किल्ले रोहीडा

 
 
किल्ले रोहीडा –
पुणे भोरपासून अवघ्या काही अंतरावर वसलेला हा देखणा अन तितकाच लढवैय्या असा किल्ला. पाहून खरं तर ऊर अभिमानानेच धडाडू लागतो. कारण ह्याच परिसरातून अवघ्या काही अंतरावर, दिमाखाने उभा असलेला ‘रायरेश्वर’ त्यावर काही सवंगडी मावळ्यासह , ‘ छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली होती, असं म्हणतात.
हे राज्य व्हावे, ‘ हि तर ‘श्रीं’ ची इच्छा आहे, असे मानून, स्वराज्याची चेतना अंगी भिनवून ..आपल्या रांगड्या अन पौलादी मावळ्यांसह ‘सिंहगर्जना’ करत, स्वराज्य स्थापन करणारे..
‘छत्रपती शिवराय’  हा एकमेव अन एकच असा ‘शिवकल्याण राजा..जाणता राजा’ ….!

जो इथल्या साऱ्या प्रजेला पूजनीय अन आदरणीय आहे. ज्याची प्रतिमा अजून हि इथल्या प्रजेच्या हृदयात लक्ख प्रकाशून आहे. ज्याच्या महान कर्तुत्वाचा प्रेरणादायी इतिहास,  काल बदलला अथवा बदलत गेला तरी हि ..ह्या जन-मनात कायम
अभिमानाने प्रेरित राहील. असा हा सार्वभौम ‘शिवकल्याण राजा ..!
 
 
त्यांस मनोमनं मुजरा करत आपली पाऊलं आगेकूच करू लागतात,  ती रोहीड्याकडे.. रोहीड्या दिशेनं. सात बळकट बुरुजांचा अन पाण्याचा मुबलक साठा, अंगा खांद्याशी घेऊन वसलेला, लागोपाठ तिनं एक बळभक्कम ‘दरवाज्याची साखळी’ अन ‘तटबंदी’ ने सज्ज अन चौकस असलेला हा रोहीडा किल्ला.
सृष्टी सौंदर्याने तर ‘लखलख’ लेलाच आहे. त्याचं ते सृष्टी रूपं पाहून तनमन तर त्यातच हरखून जातं. उधाण वारा हि अगदी बेभान होवून इथे, सैरवैर उनाडक्या करत असतो.
तेंव्हा वाटतं, आपल्या ह्या दोन्ही पंखांची (हाताची ) उघड झाप करून आपण हि त्यासवे, तो नेईल तेथे निघुनी जावे. फरफडत जावे. एखाद्या दोर नसलेल्या कटी पतंगासारखा ..वेड्या वाकड्या -वाटोळ्या घेत. कुठेही – कसेही..ह्या विस्तारलेल्या निळाईला गवसणी घालत.
बस्स…पण तितक्याच कुठूनसा एखाद चीटपाखरू मुक्तपणे विहार करताना दिसतो. अन त्याची ती अंग-चलाखी झेप मनाभोवती फिरकी घेत राहते.

अन पुन्हा आपलं हे मन कल्पनेच्या दुनियेत.. हळूच विसावलं जातं.
  – संकेत य पाटेकर

 

 
 
 
 

फोटो गॅलरी..

0 thoughts on “किल्ले रोहीडा”

  1. आज दि. २७ एप्रिल २०१६ च्या लोकसत्ता दैनिकात लोकभ्रमंतीमध्ये माझा ई-भटक्यांच्या जगात हा लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखात आपल्या या ब्लॉगचा उल्लेख केला आहे. जरुर वाचा:

    http://prabhunarendra.blogspot.in/2016/04/blog-post_27.html

Leave a Comment

Your email address will not be published.