‘उडपी’तला तो वेटर..

रात्रीची साधारण साडे दहा ची वेळ….
भटकंती कट्ट्या निमित्त एकत्र जमलेलो आम्ही काही मित्र (सुरज, रोहन, ला अन मी ) कट्टा संपताच मामा काणे HALL मधून बाहेर पडलो. आणि कामत हॉटेल च्या इथे थोडा स्थिरावलो.

थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पात आणि महत्वाच्या काही विषयात रममाण झालो होतो . तेवढ्यात आमचा , अजून एक लाडका मित्र .. आमच्या घोळक्यात हजर झाला. त्याच नाव हेमंत..

पार भिवंडीपासून ऑफिसमधून निघून दादर ला गाठे पर्यंत ..त्याला साडे नऊ झाले. 
भटकंती कट्ट्याला त्याला काही उपस्थिती लावता आली नाहीच .पण आम्हा मित्रांना खास भेटण्यासाठी म्हणून साहेब इथवर येण्याचे कष्ट घेतलेच. (मित्रांवरच प्रेम अजून काय …)

पुढे अजून हि गप्पा रंगल्या .चहा अन कैरी पन्ह्याचा एक एक पेला रिता करत..आम्ही एकमेकांशी बोलते झालो . त्यात रात्रीचे दहा वाजले..ते कळूनही आले नाही . पोटाची खळ अन भूक कावकाव करू लागली. म्हणून घरी जावयास निघालो. 

आमचा हेमंत साहेबांच्या घरचे सगळे गावी गेल्याने ….आज त्याचं बाहेरच जेवण होणार होतं. हे माहित होतं. म्हणून म्हटल चला … 
माझ्या हि पोटाला थोडा आसरा होईल …आम्ही निघालो . दादर पच्छिम हून पूर्वेकडे ..रेल्वे पूल ओलांडत …एखाद हॉटेल शोधत…

त्यातच कला सोबत होती. उगाच तिला उशीर होईल म्हणून तिचा निरोप घेतला . तिला जाऊ दिले. 
आणि चौघे मित्र , हॉटेल शोधे साठी ऐन त्या गर्दीतली पायवाट चालू लागलो.

पूर्वेकडे आल्यावर एक हॉटेल दिसलं . नाव आता आठवात नाही . तिथे थेट जाऊन बसलो. 
पाच मिनिटे झाली दहा मिनिटे झाली. ओर्डर घायला कुणी येईना . 
तोपर्यंत मेनू कार्ड हाती आलं होतं . काय हवयं काय नको ते पाहू लागलो. 

आणि एकमताने सेज्वान राईस आणि गरमा गरम सूप मागवायच ठरवलं . वेटर ला किंचाळूनच (एवढ्या मोठ्या हॉटेल मध्ये एकुलता एकच होता …ओर्डर घ्यायला म्हणून ) बोलावलं आणि अमुक अमुक ओर्डर द्याला लागलो. तोच घाई घाईत त्याने शब्द फेकले. 

”इसमेसे कुच्ह नही है ” …मग काय पुन्हा एकदा मेनू कार्ड चाळू लागलो. अन मनाशी पक्क केलं. 
चीज पावभाजी खाऊ ….पुन्हा त्या वेटरला ओरडूनच बोलवावं लागल. ) आणि पुन्हा त्याचा तोच शेरा …पाव भाजी भी नही हे ..

खाली, ” इडली वडा सांबार मिलेगा… ” अस म्हणताच आमच्या रोहनचा पारा थेट उंचाकी पोहोचला आणि रागा रागानेच , काहीतरी बडबडत तो बाहेर निसटला. . आणि त्यासोबत आम्हीहि …
म्हटलं एवढा मेनू कार्ड विविध अश्या खमंग पदार्थांनी सजलेला असताना . त्यातलं काहीच मिळेना. अजब आहे . कपाळावर आट्या ओढवल्या …आणि पुढे सरलो . 

दादर स्टेशन लगतच बाजूला ..उडपी दिसलं . म्हटलं इथे तरी बघू आता काय मिळतंय का ? रेटू काहीतरी घशात ..रात्रीचे साडे दहा झाले होते . 
आत शिरलो. जुन्या मुंबईचे अनेकानेक फोटोफ्रेम भिंतीवर सुंदर रीत्या लावलेले दिसले. ते बघतच एका जागी चौघे स्थिरावलो. 
वेटर ने दिलेलं पाणी प्यायलो . मेनू कार्ड बघू लागलो. 

राईसचे अनेक प्रकार त्यात होते.तरीही खात्री करून घेण्यासाठी म्हणून मी मुद्दाम वेटरला.विचारलं ह्यातलं काय आहे ?काय मिळेल ? 

काय कुणास ठाऊक मी असा प्रश्न करताच ..त्याच्या भुई वरच्या रेषा एकदम ताणल्या गेल्या . आणि तुसडीने एखाद्याशी बोलावं तसं त्याने म्हटल… सब कूच है..
मी मात्र विचाराच्या गर्दीत लोटून गेलो क्षणभर ..हा असा का वागला ? माझा पेहराव ठीक नाही का ? कि चेहरा भूतावाणी झालाय ? काही कळेना. 

दुरलक्ष केलं क्षणभर आणि ओर्डर द्याला सज्ज झालो . तशी एकाचीच भूख होती . आणि आम्ही तिघे फक्त जोडीला होतो. ( थोड थोडशेअर करायला .. ) 
म्हणून सुरवातीला पनीर हंडी बिर्याणी मागवायची ठरवली. आणि त्याचं वेटरला ओर्डर दिली . 
पुन्हा त्याने एकदा कटाक्षाने पाहिलं . 
चौघात फक्त एक ओर्डर ? ..अश्या प्रशांर्थी अविर्भावात त्याने नजर फिरवली आणि तो आत ओर्डर घेऊन निघून गेला. 
हा असा का वागला ? पुन्हा इथे विचारंनी उचल खाल्ली ? पुन्हा दुर्लक्ष …

थोड्या वेळात प्लेट घेऊन तो आला. त्या हि किती तर दोनच ..? माणसे आंम्ही चार ? 
तशी दुसरी ओर्डर अजून द्यायची बाकी होती . त्यावेळीस एकमत झालं न्हवत नक्की काय घ्यायचं . त्यात थोडा वेळ गेला होता म्हणा… 

म्हणून पुन्हा ओर्डर दिली . पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर तेच भाव ..
जणू काही कुणाशी जोरदार भांडण झालय आणि तो सगळा राग आमच्यावर ओढतोय. 
पुन्हा मनात तोच प्रश्न , हा असा का वागला ? पुन्हा दुर्लक्ष …
पुन्हा दोन प्लेट आल्या ….दिलेली ओर्डर आली . त्याने राईस सर्व्ह केलं .आणि निघून गेला . 
पण त्यात एक स्पून द्यायचं राहिला . आणि तो नेमका मलाच . 
आधीच पोटात काही कावळे धिंगाणा घालत होते . रहावलं नाही म्हणून कांदा लिबू च्या कापी केलेल्या डीश मधला स्पून उचलला अन थेट सुरवात केली गिळायला.

मित्र माझ्याकडे पाहू लागले. …अरे बकासुर थांब कि थोडा …मी हास्य मुकुट फुलवल अन क्षणभर थांबलो. 
तेवढ्यात तो वेटर हि टेबला जवळ आला. 
मित्रांनी त्याकडे स्पून साठी विचारलं .अदबीनेच .. .. ‘एक स्पून दो भाई ‘…

अन झालं पुन्हा त्याची तीच तर्हां ..जणू आमची खीळ उडवावी म्हणूनच हा मुद्दाम अस करतोय कि काय अस वाटू लागलं. स्पून से नही , ऐसेही खावं ..अस काही बाही तो बडबडून आणि हाती असलेला ..स्पून जागी ठेवून निघून गेला. 
मी म्हटलं जाऊ दे , पुन्हा दुर्लक्ष करत …खाण्यावर सगळ लक्ष एकवटलं. 
पण अधून मधून एकमेकांना पाहून मनातून खो खो हसत होतो . कारण तो वेटर बंधू …आणि त्याचे ते अनाठायी विस्कटलेले रागीट भाव …
पण तो हि ..आमचं सगळ खाऊन होईपर्यंत , आमच्या टेबलाच्या मागे ..चौघांवर नजर ठेवून होता. एकटक ..पाहत…
काही वेळेत आमच सगळ आवरलं. आणि तो पुन्हा टेबल क्लीन करायला आला. 
आणि पुन्हा तोच प्रश्न उभा राहिला …हा असा का वागला ? पुन्हा काहीतरी तो पुटपुटून गेला होतां .
हॉटेल मधून बाहेर पडता पडता , मोकळ्या दिलखुलास हास्य छबिने आणि क्षमाशील नजरेने त्याकडे पाहिलं. आम्हाकडून काही चूक झाली का? हे विचारायचं होतं. 
पण काही विचारलं नाही तसेच बाहेर पडलो . 

मनात मात्र तो प्रश्न काहीसा तसाच राहिला . अनुउत्तरीत. ..हा असा का वागला ?
मुळात दिवसभरात इतकी माणसांची ये जा ..आणि त्यात विविध लोकांच्या स्वभाव मनाशी येणारा संबंध लक्षात घेता म्हटलं काहीतरी नक्कीच कुणाशी बिनसलं असावं. आणि त्यात आम्ही जरा उशिराच (म्हणजे हॉटेल बंद करण्याच्या वेळेस बहुदा )आल्याने ..त्याचा एक परिणाम झाला असावा . असा एक काही तर्क मानून आम्ही मात्र आमच्या घराच्या वाटा पकडल्या . अन तो दिवस मावळला.
मुंबईतल्या रोजच्या घाई गर्दीतल्या अन तणावाखाली असलेल्या माणसाचा तो चेहरा आणि ते तर्हेवाईक भाव आज अश्या पद्धतीने अनुभवले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही . 

– संकेत य पाटेकर 
२०.०५.२०१६

Leave a Comment

Your email address will not be published.