एक पाऊल स्वछतेकडॆ …

तो आला, त्याने इकडं तिकडं हळूच वळून पाहिलं आणि नजरेनंच काय ती जागा हेरली. हाती असलेला कागदी तुकडा, त्यात असलेला कुठलासा स्वादिष्ट पदार्थ… स्वतः सोबत सांभाळत, मी होतो त्या ठिकाणी तो येऊन बसला.
मी खिडकीशी मंदावलेली हवा घेत होतो. शरीर घामानं आधीच डबडबलेलं. वैताग सुटलेला.
बस, अजून हि जागची जागीच होती. वेळ टळून जाता हि …ती जागची काही हलत न्हवती.
.., चिडचिड वैताग..मन गर्मीत वाहत होतं.
प्रवासी संख्या.. संख्याने वाढत होती.
आधीच येऊन स्वार झालेले ( प्रवाशी ) निथळत्या घामानं हैराण होतं, कंडक्टर ला शिव्या घालत होते तर काही आपणहुन कंडक्टरची जबाबदारी स्वतःवर ओढावून घेत, गुर्मीत अगदी घंटेची ओढाताण करत होते. 
बस् मध्ये वाहक चालक कुणाचाच पत्ता न्हवता. प्रवाशांनी मात्र ती आता खचाखच्च भरली होती.
माझ्या बाजूला बसलेला सुटा बुटातला, वीस बावीस वर्षाचा तो तरुण मात्र , कागदाच्या पत्रावळ्यात आणलेला पदार्थ , खाण्यात अगदी मश्गुल झाला होता. कोण आपल्या कडे पाहतयं, पाहत नाही. ह्या कडं त्याचं अजिबात लक्ष न्हवतं.
बहुदा ,त्याला कडकडूनच भूख लागली असावी.
तो खाण्यात दंग झालेला. ओळखीचा तो खमंग मात्र दाट धुक्यावानी मनभर साचला जात होता. थरावर थर साचत होते, खंमंग पणाचे,..
बहुतेक ती दाबेलीच असावी. मी आपला एक कयास बांधला, खाताना असं कुणाकडे वळून बघू नये, ते आपल्याला शोभा देत नाही. 
असं मी स्वतःला स्वतःच बजावत होतो, ण अधून मधून डोकावतच होतो.
त्यास कारण हि होतं.
तो हाती असलेला कागदी तुकडा , त्यातला तो पदार्थ , खाऊन झाल्यावर नक्की तो त्याचं काय करणार, खिडकीबाहेर फेकणार, कि स्वतःकडे ठेवणार , योग्य त्या ठिकाणी टाकत.? ह्याकडे सारं लक्ष लागलं होतं. 
प्रवाचनासाठी म्हणा ,मी तसा तयारच होतो. स्वतःच पुढाकार घेतल्याशिवाय पाऊल पुढे काय पडणार नाही.हि ओळ मनाला उसावत होती. क्षणांचा काय तो हुकूम,
बस्स , त्याने तो कागदी बोळा बाहेर टाकला , किव्हा तो टाकण्याच्या आत,  आपलं आपण सुरु व्हायचं.
समजेल अश्या शब्दात स्वच्छतेचे धडे द्यायचे असं   मनाशी आज ठरलेलच.

लक्ष अधून मधून त्याकडे वळत होतं.
बस्स एव्हाना सुरु हि झालेली.
वाऱ्याच्या थोपावणाऱ्या गारव्यांनं मन सुखावलं जात होतं. हेलकावे देत , बस चा स्वर हि उंचावला जात होता. खडखडणारं ते रडगाणं सुरु झालेलं. 
अमुक ठिकान्याहून तमुक ठिकाण्या पर्यंतचा प्रवास सुरु झालेला ..
बहुतेक मंडळी हि मोबाईल मध्ये तोंड खुपसून आप आपला वेळ पुढे नेत होती.
काही आपल्याच विचारत नशाधुंद होऊन तोल सावरून उभी राहिलेली.
मी मात्र अजूनही त्या क्षणाच्या प्रतीक्षेत होतो.
पाहता पाहता ,तेवढ्यात त्याने शेवटचा घास एकदाचा तोंडी घेतलाच ….
आणि..आता , ? पुढे काय ? 
मी टकमकतेने पाहू लागलो.
त्याने एखाद टॉवेल जसा घडी घालून व्यवस्थित नीटनेटका ठेवावा , तसा तो कागद हि व्यवस्थित घडी घालूंन , आपल्या शर्टाच्या खिशात अलगद ठेऊन दिला. 
पाहून मी क्षणभर अवाक..
शिस्त लागलेलं कार्ट दिसतंय म्हणून मनभर आनंद संचारला.
म्हटलं चांगलं आहे, स्वतःला अशी शिस्त लावून आहे ते,
नाहीतर खायचं, प्यायचं ण , ‘आपलं काय जातंय’ ह्या अविर्भावात, कुठे हि हवं तसं, भिरकावून द्यायचं हे आपल्या लोकांच ठरलेलचं, मग ते करकरीत टापटीप पेहराव केलेले, शूट बुटातले उच्च शिक्षित , पदवी घेतलेले महाभाग असो, वा गल्ली बोलीतले..इतर कुणी..
तो अशातला न्हवता…..

रोज रस्त्यावरून जाता येता कागदी बोळे , बॉट्लस ,  इतरत्र फेकून देणाऱ्यांची अन कुठेहि पिचकारून थुकणाऱ्यांची खरंच कीव येते. 
घरात स्वछता जशी तुम्ही बाळगून असता तसे सार्वजनिक ठिकाण  वागायला काय हरकत आहे.
आपल्यालाच ते चांगलं नाही का  ?
पण नाही, आम्हाला घाण करायची सवयच लागले नाही का ? आम्ही सुधारण्यापैकी  नाही . 
सार्वजनिक ठिकाणी एखाद बस स्टॅण्डवर , रेल्वे प्लॅटफॉर्म वर,  तोंडातली घाण थुकंन , अन आपल्याकडचा केरकचरा कसाही कुठे हि लोटून देणं हे  चांगळूपणाचंच  लक्षण , नाही का ?

सुधरा..सुधरा….
तुम्ही सुधरा , जग सुधरेल ..
एक पाऊल स्वछतेकडॆ …
– संकेत पाटेकर

 

Leave a Comment

Your email address will not be published.

Translate »