‘आठवणी’ फोटोतल्या

ह्या फोटोंच बर असतं. ते कधी पहा..कुठे हि पहा.

त्यातले चेहरे बदलत नाही. चेहऱ्यावरचे हाव भाव बदलत नाही. त्या व्यक्ती बदलत नाही .
जे आहे ते आहे वर्षानुवर्ष तसंच ..बदल अजिबात नाही.
म्हणून ते पाहताना, गेलेले क्षण पुन्हा तसेच्या तशे नजरे समोर येतात.
अन आपण त्या हसऱ्या आठवणीत आपलं भान हरपून घेतो. मन स्वतःशीच प्रश्नोत्तराच खेळ खेळू लागतो.
किती हसरे क्षण होते ना ते ? किती सोनेरी दिवस होते ? काश ते दिवस ते क्षण पुन्हा बहरून आले तर…पण ह्या जर अन तर च्या गोष्टी कारण आपण वेळेसोबत पुढे आलेलो असतो.
काल बदलला असतो. परिस्थिती बदलेली असते. व्यक्ती व्यक्ती बदलेल्या असतात. पण आठवणी ह्या अश्याच अजूनही ताज्या टवटवीत.
मनाला प्रसन्न्तेचा लेप देत असतात.
– संकेत पाटेकर

२१.०२.२०१४

Leave a Comment

Your email address will not be published.