आठवणीतला एक दिवस आपला वाढदिवस

वर्षभरतला एकच असा दिवस असतो.

जिथे हृदयात घर केलेले , मनाने खूपच जवळ असलेले , पण जवळ असूनही अंतर राखून असलेले ,
वर्षभरात कधीही न भेटणारे , न बोलणारे , आपल्यावर नजर राखून चुपचाप राहणारे ,
मनात आठवण काढूनही संवाद न साधणारे , ओळखीचे , अनोळखीचे…नेहमीच सहवासात असणारे , सतत बोलणारे , दूर असूनही संवाद साधणारे ,मनाला ओढ लावणारे , प्रेमाने राहणारे…
आपली आवर्जून आठवण काढतात .  आपल्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी…..शुभाशिर्वादांसाठी …

एखाद SMS करून , किंव्हा फोनवर संवाद साधून किंव्हा प्रत्यक्ष भेटून …बोलून..

तो शुभदिन म्हणजे आपला वाढदिवस .  खरंच अश्यावेळी मन भरून येतं. …भरल्या आभाळागत …!
किती हे प्रेम !
सरत्या पावसाच्या सरींसारखं तन-मन अगदी भिजून जातं ह्या प्रेमाच्या वर्षावात .

नव्या आश्या , नव चेतना पल्लवित करतं. खरंच धन्यता वाटते मनाला ….एक दिलासा मिळतो एकप्रकारे .
तरीही त्यातल्या त्यात कुणी जिवाभावाचं राहीलच एखादं…तर मन खट्टू होतं. हे काही वेगळा सांगायला नको.

वाढदिवसाच्या आधीच पासूनच काहीएक दिवस एक चित्र डोळ्यसमोर उभं राहतं.
किंव्हा आपण ते रंगवलेले असत . अमुक अमुक अस असं होऊ शकतं .
किंव्हा व्हायला हवं. अन त्यानुसार आपण आनंदाच्या विविधरंगीत छटा आपल्या अंगा खांद्यावर खेळवत , इकडून तिकडे सैरवैर बागडत असतो.

वाढदिवसाच्या वेळी अश्या ह्या प्रेमळ शुभेच्छांचा वर्षाव होत असताना मन आनंदाच्या लहरी सुगंधामधे   स्व:तहा हरवून जातं .  कारण वर म्हटल्या प्रमाणे ……..

कधीही न बोलणारे , न भेटणारे , आपलेच जीवाभावाचे, आपली वर्षभरातुन एकदा का होईना आपली आवर्जून आठवण काढतात . हीच बाबा मनाला स्पर्शून जाते .
आयुष्यात दुसरं तिसरं अजून काय हवं असंत. प्रेमाचा एक चतकोर हि आनंद फुलवण्यास पुरेसा असतो.

असा हा आनंदाचा दिवस ….वर्षभरातून एकदाच येतो …आठवणीचा अन शुभेच्छांचा वर्षाव करत …

आपल्या आई वडलांची हि एक मोठी देणगीच आहे. त्यांचेच सर्वप्रथम चरण स्पर्श करत.

असंच लिहिता लिहिता..

आपलाच ,

संकेत य पाटेकर

२३.०७.२०१४

Leave a Comment

Your email address will not be published.