
आमची रायगड वारी..| सह्याद्री आणि मी
आषाढी एकादशीला वारकरी जसे तहान भूख विसरून,विठू माउलीच्या नावाचं गजर करत अगदी तल्लीन होवून आपलं देहभान विसरत आपुल्या माउलीच्या दर्शनासाठी ,त्याच्या भेटीसाठी मैलो दूर प्रवास करत पंढरी वारी करतात.
तसेच माझ्या ह्या लाडक्या राजाच्या भेटी साठी, ह्या गड किल्ल्यांवरील पवित्र माती लल्लाटी लाविन्या साठी ,इथली प्रत्येक वास्तू अन चिऱ्या चिर्यातून घडलेला सारा इतिहास हृदयी सामावून त्यातून प्रेरणा घेऊन इथे नतमस्तक होण्यासाठी ..पाऊलं आपुसकच दर शनिवार रविवारी ह्या प्रेरणादायी गड किल्ल्यांकडे वळली जातात .
मनाचा एकच गजर करून ….इथल्या मातीला प्रणाम करून ..
| जय भवानी जय शिवाजी |
त्यातल्या त्यात राजगड अन रायगड असेल तर तन मन अगदी शिवमय होवून जातं.
कारण हि तर आम्हला तीर्थक्षेत्र.
इथला प्रत्येक चिरा ना चिरा आपल्या राजाची..त्यांच्या शौर्याची, पराक्रमाची, त्यांच्या सदहृदयी मनाची महती सांगतो.
इथल्या एक एक प्रसंगाची आठवण करून देतो. ते सार पाहताना, अनुभवताना मनाची कधी समाधी अवस्था लागते तर कधी तना मनात आत्म्विश्वाचे नवे बळ संचारते.
काल परवाच असंच रायगड वर जाण्याचा पुन्हा योग आला .
तशी हि माझी चौथी खेप , खेप म्हणण्यापेक्षा चौथी वारी ..रायगड ची !
आमची रायगड वारी..| सह्याद्री आणि मी
तरी सुद्धा रायगड काही अजून पूर्ण पाहून झालाच नाही. पण रायगड वर जे अनुभवलं, जे पाहिलं ते ” सुवर्ण क्षण ” कायम स्मरणात राहतील असेच आहे.
(तसं तुम्ही एकाच ठिकाणी कित्येक वाऱ्या केल्या तरीही तुम्हाला प्रत्येकवेळी नवं काही अनुभवयास मिळतंच मिळत..ह्या वेळेसही मला नवं काही पाहायला मिळालं. अनुभवयास मिळालं )
इतिहासाचा अमुल्य साठा असणारे, आपल्या गड-किल्यांवर, शिवरायांवर नितांत प्रेम असणारे,
वयाच्या पंच्यातरीतही गड किल्ले सर सर चढणारे उतरणारे, इतिहास संकलक अप्पा परब ह्यांची योगा योगाने भेट घडली ती रायगड वरच .
त्यांच्या ह्या आगमनाने मात्र इतिहासाची न उलगडलेली अमुल्य पाने आज आमच्या समोर पुनः उलगडू लागली.
राणी महाल पासून, राजवाड्यापर्यंत, टांकसाळ ते भवानीहुडा (देवघर )पर्यंत, राजदरबार ते
नगारखाना ह्यां मध्ये एका बाजूला असलेल्या त्या खडकाच (भूमी पूजनाचा खडक ) नक्की प्रयोजन काय ? इथ पर्यंतचा इतिहास त्या संबंधित कथा नव्यानेच ऐकण्यास मिळाल्या.
ते ऐकताना अंग अंग शहारलं.
पुढे दुपाच्या भोजनाची वेळ झाल्या कारनाने आम्ही आमच्या वाटेस लागलो. आमच्या मुक्कामी पोहचलो .
(जिथे आजची रात्र काढणार होतो ) तिथे थोडी पेट पूजा आटपून काही वेळाने पुन्हा मार्गीस्थ लागलो.
ते होळीच्या माळेवरून, बाजारपेठेतून, कमक च्या दिशेने…
जिथे आज एक फर्मान निघालं होतं.
आज एकाचा कडेलोट होणार होता आणि त्या शिक्षेच पात्र ठरलो होतो तो मीच (अर्थात हा गंमतीचा भाग )
कडेलोट करण्याचमागच कारण मात्र त्या दोन देवींनाच माहिती .
एक तर गीतू अन स्नेहू, बहुतेक मी प्रवासात किंव्हा काही दिवसांपासून त्यांना थोडा अधिक त्रास दिला असावा, इतकच..
पण त्याची किती मोठी हि शिक्षा ..!!
अर्थात हा गंमतीचा भाग.
पुढे पाउल जशी टकमक टोका कडे सरसावू लागली.
तसं तसे ह्या राकट कणखर सह्याद्री रांगांनी त्यांच्या नयनरम्य दर्शनाने मन अगदी मंत्रमुग्ध झालं.
एकीकडे दिसणारा कोकण दिवा पुढच्या मोहिमे साठी तयार रहा अस म्हणत मनाशी सांगड घालू पाहत होता. रायगडाच दर्शन इथुन हि किती सुंदर मोहक दिसत ते जरा पाहून घे ?
ये कधी तरी आपल्या सवंगड्यांना घेऊन इथे हि माझ्या अंगा खांद्यावर …
मी तुला रायगडच सोनेरी रूपाच दर्शन घडवेन.

आजोबा – नातवाचं जस खेळकर प्रेम असतं. तसं प्रेम ह्या क्षणी मनी दाटून आल होतं.
टकमक टोकावरील घुंगावनारा वारा अजूनही त्या क्षणाची आठवण करून देत होता.
म्हणत होता बघ त्या दिशेला दिसतंय का ते गाव , छत्री निजामपूर, हो..हो तेच ते ..छत्री निजामपूर !
”छत्रीचा दांडा सोडू नकोस घट्ट धर ” असे म्हणणारे शिवराय आणि तो वाऱ्याच्या लाटे समवेत हवेत तरंगत असलेला शूर मावळा ” येथूनच हा सारा प्रसंग घडला होता आणि मी त्याला प्रत्यक्ष साक्षी होतो.
कित्येक वर्ष होवूनही हा प्रसंग मी इथे येणारया प्रत्येकाच्या कानी मनी हळूच सांगत असतो.
त्या प्रसंगाची आठवण करून देत असतो.
निसर्गाच्या अशा प्रत्येक बाबी आपल्या मनाशी काही ना काही गुजगोष्टी करतच असतात . त्यासाठी संवेदनशील मनाची अन निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीत समरस होण्याची सवय जोडावी लागते. मग मनासोबत निसर्र्गाच्या नितांत गप्पा सुरु होतात. मग वारा बोलू लागतो. नदी- नाले , डोंगा दर्या, पक्षी पाखरे, वृक्ष वेली, निर्जीव दगड धोंडे हि आपल्याशी गुजगोष्टी करू लागतात.
मन अशाच गुजगोष्टीत हरवलं असता ” चला निघूयात” अशी आर्त हाक ऐकू आली .
अन पाउलं टकमक टोका कडून ..जगदीश्वराच्या प्रासादलया कडे हळूच वळू लागली.
…जगदंब जगदंब नामस्मरण करत !!
आमची रायगड वारी..| सह्याद्री आणि मी
आता सायंकाळचे ५ वाजत आले होते.
सूर्य नारायण हि मावळतीला त्याच्या रोजच्या दिन क्रमानुसार वाटचाल करू लागला होता.
त्याची तांबूस सुवर्ण किरणं मात्र अंगाखांद्यावर अजून लोळण घेत होती.
पाउलं हळूवार टप्प्या टप्याने जगदिश्वरच्या दिशेने …मार्गीक्रमण करत होती.
पुढे काही मिनिटे अशीच चालत गेल्यावर,
एका सपाटीवर, वृक्ष वेलींच्या दाट सावलीखाली ,थकल्या भागल्या लोकांची तृष्णा भागविण्याकरिता एक १०- ११ वर्षाची गोड मुलगी ( नाव गीता )
लिंबू पाणी, ताक, कोकम सरबत ह्यांनी भरलेलं भांड कुंड एका टेबलावर जमवून, आमच्या येणाऱ्या चेहऱ्याकडे कटाक्षाने पाहत उभी होती. आम्ही समोर येताच तिच्या गावरान बोलीत,
दादा ताक घेता का ? ताक अस म्हणत ? मनोमन आम्ही ते घ्याव प्यावं अस नजरेन सांगत होती.
तशी आमची मनं हि तृष्णेने काहीसी व्याकूळ झालेली. त्यामुळे क्षणभर त्या वृक्ष वेलीच्या दाट छायेखाली विसावा घेत आम्ही घट्ट ताकाचे एक दोन पेले गटा गटा पीत आमची तृष्णा भागविली.
अन काही क्षणाच्या विसाव्या नंतर , थोड्या अधिक चढणीचा मार्ग पत्करत, काहीसे अंतर चालत आम्ही जगदिश्वराच्या प्रवेश द्वारातून प्रांगणात प्रवेश करते झालो.
मंदिर म्हटलं कि ते एक पवित्र स्थान. अन त्याला फार महत्वाच स्थान आहे आपल्या जीवनात.
कारण देव देवतांचा तिथे वास्तव्य असतं. आणि अशा जागी ईश्वरी पण एक अदृश्य शक्ती सदा वास करत असते .
अन हिच शक्ती आपल्या तना मनात, नव्या परीने सकारात्मक विचारंच बळ प्राप्त करून… चैतन्याच नव अंकुर रुजवू लागते. अशा चैतन्यमय वातावरणात मी प्रवेश करता झालो. तन मन अगदि प्रसन्न झालं.
पण पाउल जशी पुढे पुढे सरकू लागली तसं ‘ मन’ पुन्हा इतिहासाकडे वळू लागल.
इतिहासाची अमुल्य पाने पुन्हा उलगडू लागली.
अन भारवलेल्या त्या क्षणाची पुन्हा आठवण झाली. नजरेसमोर सारा क्षण पुन्हा जिवंत झाला.
इथेच ह्या प्रांगणात …
गडावरील काही मंडळी आपल देहभान विसरून …
त्या १३ वर्षाच्या त्याच्या पहाडी आवाजानं त्याच्या काव्यान अगदी ध्यान मग्न झाली होती.
एकच आवाज चारी बाजूने दुमदुमत होता.
सेर सिवराज है ! सेर सिवराज है !
मंदिराच्या त्या कच्छ मंडपात तो बालक अर्थात कवी भूषण ”
त्याने रचलेले काही छंद शिवरायांसमोर आपल्या वज्र बोलीत पहाडी आवजात गाउन दाखवत होता .
इंद्र जिमी जम्भ पर बाड्व सुअम्ब पर
रावण सदम्भ पर रघुकुलराज है ||१||
पौन बरिवाह पर | संभु रतिनाह पर |
ज्यो सहसबाह पर | राम द्विजराज है ||२||
दावा द्रुम दंड पर | चिता मृग झुंड पर |
भूषण बितुंड पर | जैसे मृगराज है ||३||
तेजतमअंस पर | कान्ह जिमी कंस पर |
त्यों म्लेंछ बंस पर| सेर सिवराज है ||४||
सेर सिवराज है ! सेर सिवराज है !
आमची रायगड वारी..| सह्याद्री आणि मी
ह्या आवाजाने सारा आसमंत दणाणून गेला होता. जो तो तल्लीन झाला होता. त्या भावसमाधीतून बाहेर पडू इच्छित न्हवता. ह्या पंक्ती त्याने तब्बल अठरा वेळा म्हणून दाखवल्या होत्या.
शिवरायांनी त्याला योग्य ती बक्षिशी दिली होती.
हा सारा प्रसंग इथेच घडला होता आणि त्याचा प्रत्यय आता ह्या क्षणी हि येत होता. जणू हा प्रसंग नजरेसमोर घडतोय घडत आहे आणि मी त्यास प्रत्यक्ष साक्षी आहे.
छत्रपति शिवराय अन कवी भूषण ह्यांची हि पहिली भेट.
अन हे इतिहास संकलक अप्पा परब ह्यांनी फारच सुंदरतेने वर्णन केल आहे. त्यांच्या पुस्तकात..
ते तुम्ही अवश्य वाचा.
इथे आल्यावर आपली हि भावसमाधी लागते. आपण हि त्या लयात अगदी नाचू डोलू लागतो .
तन मन गाऊ लागत.
सेर शिवराज है ..!!
– संकेत य पाटेकर
आमची रायगड वारी..| सह्याद्री आणि मी
हे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ ?
हे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ ? कधी कधी आपल्याच नातेवाईकांपैकी अथवा मित्र परीवारांपैकी कुणीतरी बोलून जातं..ज्याचा ट्रेक विषयी काहीही एक संबंध नसतो. ”काय रे नुसतेच आपले डोंगर चढता उतरता ?” काय मिळतं त्यातून तुम्हाला ?उगाच वेळ वाया, पैसे वाया ? नीट घरी बसा ना. एखाद दिवस कुठे मिळतो आठवड्यातून सुट्टीचा ..तो देखील असा […]
Read More‘सह्याद्रीतली माणसं’ | सह्याद्री आणि मी
‘सह्याद्रीतली माणसं’ | सह्याद्री आणि मी | Sanket Patekar मनात खूप सारे विचार आहेत. जे शब्दबद्ध करायचे आहेत. कृतीत उरतवायचे आहेत. त्यातलंच हे एक ..म्हणजे ‘सह्याद्री’तली माणसं ‘ हा एक स्वतंत्र लेख ..जो लवकरच घेऊन येतोय माझ्या ब्लॉग वर … तसं आजवर सहयाद्रीच्या ..दऱ्या खोऱ्यानिशी वावरताना, आड अडगळ-ठिकाणी, कुठश्या वळणाशी , सह्यद्रीच्या माथ्याशी , पायथ्याशी […]
Read Moreमहिपतगड, सुमारगड आणि रसाळगड : गर्द वनातील त्रिकुट
महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड नभा नभातुनी दऱ्या खोऱ्यांतुनि गर्जितो माझा सह्याद्री …!! दिशा दिशांना साद घालूनी पुलकित होतो सह्याद्री …!!! मी निसंर्ग प्रेमी आहे अन सह्य वेडा हि..अन म्हणूनच सह्याद्रीत वारेमाप भटकताना मी स्वतः असा विरून जातो. प्रेरित इतिहासाची अन भौगोलिक दुनियाची सांगड घालत. तर कधी ह्या सृष्टी सौंदर्याने नटाटलेल्या निसर्गाशी एकरूप होतं त्याच्याशी हितगुज […]
Read MoreNo posts found!
Recent Posts
- आता घरोघरी सोलकढी ..| Solkadhi
- येवा कोकण आपलोच असा ( Yeva Konkan Aaplach Asa ) भटकंती सिंधूदुर्ग जिल्ह्याची
- Verbal & Non-Verbal Reasoning – Dr. R S Aggarwal
- Made for each other | लग्नाचे दोन महिने पूर्ण
- Unique Beautiful Attractive Wooden Piggy Bank for kids & Adults
- How to Earn from Meesho ?
- Marathi Quotes on Life & Love – Part 1
- Key Chains for Cars & Bikes
- वपुंची (व.पु काळे) पुस्तकं ~ books of vapu kale
- बालदिन – आठवणींची उजळणी | Marathi Lekh | Marathi Article