प्रति – १ 
अबोली असूनही किती बोलकी आहे हि …
प्रति – २ 
ह्या कोवळ्या उन्हावाणी कुणीतरी असावं, हळूच आपल्यात सामावणारं अन आपलेच छुपे भावरंग नव्याने उजळवून देणारं…

प्रति – ३ 
कधी कधी वाटतं ह्या बहरलेल्या , कधी निष्पर्ण झालेल्या , स्वतःतलं सर्वस्व वाहून देणाऱ्या , केवळ देणं जाणणाऱ्या , ह्या झाडांसारखं, आपल्याला हि निःस्वार्थाने जगता येईल का ? क्षणा क्षणातले एक एक घाव जिरवून , ते हळूच थोपवून , आनंदाचे तुषार फुलवणं, खरंच जमेल का ? 
ते हि दुसऱ्यांच्या चेहऱ्याशी , अंतरात्म्याशी ..स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव हि न होंऊ देता. सर्वस्वाचं दान करत ?
उत्तर येतं नाहीच . नाही जगता येणार , कारण स्वार्थाचा इवलासा का होईना अंश आपल्यात कुठे कुठे दडलेला असतोच नाही का ? तो उफाळून वर येतोच, त्याला हवं तेंव्हा , हवं त्या वेळी .
हो ना ?
वाटतं तितकं सहज सोपं नाही रे हे, जखमांचे गहिरे घाव झेलुन हसऱ्या आनंदी क्षणाचे , मुक्त वाटप करणं आणि क्षण क्षण जगणं. संयमाची कठोर परीक्षा असते ती, तेवढी आपली क्षमता नाही . पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. त्या लेव्हल पर्यंत नाही . पण निदान , काही क्षण..स्वतःचा अहंकार बाजूला सारून , दुसऱ्याचं आनंद होता येईलच ना ….
मला तो आनंद होऊन जगायचं आहे . बस्स …
– संकेत १०.०२.२०१७
प्रति – ४ 
हसता स्वतःशीच ऐसा , मी भावबंध जागतो ..
जागतो मनातल्या त्या संवेदना मी जागतो …
– संकेत ०७.०२.२०१७
प्रति – ५ 
पानातही फुलते नक्षी सौन्दर्याची…. 
जशी हृदयातं आर्त प्रेमाची …
– संकेत
प्रति – ६  
एकटा मी ..एकटा हा  असा …

प्रति – ७

सांजसंध्या उमलते तेंव्हा…

प्रति – ८
दिवस ढळूनी जातो 
हाती ‘बाकी’ ठेवूनं काही… 
उद्या पुन्हा उजळीतो नव्याने 
नवं ‘अधिक’ घेऊनं काही ..
– संकेत 
प्रति – ९
आयुष्य वेचताना …  
प्रति – १०
क्षितिज भरारी..

प्रति – ११ 

सौन्दर्य तेज..

प्रति – १२
काय बघतोयस असा ? असं तर नसेल ना सांगायचं ?

प्रति – १३
मी लिहावं तुने ते वाचावं
शब्द मोत्यानं आभाळ हि हसावं
– संकेत

Leave a Reply

Your email address will not be published.