कलावंतीण सुळका – kalavantin sulakaa

सोमवार पासून ठरवलेलं, येत्या रविवारी कुठेतरी जायचंच ट्रेकला, त्याह्याने मी माहिती काढत होतो एक एक किल्ल्याची.
पण काहीच सुचत न्हवतं कुठे जायचं..

शनिवार उजाडला तरी काही ठरलं नाही. कलावंतीणदुर्ग येथे जायचं असं मी बुधवार का गुरवारी मित्रांना सांगितलं होतं तितकंच. पण पक्क न्हवतं. शेवटी शनिवार रात्री ९:३० वाजता कलावंतीणला जायचं आहे हे मी ठरवून टाकलं आणि मित्रांना लगेच फोन फिरवले. सकाळी ९:४५ वाजता असणारी पनवेल एसटी डेपो मधून सुटणारी ठाकूरवाडी एसटी पकडायची असं निश्चित झालं.

कल्याण हून एक मित्र येणार होता. वाशीवरून दोघे येणार होते आणि ठाण्याहून आम्ही तिघे मित्र. असे सहाजण होतो आम्ही. सकाळी जायचं होतं म्हणून आपोआपच जाग आली. तयारी वगैरे करून पाठीवर सॅक घेऊन मी आणि माझा मित्र आम्ही दोघे निघालो. ठाणे स्टेशनला आलो. एक मित्र अजून येणार होता. त्याची वाट पाहत बसलो. सकाळची ८: ०१ ची पनवेल ट्रेन होती. ८:०० वाजण्यास फक्त ५ मिनिटे शिल्लक होती. गाडी सुटायची वेळ आली होती अन मित्राचा अजून पत्ता न्हवता. शेवटी १ मिनिटाचा अवधी शिल्लक असताना तो आला. तेंव्हा कुठे हायसं वाटलं.

९:१५ च्या सुमारास आम्ही एसटी डेपो तिथे पोहोचलो. इतर मित्रांना भेटलो . त्यातला एक मित्र दीड तास अगोदरच तिथे पोहोचला होता. त्यामुळे एसटी कुठून कोणत्या फलाटा वरून सुटते ? किती वाजता सुटते ? वगैरे सर्व माहिती त्याने काढली होती. त्यामुळे काही प्रश्न न्हवता. मैत्री दिन त्याच दिवशी होता. त्यामुळे एकत्र भेटलो तेंव्हा एकमेकांच्या हातांना रिबिन्स बांधल्या अन मैत्री दिन साजरा केला.

सकाळच कोणी काहीही खाऊन न्हवतं आलं. .त्यामुळे वडापाव वर ताव मारला..पाण्याच्या बॉटल्स भरल्या आणि एसटी येण्याची वाट पाहत बसलो. ९:४५ ची ती एसटी त्यादिवशी १०.०० च्या सुमारास आली. गर्दी इतकी न्हवती. त्यामुळे लगेच बसण्यास जागा ही मिळाली. सर्वांचं एकदाच तिकीट काढलं. सहा जणांचे ७२ रुपये झाले. एकाचे १२ रुपये.

साडे दहा – पावणे अकराच्या सुमारास आम्ही गावात पोहोचलो. समोरच V आकाराचा कलावंतीण अन प्रबळ गड दिसू लागला होता. एसटी तून खाली उतरल्यावर वारदोली-ठाकूरवाडी अशा नावाची पाटी वाचली अन समोर असणाऱ्या डांबरी वाटेने पुढे जावू लागलो.

पावसामुळे सर्व काही हिरवागार झालं होतं. मन अगदी प्रसन्न झालं. त्या हरित अशा वातावरणाने. मस्त शुभ्र धवल ते धोधो वाहणारे धबेधबे पाहून मन हरवून जात होतं. आम्ही पुढे पुढे जात होतो त्या वाटेने. वाट पुढे एका धबधब्याजवळ जात होती. एका माणसाने आम्हास सांगितले. मग तसाच पुन्हा माघारी फिरलो अन दुसऱ्या डांबरी वाटेने पुढे जावू लागलो.

जाता येता काही माणसे दिसत होती. रस्त्यावर त्यांना विचारलं कलावंतीण ला कसं जायचं. त्यानाही काही व्यवस्थित सांगता नाही आलं. आम्ही पुढे पुढे जाताच होतो. वाट काही सापडत न्हवती. एक तास आमचा असाच वाया गेला. कुणीतरी आम्हास सांगितल कि जिथे तुम्ही उतरलात त्या गावातून मागच्या रस्त्यावरून गडाकडे जाणारी सरळ वाट आहे. आम्ही त्याच गावात पुन्हा १ तासाने परतलो. एक तास वाया गेल्यानंतर आमचा खरा प्रवास सुरु झाला कलावंतीणला जायचा.

गावाच्या त्या मागच्या रस्त्याने जाताना एक स्पा रिसॉर्ट लागतो. त्याच्या बरोबर समोरून एक वाट आहे ती सुळक्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचवते.
रस्त्याने मस्त रमत गमत – सुंदर धो धो वाहणार पांढरे शुभ्र धबधबे पाहत. हिरवळीने नटलेल्या त्या डोंगर दऱ्यांकडे पाहत आम्ही पुढे जात होतो.

 

 

गावातून जाणारी वाट हि जरा घसरणीचीच आहे. बारीक बारीक – मोठे मोठे असे दगडी..चिखल, त्यात पावसामुळे वाढलेले गवत. ह्यामुळे जरा जपूनच जावे लागते.
आमच्या हमेशा स्मरणात राहील !!

 
 
Add caption

0 thoughts on “कलावंतीण सुळका – kalavantin sulakaa”

  1. Dear Madam,

    My Name is Nilesh Bhutambre From Prabalgad Village (I am called "Bhau" by those close to me, especially by everyone in my village) I run a small scale tourist service wherein I provide food, lodging facilities and guide services to tourists who visit Prabal Machi.( All Information of Prabalgad and Kalavantin Durg ) The URL of my website is: http://prabalgad.jigsy.com/ .

    With Regards

    Nilesh Bhutambara
    Mob:08056186321

Leave a Comment

Your email address will not be published.