तुला कोणत्या नावाने हाक मारू ?

‘संवाद’….हा मग कुठल्या हि नात्यातला असो .तो विशेष प्रिय असतो . ‘जेंव्हा ती व्यक्ती हि तितक्याच जिव्हाळ्याची असते,  तेंव्हा ‘
मग हा संवाद , आठवणीतला असो …जणू तो आताच घडलायं …घडतोय, ह्या क्षणी …इतकं आपण त्यात गुंतले जातो.  कधी कधी …
अन त्यात जर दोन  मनातला प्रेम संवाद असेल तर …
त्यात तर मग विशेष लाडीगोडी, रुसवा असतो ,नखरा असतो, खट्याळपण असतं. ओतीव प्रेम असतं ….
असाच हा संवाद ..त्या दोघातला ..
‘गुड मोर्निंग ….’
त्याच्या नेहमीच्याच स्वरील सवयीने त्याने तिला ‘गुड मोर्निग’ केलं.
(दिवस असो वा रात्र ..ह्याचं ‘गुड मोर्निंग’ कायम ठरलेलं . आजची सुरवात देखील अशीच.)
‘गुड मोर्निंग …’
गुड इविनिंग झाले हं …!
तिच्या मधाळ आवाजतील हे शब्द्गर त्याच लयीत घुमूघुमू लागले.
‘हम्म ..’’
मग निघालीस ऑफिस मधून ..?
हो ..थोड्या वेळा पूर्वीच .
‘ओके …’
मग काय केलेस घरी , दिवसभर ? तिने प्रश्न केला ?
फुकट गेला रे दिवस ?
‘अरे’ रे रे , रे …तिच्या शब्दांचं खट्याळ स्वर उनाडू लागला.
घरी असल्यावर असंच होतं दिवस वाया जातो..काय करणार., त्याने आपलं कारण बोलून दिले.
‘अच्छा… ’
‘हम्म…’
‘मग तुला सुट्टी न्हवती. ?’
ना रे , आम्हाला सुट्टी नसते अशी..
अच्छा…

हं …
तर…. तू मला कोणत्या नावाने हाक मारशील ?
काल परवाच झालेल्या दोघांमधल्या संवादातला, ‘ तोच मुद्दा आज, तिने पुन्हा उपस्थित केला. अगदी लाडीकतेने.., शब्दांना आलाप देतं.
कोणत्या नावाने हाक मारू ?
तू ठरवले असशील ना काही ?
थोडसं विचारात डोकावल्या सारखं करतं (खर तर त्याला, तिचे जे नाव आहे , तेच अधिक पसंत.. पण तरीही )
‘’ वेडू ,वेडे हे कसं वाटतं ?’’
‘ना………..’
मग …हृदया कसं आहे ?
‘काय’ ? अचंबित झाल्याप्रमाणे तिचा स्वर उंचावला गेला .
‘हृदया’ ………..हे काय नाव आहे का ?
‘हो.’.त्याने उत्तर दिलं .
कोणाचं नाव आहे ?
हृदयाचं , हृदय असतं नां , आपलं हृदय.. त्याचंच हृदया. ‘ त्याने खुलासा केला.
राहू दे .. .माझं सखीच छान आहे .
हम्म , छान आहे .
कारण ते माझं नावं आहे.
‘हो..’ .त्याने हि तिला दुजोरा दिला .
अन मला ते आवडतं , ‘ तिने स्वतःच्या नावाची अशी अभिमानी पसंती दर्शवली .
मला हि ..
तुला कशाला ?
असंच , ‘त्याने घुमजाव करत ऊतर दिलं.
असंच…पण कशाला , काहीतरी कारण असेल ना , हं ? जरा नकट्या आवाजातला स्वर ओढत तिने म्हटलं ?
कारण ते तुझं नाव आहे नां ..गोड- मधाळ असं ..!
‘अच्छा… ’
‘हम्म … ’
’हे ना ’ ? तिचा हा नेहमीचाच खट्याळ अन वेडावणारा शब्द…तिने पुटपुटला , खास त्याच्यासाठीच .
बरेच दिवसाने आज ..’हे ना’ म्हटलेस ..
‘हा …’
मग , माझी आठवण काढत असशील ना ?
‘हो…’
किती ? अगदी निरागस बाळासारखं कुतूहलाने तिने प्रश्न केला .
किती म्हणजे ? हे सांगू शकतो का ? किती प्रेम आहे?किती आठवण काढतो ते ?.
‘शब्दात वर्णन करू शकतोस ना ..? तिने अल्पशा रागातच जरा हेकटले .
नाही सांगता येणार ..वेडे , ते विस्तारलेल्या आकाशासारख असतं. त्याला मर्यादा रे कसली ? तो उत्तरला .
‘हम्म…’
बाकी , कसं चाललय सगळ , घरातले वगैरे ..? त्याने खुशालकी विचारली.
ठीक आहेत , ‘ मी घरात सगळ्यांशी मिळून मिसळून असते . पण एक मात्र आहे , माझ्या घरी माझाच जास्त दबदबा असतो .’
अच्छा…, दबदबा ..गुड …!
‘हा….’
पण असंच मिळून मिसळून अन आपलेपणानं राहावं ….सर्वांशी ! तो उत्तरला.
‘हम्म..’
‘अरे ऐक ना, ‘माझ्या ऑफिस मध्ये ना , एक नवीन मुलगा Join झाला आहे .
तर तो नां माझ्याशी सगळ काही शेअर करत होता. घरापासून ते त्यांच्या गर्ल फ्रेंड बद्दल आदी सगळ मोकळेपणने..
‘अरे, वा ..छानच कि ..’
कसं असतं सखे,’ एकदा विश्वास जडला ना , कि माणसं अगदी स्वताहून , त्यांच्या सुख दुखाशी निगडीत असलेले क्षण आपल्याशी शेअर करतात. अन मोकळे होतात. हलकं वाटतं त्यांना ..
‘हो…’
तो जो विश्वास असतो ना , तो महत्वाचा असतो. तो मिळवला कि माणसं आपलीशी होतात . आपल्यात मिसळतात .
‘अच्छा ….मग तुझं माझ्यावर आहे ? तिने प्रश्न केला.
काय ? त्याने प्रती प्रश्न केला.
‘विश्वास ..’
कोणावर ?
‘माझ्या….वर …………….’
माझ्या आणि मग वर.. हयातल्या पहिल्या शब्दावर जोर देत अन मग पुढे अंतर ताणत.. हा शब्द, तिने असं काही उच्चारला (ते हि दोन वेळा ) कि त्यातले ते नखरे अन त्यातली ती जादुई लय अजूनही त्याच्या मनावर रोमांच उमटवून जाते.
आज हि तो असाच त्या नशेत धुंदमुंद झाला होता . त्याच्या मुखी तिचं नावं हळूंच उमटलं जातं होतं . …सखे……….वेडी सखे ! 
आठवणीतला हा संवाद .त्याला निसटलेल्या त्या काळात फरफटुन घेऊन जात होते.
उरलंच काय होतं म्हणा आता….आठवणीतले हे अनमोल क्षणचं..
सांजवेळच्या ह्या भरगर्दीत हि ….सागरी किनारी .. एकटक बसून ….तो हे सारे क्षण, ‘ पुन्हा अनुभवत बसला होता.’ भरीव हसऱ्या अश्या आठवणीच्या संगे ….’
आसपासच्या धावत्या जगाचं हि त्याला भानं उरलं न्हवतं .

प्रेम हे असंच असतं. ‘स्व’ ला विसरायं लावणारं…
इथे प्रत्येक क्षणाच्या आठवणी होतात . अन तो ठेवा आपल्याला हवा तेंव्हा उलगडता येतो.
पण ..त्या आठवणीतलं ते पात्र ..आपल्या सोबत असेलच अस नाही.
तुटलेल्या न दुरावलेल्या मनाची हि कळ त्याला ही अशीच स्वस्थ जगू देत नव्हती.
पण तरीही तो हसत होता . आठवणीतल्या तिच्या संगे……, नव्या आशेसह …..!
हृदया – एक स्वप्नं सखी..
– संकेत पाटेकर
१०.१२.२०१५
 

Leave a Comment

Your email address will not be published.