कित्येक दिवस जागलेल्या वा पाहिलेल्या स्वप्नांचा क्षणात चक्काचूर व्हावा असे हि क्षण येतात आयुष्यात..
तेंव्हा आपण आपले कुठे असतो ? नसतोच कुठेही, आपण पुरते कोलमडलो, तुटतो आतून..तीळतीळ..

मुरलेल्या त्या जखमा, ते सारे क्षण ..पुन्हा उफाळून येतात वर, अंग अंग त्यानं थथरलं जातं. ओघळत्या आसवांचा जलाभिषेक होत जातो.
गहऱ्या विचारांची एकच धारा वाहू लागते.
हे असं का ?
अपेक्षांचं भार उतरवलं असतानाही, पुन्हा ठेच.? ती हि साधी सुधी नाही काही,
गहरी.. शुकशुकाट असलेल्या खोल दरी सारखी, एकलकोंडी. झोंबणारी, सळणारी,
विव्हळणं हे आलंच, आलंच ना..

वाहता खळखळत्या प्रवाहासारखं स्वतःला झोकावून दिलंस, मग हे होणं आहेच.
सावर आता पुन्हा,
जिथे आपल्या अस्तित्वालाच आता जागा उरली नाही, तिथे तू तरी का रुडावून बसतो आहेस.
मनाची नुसती अस्थिरता…तळमळ,.. घालमेळ..

आपलेपणाने स्वीकारलेली नाती खरंच आपली असतात का ?
मनाचा खेळ रे सगळा…

ज्याला आपल्या सोबत थांबायचंय ते थांबतील.
बाकींना आपण कसे रोखणार…?
सहवासाचा फुलोरा फुलवून .. अनपेक्षित वादळ वाट यावी तशी माणसं हि निघून जातात.
ठेच ह्याचीच लागते.
पण आपलेपणाच्या ओतीव स्पर्शामूळे, प्रेमाचा गर्भ जाणून , ते तेवढं ..
पेलायला आणि स्वतःला सावरायला हि शिकतो आपण..
आतून तुटलो, ठेचाळलो तरीहि..मनभर आपलेपणाचे भाव तसेच राखत…
-संकेत पाटेकर

Leave a Reply

Your email address will not be published.