथेच कोलमडून पडला.अन ती कोमजल्या फुलासारखी क्षणात हिरमसून गेली.
चेहऱ्याशी हास्यतुरा उजळवत  …, पुन्हा इतरांशी ओळख पाळख करून घेण्यात,  शुभेच्छा वर्षाव स्वीकरण्यास …
मी मात्र निरोप घेत तिथून निघालो.
रस्त्याशी चालत चालत ..विचारांच्या गतीने ,  स्वतःशी हसत…स्वतःशीच बोलत…
चला, म्हणजे तडजोडीची सुरुवात हिच्यापासून झाली तर …..आणि ती हि ह्या क्षणापासून ….
आयुष्याचा नवा अध्याय सुरु म्हणजे…..
मी स्वतःशीच बोलत सुटलो .
लग्नाच्या काही दिवस आधीच आम्ही भेटून ह्याच  विषयवार बोलणं केलं  होतं. लग्नाची पत्रिका घेऊन ती भेटायला आली होती.
संकेत आज सरप्राईझ द्यायचं आहे . काय सांग ? तिने उत्साहित म्हटलं .
मी लगेच तारलं. लग्न ठरलं ? हो रे , तुला कसं कळलं.? 
त्यात कळायचं काय , साधं सोपं गणित आहे . व्यक्ती ओळखून असल्यास अन नेहमीच संर्पकात असल्यास , गोष्टी मनातूनही कळतात रेssss
बराच वेळ आम्ही बोलत होतो …आयुष्य अन लग्न ह्या विषयवार .. 
तू नाही तर त्याने , दोघांनाही एकमेकांना सांभाळा , आपला अहंकारी ठेवा बाजूला ठेवून … 
लग्न लग्न आणि लग्न म्हणजे तरी काय ना , एकमेकांना सावरणं , सांभाळून घेणं …
आयुष्याचा तुझ्या माझ्या प्रवास वाटेपर्यंत , मनमोळी ताल सुरांची लयबद्ध सुरावट ऐकत ऐकत…धुंद होत …है ना ?
आयुष्याच्या  ह्याच  प्रवासात, घाव कुठूनही कसाही पडला तरी  तो अलगद झेलायचा  अन हळूच थोपवायचा, हे  कसब आपल्यात अंगी पाहिजे बस्सsssss
 ते असलं म्हणजे ना sss नात्यात गोडवा येऊ लागतो.
तो गोडवा आपण टिकवायचा..आयुष्यभर ..
मी पटपट पाय  उचलत आयडियल बुक डेपो च्या येथून उजवीकडे  कडे वळसा घेतला. 
दादरच्या शिवाजी पार्क कडे पाउलं झपझप पडू लागली. तसं तशी विचारांनी हि दिशा बदलली .
लग्नाच्या गोष्टींचा विसर पडला अन गत आठवणीच्या प्रेम झुल्यावर बागडत ….मन , रम्य खेळात गाऊ लागलं…
आलो आलो बघ सखे त्याच पुन्हा वाटेवरी
तुझ्या माझ्या नात्याची हिच ना , पहिली भेट खरी …

क्षण क्षण वेचूनि जगलो मी..

 – संकेत पाटेकर

Leave a Comment

Your email address will not be published.

Translate »