आक्रोश मृत्यूचा ..

आक्रोश मृत्यूचा ……..नि तो अखेरचा निरोप …!!

नेहमीप्रमाणे नि त्याच ठरल्या वेळेप्रमाणे मी ऑफिस ला पोहचलो.

आज मन जरा रंगातच होते ,अन उत्साही हि , त्याच उत्साहात ऑफिस मध्ये पाउल टाकले.
अन ऑफिस मधल्या माझ्या सहाकारयांशी गंमती जमतीत दम दाटी करत माझ्या जागेवर जाऊन बसलो . काही वेळेत कामाला हि सुरवात केली . नि बघता बघता घड्याळाचा तास काटा ११ वर स्थिरावला .
 नि तेवढ्यात मोबाईल ची रिंग वाजू लागली . तो call मी रिसीव्ह केला .

पण बोलणारे त्या शब्दांनी मनावर एकच आघात केला .  डोळ्यासमोर एक एक चित्र उमटू लागलं.
वर्तमानातून माझं मन भूतकाळात केंव्हाच गढून गेलं.
 आठवणी एक एक करून बाहेर पडू लागल्या.

ती व्यक्ती अन त्या व्यक्तीचा लाभलेला सहवास …….. मन खोल विचारात हरवून गेलं.

अनपेक्षितपणे काही घटना मनावर आघात करतात ..त्यात मृत्यू हा सर्वात मोठा आघात .

एखाद्या मनाला फार मोठा धक्का देऊन जातो तो

तो धक्का बसला ..त्या कॉल ने, त्या कॉल नन्तर लगेच ऑफिस मधून बाहेर पडलो एक ई-मेल करून…
 आज माझ्या सख्या आत्याच अकस्मात निधन झालं.

गत आठवणीच चित्र डोळ्यसमोर घेत मी भांडूप ला पोहचलो खरा .. पण मनात एक प्रकारे भीतीच सावट पसरल होत. भीती कसली तर …….

तो आक्रोश ते दु:खद हुंदके …….मला पाहवत नाही , ऐकवत नाही ……..

एखाद्याचे दु:ख तो आक्रोश ते अश्रू ..पाहवणार तरी कसे ………कुणाला

मृत्यू येतो नि जीव घेऊन जातो .
पण जाता जाता आजुबाजूच वातावरणात अश्रूमय दुखद हुंदक्यांनी अगदी ढवळून देतो .

सरणावरचे ते शांत देह निपचित पडलेलं असत काही वेळ , ‘ त्याला कसल्या आल्या संवेदना?
 पण तरी हि हे मन हे माहित असता म्हणत स्वतःशीच…

” अरे , नका अग्नी देऊ रे त्या देहाला” ..
किती त्रास होईल , चटके लागतील , भाजेल अंग ..कुणीतरी थांबवा हे …थांबवा हे …………..पाहवत नाही रे ..

पण देह तो शेवटी अग्नी मध्ये विलीन होतो …….नि अखेरचा निरोप घेतो .

काही दिवसा पूर्वीच घडलेली ती भेट ..शेवटी अखेरची ठरते .

संकेत य पाटेकर
मनातले काही
२४.०५.२०१३

Leave a Comment

Your email address will not be published.