आपल्याला प्रिय असलेली व्यक्ती सोडून का जाते रे ?
काल सायंकाळी ऑफिस मधून घरी परतत असताना … एक मेसेज आला मोबाईल वर जवळच्याच एका व्यक्तीचा .. त्यात तिने प्रश्न केला होता …
आपल्याला प्रिय असलेली व्यक्ती सोडून का जाते रे ?
काही क्षण त्या प्रश्नाकडे नजर माझी स्थिरावली गेली. अन क्षणात वाऱ्या गतीने मनात विचारांचे चक्र गरगर फिरू लागले . भूतकाळाच्या आठवणीत मनं कस गढून गेल.
का दुरावते ती व्यक्ती जिच्यावर आपण मनापासून प्रेम कराव ? का होत अस ? काय चुकतं आपलं ?
पहिली गोष्ट :आपण त्या व्यक्तीशी कसं बोलतो कस वागतो कस आचरण करतो ? त्यावरून तिच्या मनात आपल्या विषयीक प्रेम भावना व आदर निर्माण होत असतो.
व त्याप्रमाणेच तिचं आपल्याशी बोलणं वगैरे होत असतं.
दुसरी गोष्ट :काही वेळा …वेळे अभावी …व परिस्थितीच्या कचाट्यात सापडल्यामुळे त्या व्यक्तीला आपणास वेळ देता येत नाही .
भेटता येत नाही ..नि बोलता हि येत नाही . हे खर असत पण ते आपणास खोट वाटू लागत .. ती व्यक्ती जाणून बुजून आपल्याशी अस वागत आहे ह्याच तंद्रीत आपण राहतो . त्यामुळे कधी कधी अस वाटून जात . कि ती व्यक्ती आपणा पासून दुरावत चालली आहे .
तिसरी गोष्ट :आपल इतक प्रेम असत त्या व्यक्तीवर .. कि सतत आपण त्या व्यक्तीचाच रात्रंदिवस विचार करत राहतो तिच्याविना आपणास दुसर काही दिसत नाही किंवा काही सुचतच नाही . अशा वेळी समोरील व्यक्ती जीवन काय आहे , आपल ध्येय काय आहे . .. प्रेमा पलीकडे सुद्धा एक जग आहे . हे दाखवून देण्यासाठी आपणापासून काही अवधीसाठी स्वताहाच्या मनावर दबाव टाकून दूर राहते . आपल्या हितासाठी आपल्या भल्यासाठीच ..!!
बघा माझं म्हणणं पटत का ते तुम्हाला …
संकेत य पाटेकर २४.०५.२०१२
आपल्याला प्रिय असलेली व्यक्ती सोडून का जाते रे ?

Leave a Reply

Your email address will not be published.