….आणि मी प्रेमात पडलो.

….आणि मी प्रेमात पडलो.

सांजवेळ होती.मी माझी दुचाकी घेत रस्त्याच्या एका कडेने सरळ मार्गी जात होतो.
सूर्य मावळतीला त्याच्या परतीच्या मार्गी जाण्यास अतिशय व्याकूळ झाला होता.
त्याची चाललेली ती धडपड समोरच नजरेला भिडत मनाला चैतन्य बहाल करत होती.
त्याची सोनेरी तांबूस प्रकाश किरणे माझ्या अंगा खांद्यला छेदत रस्त्यावर विखुरलेल्या लाल मातीशी लगट करत होती.  त्यातच लहरी वारा हळुवार कानाशी गुंजत मनाशी संगीत खेळी करू पाहत होता.

रस्त्यावर तशी रहदारी न्हवती . तुरळक वाहनांची ये जा आणि एक दोन माणसे अधून मधून दिसत होती तेवढीच.

दुर्तफा झाडी आणि अधून मधून दिसणारी हिरवीगार शेतजमीने आणि त्यावर डोलणारी लुसलुशीत गवतांची पातं, त्या रमणीय वातावरणात मी माझ्या दुचाकीचा वेग थोडा कमी करत नजरेत ते सारे क्षण टिपून घेण्याच्या प्रयत्नात होतो.

तितक्यात नजरेतील प्रकाशकिरणे थेट एका सुंदर चेहऱ्याकडे खिळून राहिली. नेत्रपटला वरती ती सुंदर आकृती हळू हळू एकजूट होऊ लागली.

गहू वर्णीय गोलाकार चेहरा, काळे भोर सुंदर डोळे, त्या नजरेतील तिचे आदरयुक्त प्रेमळ भाव ,
पाहूनच मन वेडावलं.

पाणी भरावयास आलेल्या  विहिरीवरील काठाशी जमलेल्या अनेक मुलीन पैकी ती एक होती . सर्वात उठून दिसणारी. एक सुंदर गोड परी ….

तिच्यावरची नजर काहीकेल्या हटत न्हवती .माझी दुचाकी मात्र तिच्याच वेगेत पळत होती. थोड्या पुढे एका वळणावर उंचच उंच चहूकडे आपले बाहू पसरलेल्या त्या वृक्षाभोवती हळूच माझ्यासकट माझी दुचाकी आदळली. आणि खरच मी प्रेमात पडलो तो असा..

असच थोडा विरंगुळा..

– संकेत पाटेकर

Leave a Comment

Your email address will not be published.