आपलेपणाचं ‘नातं’

प्रिय..

मुळात ह्या शंका कुशंका का उद्भवतात माहित आहे ?
आपण ..आपलं मन, आपल्या माणसाजवळ, योग्य त्या वेळी उघड करत नाही म्हणून ..नात्यात फुट पाडण्याचं,  दुरावा वाढण्याचं ..हेच मूळ कारण आहे.
जितकं अंतर जास्त, तितकंच.. शंका कुशंका , तर्क- वितर्क ह्यांना उधाण जास्त, अन तरीही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. अन तीच एखाद गोष्ट विश्वासात न घेता ,न सांगता , नात्याची रसिकताच घालवून देतो.

मला मान्य आहे, मनाशी तळ करून राहणाऱ्या साऱ्याच गोष्टी उघडपणे मांडता येत नाहीत. ते करू हि नये. पण निदान, आपण…आपलेपणाच्या अन जिव्हाळ्याच्या दोराने विणल्या गेलेल्या, आपल्या नात्याला.. तडा जाऊ नये वा कसली दुखापत होऊ नये. इतपतं तरी काळजी घेऊ शकतो कि न्हाई ?

इतकं तरी अपेक्षित असतच ना, हे ना ? मला एवढच मांडायचं आहे. मी म्हणत नाही, मनातली गोष्ट सांगावीच म्हणून ..

पण विश्वासात घेऊन एकेमकांना अन नात्याला हि सांभाळता येतंच ना ? काहीच न सांगता अस दूर जातं जाणं अन असलेलं नातंच झटकून देणं.. हे योग्य नाही. मला ते पटत नाही . श्वास घेणं अन सोडणं जितकं सहज सोपं आणि नकळत असत ना…तसंच ह्या नात्याचं.

सहजता आली कि सगळं ठीक..’सहज आणि सोपं’ पण त्यात कसला अडळला आला..कि त्याचा होणारा त्रास किती ?

तो.. वेगळं काही सांगायला नको .

असंच काही सुचलेलं …अन मांडलेलं.
– संकेत पाटेकर

 

 

Leave a Comment

Your email address will not be published.