‘आनंदाचं झाड’

‘आनंदाचं झाड’ होणं इतकं सहज सोपं नाही रे….त्यासाठी अपार त्यागाचे आणि सहनशीलतेची घाव झेलावे लागतात. पचवावे लागतात. त्याच रसिकतेने आणि आपलेपणाने …चेहऱ्यावरचा हास्य भाव कुठेही ढवळू न देता … न कळू देता . कळतंय ना ?

कुठल्या एका क्षणी … कुठेतरी ‘आपण कमी पडतोय’ हि भावनां उचल घेतेच, नाही असं नाही . 
तिथेही अपार कष्ट पडतात . पण सांभाळून घ्यावं लागतं. 
आपल्या मनाची हि असहायता ..होणारी चिडचिड…वेदना , कुठेशी दाबून ठेवावी लागते. 
स्वतःलाच… स्वतःहून आपण पुन्हा उभं करून घेत, स्वतःला.. प्रेरित करून घेत . कळतंय ?
हि सारी, 
रक्तमांसाने एक असलेली आणि प्रेम मनाने जवळ आलेली मंडळी…हि आपली माणसं, त्यांचा सुखाचा , त्यांच्या आनंदाचा, आपण एक भाग असतो रे , त्यासाठीच इतकं करणं तर आलंच ना ? आणि ते करावं लागतं , प्रेमासाठी….त्याच ओघवत्या आत्मीयतेने …
कळतंय ? 
एवढं तू करशील ना ?

थांब, ह्या सगळ्यात एक सांगायचं राहून गेलं बघ . . 
‘आंनदाच झाड’ होताना , आपल्या मनाचा रोख..आणि होणारी चिडचिड…त्याग हे कुणाला सहसा दिसून येतं नाही. 
तेंव्हा आणि तिथे हि स्वतःला सांभाळून घेणं हे… आलंच. 
.

.कळतंय ?

आलं ध्यानी?
Train Your mind to be calm in every situation.

– संकेत

 

Leave a Comment

Your email address will not be published.