आयुष्यात एकदा तरी आपण प्रेमात पडतो. अन आपले भान सर्वस्वी त्या व्यक्तीपुढे हरपून बसतो…नवी ओळख असते नवं नातं गुंफलेलं असतं…..अन अश्यात  काही शब्द काही ओळी नकळतओठाशी येतात.

सोनसळी आठवणी, लागे बोलाया चालाया

दिन गुलाब गुलाब, प्रीत लागली फुलाया !  

 – संकेत

प्रेयसीचं ..  रुसणं  देखीलं  वेड लावून जातं  म्हणा  ……….

  काय बोलू कसं बोलू , सखे अगं सांग मला …

तुझं रूसणं पुन्हा हसणं , वेड लावी रे ह्या मना ….

– संकेत

प्रेमाची सुरवात तर होते …एकमेकांविषयी जिव्हाळा, काळजी असते मनामध्ये ….पण एकमेकांविषयी असलेल प्रेम काही वेळा व्यक्त व्हायचंच राहून जातं. मग तेंव्हा अशा वेळी सुचतात.  

दिरंगाई नको आता ,हो कि नाही सांगून टाक…

मनी दडल्या स्वप्नांना, बेधुंद होवून रंगवून टाक . –  संकेत                              

मला अजूनही प्रश्न पडलाय , तिच्या होकार नकाराचा..

त्यानेच उठलाय वादळ , ह्या हृदयी स्पंदनांचा… – संकेत

प्रेमा शिवाय हासू नाही ,  प्रेमा शिवाय आसू नाही.. 

प्रेमा शिवाय आपुलकीचा, भावगंध स्पर्श नाही..  –  संकेत   

शब्दओळी..