काही सांगायचे होते..
काही ऐकायचे होते..
काही जुन्या क्षणांना..
जरा गोंजरायचे होते..
क्षण हसवायचे होते..
जरा रुसवायचे होते..
मनं, नव्या क्षणांशी ..
जरा मिसळायचे होते..
भाव निरखायचे होते..
हृदयी जमवायचे होते..
मन तुझे आणि माझे..
जरा उसवायचे होते..
नाते झुलवायचे होते..
जरा फुलवायचे होते..
गंध मोकळ्या मनाचे..
तळ शोधायचे होते…
काही सांगायचे होते..
काही ऐकायचे होते..
ऐक सखे…..
जरा भेटायचे होते..
~ संकेत पाटेकर