आपलं म्हणणारं आपलं असं कुणी आहे. ह्यातच किती सौख्य आहे..

आपलं म्हणणारं आपलही कुणी आहे. ह्यातच किती सौख्य आहे. बळजबरीने कुणाला हि आपलंस करता येत नाही वा कुणाचं मन जिंकता येत नाही.
वाटतं तितकं सोपं नसतंच कधी कुणाला आपलंस करणं, आपल्यात सामावून घेणं.
काही वेळा सहज जुळून येतं सगळं , काही वेळा प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते.
तरीही कसली शाश्वती नसते. शेवटी उरतो तो नशिबाचा भाग, काही नाती जुळतात. काही नाही. काही नाती जुळल्या तरी त्यात प्रेमाचा अंश टिकेलच असं नाही.
हि परिस्तिथी कोणता लंपडाव खेळेल ह्याचा ही नेम नाही .
खर सांगू ..
प्रेमासारखी दुर्लभ गोष्ट नाही.
कणकण कुणी त्यासाठी तडफडतं, कुणी त्यासाठी आपलं अनमोल जीवन कवटाळतं .
कुणास सहज मिळून जातं हो …एखाद्याचं प्रेम.
कुणी वाट पाहतं बसतं, कुणी वाटेला लागतं. कुणी व्याकूळतेने आतून ओक्साबोक्शी रडत राहतं.
क्षणभराचा सहवास हा .. कुणा एखाद्याचं जीवन आनंदाने फुलवू शकतो.
आपलेपणाचा शब्द हि कुणा मनाला फार मोठा आधार होवू शकतो.
प्रेमाच्या स्पर्शाची जादूच न्यारी ! त्याबद्दल काय बोलावं.
नात्यानुसार त्या स्पर्शाची उब निराळी असते हो, एखाद्याचं जीवन त्यानं सार्थकी लागू शकतं.

आपलं म्हणणारं आपलही कुणी आहे . ह्यातच किती सौख्य आहे.
जीवनात अनमोल एकच आहे ते म्हणजे प्रेम.
कुणी त्यापासून वंचित असेल तर ते त्यास द्या .निर्मळ मनानं..
आनंद मिळेल. त्यासही,  आपणासही..
मनातलं काही ..
 – संकेत य पाटेकर

 
 

Like..Share & Subscribe my Channel

आईचं हे नातंच असं आहे श्रेष्ठत्वाचं. त्याला तोड नाही.
त्याहुनी कुणी मोठं नाही.

प्रिय आई I प्रेमस्वरुप आई I वात्सल्य सिंधू आई I

Click here

Quotes आणि बरंच काही
Quotes आणि बरंच काही
Quotes आणि बरंच काही

Leave a Reply

Your email address will not be published.