कुणी तरी हवं असतं…!
मला नाही मांडता येत रे, तुझ्या सारखं असं काही,

पण सांगू… कुणी तरी हवं असतं आपल्याला,
आपल्या जवळ बसून, आपलेपणाच्या संवादात हरवून देणारं असं कुणी…
आपल्या नजर कवाड्यातून मनातलं अचूक भाव ओळखणारं कुणी..
आपल्या मनाला जाणंणारं, हवं तेंव्हा, हवं त्या क्षणी, हवं त्या वेळी, कुठूनही, कसंही हळूच येऊन,आपल्याला थोपवणारं, घट्ट मिठीत घेणारं,आपल्यात मिसळणारं,हसवणारं, छेडणारं, वेडं म्हणणारं आणि म्हणवंणार कुणी…
कुणी तरी हवं असतं….रे,
कधी रागावणारं, कधी लाड पुरवणारं, प्रसंगी समजून घेणारं, समजून देणारं, आपली काळजी वाहणारं, काळजी घेणारं, आणि भरभरून प्रेम करणारं कुणी..
कुणी तरी हवं असतं …
आपल्या मनाची हि बाजू घेणारं.., मनातून मनाशी नातं जोडणारं, आपलं वर्तमान आणि भविष्य घडवणारं…आपलं स्वप्नं होणारं, आपल्यात विसावणारं, कुणी तरी..
कुणी तरी हवं असतं रे…..
एकटेपणात साथ देणारं, आणि एकांतात हि आपल्या मनाला सुगंधित करणारं..
कुणी तरी हवं असतं…बस्स..!
~ संकेत पाटेकर

Leave a Reply

Your email address will not be published.