आयुष्यं खरंच ..सुंदर आहे.

आयुष्यं खरंच ..सुंदर आहे.

ही परिस्थिती ना, सगळे रंग दाखवून देते,
चांगल्या वाईट दोन्ही गोष्टींचा मेळ ती अचूकपणे साधते.
आपला तोल डावलण्याचा..तिचा पुरेपूर प्रयत्न असतो.
तुला जिथे वळायचं नसतं तिथं ती घेऊन जाते.
हवं ते देते पण तेच हिसकावून घायला ही ती मागे पुढे पाहत नाही.
तिचा काही नेम नाही. ती लाड पुरवते ही आणि रडवते ही, 
कधी घुंगावंतं वादळ होऊनही ती येते आणि कधी आनंदी आनंद होऊन …
कळतंय ना ? 
तिला आयुष्याचे रंग दाखवून द्यायचे असतात.
आपल्यातला ‘माणूस’ तिला उलगडायचा असतो.
बरा वाईट , जो काही आहे तो..
‘माणूस’ घडला तर ती खुश…
तीच पुन्हा मग योग्य वाटेला लावते अन्यथा …..
असो,
तू डगमगू नकोस..
जी काही परिस्थिती तुझ्यावर आता ओढवलेयं, तिला धीटपणे सामोरं जा, 
संयम राख. योग्य अयोग्यचा सारासार विचार कर, पण वेळ दवडू नकोस, स्वतःचं कौशल्य पणाला लाव, मेहनत घे , 
ही परिस्थिती ही तुझ्यापुढं झुकल्याशिवाय  राहणार नाही.
अरे, माणसाकडून तिला हेच हवं असतं.
एखाद्या तट बुरुजाप्रमाणे..तटस्थ..संयमी, मुत्सद्दी आणि लढाऊपण असलेली वृत्ती…, सातत्य राखणारी..
कळतंय ना…? 
स्वतःला उभं करायला शिक..
आयुष्यं खरंच.. फार सुंदर आहे...
– संकेत पाटेकर

0 thoughts on “आयुष्यं खरंच ..सुंदर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.