आयुष्यं हे असंच असतं …

एका ठराविक अंतरापर्यंत, एका क्षणापर्यंत , एका ठराविक मर्यादे पर्यंत आपण न बोलता…
न भेटता एखादयापासून दूर राहू शकतो . पण ती ठराविक रूपरेखा ओलांडली कि मनाचा विस्फोट झालाच समजा.
मन मग मागे पुढे पाहत नाही .आपण स्वतहून पुढे सरसावतो अन बोलू लागतो.
समोरील व्यक्तीशी…

काही वेळा प्रश्न सुटतो , पण काही वेळा प्रश्न इथूनच पुढे सुरु होतो.
आपलं ‘मन’ पुन्हा शोध घेऊ पाहतो हव्या त्या प्रश्नाच्या त्या उत्तराचं …

उत्तर तर मिळत नाही . पण स्वतःशीच पाठ थोपावतं,   स्वतःलाच दोष देत मन शांत राहतं .
शांत राहण्याचा तसा पुन्हा प्रयत्न करतं .

कारण ..आयुष्यं हे असंच असत .

जगायचं असतं , जगू द्यायचं असतं

संयमानं ‘क्षणाशी’ झुंजायचं असतं

संकेत १५.०४.२०१४

Leave a Comment

Your email address will not be published.