आठवणींच्या भावगर्दीत ..

आठवणींच्या भावगर्दीत’

किती हसरे असतात एकेक ‘क्षण’ न्हाई ….नजरेच्या आकंठ साठलेल्या भाव सागरात अन हृदयाच्या ध्यानस्थ मंदिरात , तिच्या व त्याच्या सहवासाने गंधित झालेले ते हसरे क्षण, एकदा का प्रवेश करते झाले कि ते अधून मधून मनाच्या तळघरात मिश्र भावनांचा, ‘ एकच हळवा ‘तवंग’ निर्माण करतात.

आठवणीच्या साच्याने , ‘ ज्यात आपण पुरतं आपलं देहभान हरपून जातो ‘.
तो जुन्या आठवणीतला अत्तरी रंग , सुगंधासह असा काही उधळला जातो कि डोळ्यातून क्षणभर अश्रू हि घळाळू लागतात .
कायssss कायsssss घडतं.  ह्या क्षणानुसार..

हि वेळ पुढे सरत जाते.  बदलाचे वारे वाहत जातात. माणसं माणसं बदलत जातात . 
अनुभवाने सिद्ध होतात. कुणी आधीपेक्षा अधिक कठोर तर कुणी हळवी अजून हळवी झालेली असतात. 
कुणी दूर तर कुणी हृदयाशी अजूनही जवळीक साधून असतात. . 
काहींच अजूनही त्याच शैलीतलं दिलखुलास बोलणं असतं,  भेटणं असतं. काहींच्या विचारांना अहंकारी लेप चढलेली असते. किंव्हा कुणाला आता आपणंच नकोस झालेलं असतो .
सांर चित्र पालटलेलं असतं. काही मात्र अजूनही तेच  पूर्वीसारखं भासतं.

 हसऱ्या क्षणांचा आठवणीचा तो ठेवा,  मात्र अजुनी तसाच टवटवीत अन प्रसन्नतेने सदा बहारलेला असतो. तो क्षणभर कवटाळून घ्यावा किंव्हा घटाघटाने पियुनी प्राशन करावा असं मनोमन वाटून जातं. अन त्यातच शब्दांचा फुलोरा ओठावर स्थिरावला जातो.
किती हसरे क्षण होते ते …जुन्या मैफलीतले, 
तो मोकळा संवाद,  तो हवा हवासा सहवास ..ती संस्मरणीय भेट !
निसटले सगळे….
आठवणीचा गंधित दर्प लेऊन ..!
 
– संकेत य पाटेकर 
 
 

Image by congerdesign from Pixabay

Leave a Comment

Your email address will not be published.