‘आनंद’ साजरा करायला वयाची अट नसते.

‘बंगले के पीछे तेरी बेरी के नीचे हाय रे पिया आहा रे आहा रे आहा रे पिया
काँटा लगा….”
क्षणभर ह्या गाण्याने विशेषतः त्या आवाजने माझं लक्ष वेधलं गेलं.
ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक चार वर घाईघाईतच पोहचलो होतो. सकाळी ८ वाजून २४ मिनिटाची ठाण्याहून सीएसटी कडे धावणारी लोकल आज फलाट क्रमांक १ वरून न जाता ४ वर येणार, असं ऐकताच दौडत दौडतच फलाट क्रमांक ४ गाठलं. तेंव्हा ह्या गाण्याचे बोल कुठूनसे कानी घूमघुमले. तेंव्हा सहजच अवती भोवती नजर हेरावली अन लक्ष त्या दोन मावशींकडे गेलं. ( वृद्धत्वाकडे हळूहळू झुकत चाललेलं . )
एका ठिकाणी निवांत बसून , त्या दोघी हि , ईअर फोन लावून मस्त गाणं म्हणत होत्या . सूर ताल लय आदी छेडत, अवतीभोवतीचं सारं धांवत वलय , त्याचं भान विसरत ….
”बंगले के पीछे तेरी बेरी के नीचे हाय रे पिया आहा रे आहा रे आहा रे पिया
काँटा लगा….”
मी क्षणभर पाहत राहिलो. न्याहाळत राहिलो. त्यांचं वय अन ते गाणं …
मनाशीच म्हटलं, बघ संकेत , ‘क्षणांना असेच कवेत घेऊन जगता आले पाहिजे.’ 
‘आनंद’ साजरा करायला वयाची अट नसते. ते ‘क्षण’ तेवढे पकडायचे असतात. आणि त्यात आपणहून मिसळायचं असतं.
असंच लिहता लिहता… 
– संकेत पाटेकर
२०.०१.२०१६

Leave a Comment

Your email address will not be published.

Translate »