कट्ट्याचं नुतनीकरणं अन आठवणीतले ते क्षण ..

पुष्पक कट्टा’एकदा का लिखाणाला सुरवात केली अन शब्दांशी सुत जुळले कि ना -ना विविध विषय आपुसकच मागे मागे धावून येतात . मग ते कधी कुठे कसे … ते काय सांगता येत नाही. आसाच हा एक विषय काल रात्री अचानक डोक्यात भूनभुनला अन म्हटलं चला ह्यावर लिहू काहीतरी .म्हणून लिहावयास घेतले.

कट्ट्याचं नुतनीकरणं अन आठवणीतले ते क्षण ..

तसा ‘कट्टा’ म्हटला कि नजरेसमोर येते ती नित्य नेहमीचीच एक ठराविक भेटीची जागा. मित्र मैतरणी अन ना ना विविध गप्पांत उधळलेले , कधीही न विसरता येणारे ते सुवर्णरेषित सोनेरी क्षण ..अन क्षण म्हटले कि ते विविध ढंगी-विविध रंगी असतातच.

मनाच्या अंतरंगात उसळणाऱ्या अश्या विविध ढंगी-विविध- रंगी भावनांना अश्या कट्ट्यांवर एक मोकळीक मिळून जाते. आपल्या आयुष्यातले मग ते सुखाचे प्रसंग असो वा वेदनेने कळवळनारे भाउक क्षण असो  समोर विश्वासार्थ नात्याची गुंफण असलेली व्यक्ती असली म्हणजे मनात दडलेल्या त्या असंख्य भावनांचं दार हळूच उघडलं जातं. असाच हा आमचा किंव्हा माझा म्हटलं तरी चालेल एक ‘कट्टा’ विवध रंगी भावनांचा, हसऱ्या भाव गंधाचा ‘पुष्पक’ ‘कट्टा’ पुष्पक हॉटेल …

नात्यातली पहिली जोडी जी ह्या कट्ट्यावर अवतरली असेल ती म्हणजे आम्हा भाऊ- बहिणीची जोडी. माझी लाडकी प्रिय बहिण ….जिने तिच्या प्रेममऊ शब्दाने अन मायेनं मला आपलंस करून टाकलं. वेडावून सोडलं.

लोकं प्रेमात वेडी होतात…ते प्रेयशीच्या ,मैत्रिणीच्या ..मी मात्र माझ्या बहिणीच्या प्रेमात हरखून गेलो. ह्या कट्ट्यावरच  बिर्याणीवर ताव मारत, एक एक कप चायचा घोट घेत ते सारे सुवासिक क्षण मनाच्या कप्यात कैद होत गेले.

ह्या कट्ट्यावरच आम्हा दोघांनी मिळून एक कविता हि रचली. ती पूर्ण केली. तो कागद तिच्या हस्त लिखीताचा अजून जपून ठेवलाय.

ह्या कट्ट्यावर तिच्या लग्ना आधी कित्येकदा भेटत असू….बोलत असू …एकमेकां विषय…जीवनाविषयक कधी तासभर तर कधी दहा पंधरा मिनिटे..गप्पांत अवांतर ..आता ते सारे क्षण फक्त आठवणीत उरलेत . कारण वेळेनुसार आहे ती परिस्थिती हि बदलत जाते. आता भेट होत नाही अस नाही. होते भेट, पण ह्या कट्ट्यावर नाही. पण जाता येता नित्य नेहमीचा तोच रस्ता असल्याने ..ती आठवण मात्र प्रकर्षाने होतेच होते. मग स्वताशीच पुटपुटत जातो …किती हसरे क्षण होते ते !…

असो लग्नानंतर मुलींच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळते. सारंच चित्र पालटतं. तसंच काही तिच्या बाबतीतही … पण कधीतरी ह्या कट्ट्यावर पुन्हा नक्कीच एकत्रित येउच …त्या आठवणी पुन्हा उजळवत ह्यात शंका नाही. .

ह्या कट्ट्यावरची दुसरी भेट म्हणजे माझ्या जीवाभावाचा मित्र ..हेमंत.

मित्र कधी साथ सोडत नाही. ते सोबतच असतात कायम असे म्हणतात वेळेप्रसंगी वेळेत हजर हि होतात. त्यातलाच हा खास जीवाभावाचा मित्र…हे माझं भाग्यच म्हणा ..! आठवड्यातून दोन एकदा तरी ह्या कट्ट्यावर आमची भेटहि ठरलेलीच.

पण ह्याच्या वेळेचा ठावठिकाणा हा कधीच नसतो. नित्य नेहमीच्या सवयीप्रमाणे हा भाई पाच एक मिनिटे बोलून  कधी कधी अर्धा एक तास खोळंबून ठेवतो  अन हजर झाल्यावर कारणे द्या ? चा तास अवितपणे सुरु होतो. मग कधी चहा तर कधी कॉफ्फी च्या एक एक घोट सोबत (ह्याशिवाय आम्ही इतर पदार्थांकडे वळतच नाही म्हणा ) ना- ना तर्हेच्या विषयवार आमचं अवांतर बोलन होत.

तर कधी ट्रेक विषयी गप्पा, पुढील ट्रेक चे प्लान ( असे प्लान कितीसे करतो पण त्यातले निम्मे हि पूर्ण होत नाही हि ह्यातली गंमत.) असो. उद्यां नाटकाला जावूया का रे ? चल नाही तर एखाद चित्रपट बघू ? अरे आपल्या बाळू दा ला फोन कर, अरे आपल्या ओमी बाबाला विचार येतोय का ? अरे तो नाय तो शॉपिंग करत असेल रे …हे ते नाना विविध हास्य क्षण …कधी भविष्याचा वेध घेत केलेली चर्चा, मग ते ‘लग्न’ असो वा लग्नातली ‘ती’ वा नोकरी … विषय खूप असतात बोलण्यासारखे ..न संपणारे ….अवांतर ..

तर मित्रा येतोयस ना ..कट्ट्याच नुतनीकरणं झालय आता …चल ये कट्ट्यावर …ह्या कट्ट्याची एक आवर्जून आठवण सांगायची तर माझा ‘Wallet’..बहिणीसोबत असंच एकदा बसलो होतो. गप्पात दंग होवून ….चहाचा एक एक प्याला घशात लोटत.

चहा पिउन झाल्या नंतर आद्य कर्तव्य म्हणून वालेट काढलं , पैसे देऊ केले अन तिथून दोघेही निघालो. .अर्ध्या वाटेत आलो तेंव्हा काहीतरी विसरल्याची आठवण झाली.

एक एक खिसे तपासून पहिले तेंव्हा लक्षात आल. कि ‘वालेट’ बहुदा ते कट्ट्यावरच विसरलो किंव्हा कुठेतरी पडलं. पैसे देवाण घेवाण मध्ये .. PAN कार्ड ATM कार्ड , LICENCE ह्या त्या गोष्टींचा भरणा त्या WALLET मध्ये होता. त्यामुळे घाबरलोच. तडक पळत सुटलो कट्ट्यावर हॉटेल मालकाशी चौकशी केली. पण नाही माझं किमती ‘WALLET’ आता हरवलं होतं. . निराश मनाने तिथेच अवती भोवती चकरा मारत राहिलो, रात्री उशिरा पर्यंत पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.  माझा किमती WALLET..किमती ह्यासाठी कि ते माझ्या बहिणीने भाऊबीज म्हणून गिफ्ट केलेलं. अन त्याबरोबर इतर महत्वाची हि कार्ड्स हि होती. घरी गेल्यावर ATM कार्ड वगैरे BLOCK करून टाकलं. रात्री तशी झोप लागलीच नाही म्हणा. पण सकाळी उठल्य बरोबर जो फोन खणाणला त्याने तर आनंदुनच गेलो. नाचू बागडू लागलो.WALLET मिळालं होत. एका सज्जन गृहस्थाला. तडक त्याची भेट घेतली. त्याच्या घरी जावून अन THANKU म्हणत परतलो. तिथपासून त्या गृहस्थाची अन त्याच्या कुटुंबाशी भावपूर्ण नातं जुळल .

आता आवर्जून कधी एखाद फोन येतो.ओळखलतं का मी मनीष सावंत ……?

काय कस काय चाललय ?खरचं अशी सज्जन अन प्रामाणिक माणसं क़्वचितच भेटतात. कट्ट्याशी निगडीत हा एक क्षण मी कधी विसरणार नाही. असो..

ह्या कट्ट्यावरची अजून एक भेट आठवणीत राहणारी म्हणजे माझी एक जवळची मैत्रीण. स्वतःच्या मनाशी अनेक प्रश्नात गुंतून राहणरी , प्रश्नाचं उत्तर नाहीच मिळालं तर मला हमखास विचारणारी अन मला हि त्या प्रश्न कोड्याच विचार करण्यास भाग करणारी …अशी हि मैत्रीण हळव्या मनाची हळवी मैत्रीण….. , ते क्षण हि आठवणीत आहेत. तसे प्रश्न अन त्याची उत्तर हि आपल्या सभोव तालीच कुठेतरी आसपास दडलेली असतात. बस्स त्याचा शोध घेतला कि ती मिळून जातात.तर असो.

असा हा आमचा ‘पुष्पक कट्टा’ विविध ढंगी-विविध रंगी क्षणांनी फुललेला. अन तो फुलतच जाणार पुढेही .. . किती वेळ अन कधी पर्यंत अन अजून कोणा सोबत ते माहित नाही. पण मित्रा हेमंत आपल्याला भेटायचाच आहे . आपल्या ह्या कट्ट्यावर ..चहाचा एक एक घोट घेत..ना ना विषयाचे फडसे पाडत….. चला तर भेटू पुन्हा…..कट्ट्यावर….ह्या कट्ट्यात सहभागी झालेले मित्र परिवार …. माझी प्रिय बहिण श्रद्धा , मित्र हेमंत, ओमकार , शीतल , पुनम , राज , निलेश , बाळू दा …अन मी..अजून हि लिस्ट पुढे वाढतच जाईल… भरोसा काय …आपलाच –

संकेत पाटेकर

कट्ट्याचं नुतनीकरणं अन आठवणीतले ते क्षण ..

Leave a Comment

Your email address will not be published.