किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग, डोंगररांग: पालघर
जिल्हा : ठाणे, श्रेणी :सोपी/मध्यम
बहुतेकांना अपरिचित , पण सुंदरसा ,सुखद अनुभव देणारा ,मुंबई ठाण्याहून एका दिवसात करता येईल असा हा छोटेखानी किल्ला . पावसाळ्यात चहूकडे हिरवाईचा रंग उधळत, आणि धुक्याचे पांढरे ओलसर थर …
स्वतःवर ओढवून घेत लपून बसतो . 
पण त्या मंत्रमुग्ध वातावरणाने स्वतःचे भान मात्र विसरायला लावतो, हे खर !!
(प्राचीनकाळी शूर्पारक, डहाणू , तारापूर, श्रीस्थानक/ स्थानकीय पत्तन (ठाणे), कालियान (कल्याण) इत्यादी बंदरातून मोठ्या प्रमाणात परदेशांशी व्यापार होत. या बंदरात उतरणारा माल विविध मार्गांनी देशावर जात असे. 
या मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी किल्ले बांधले जात. यापैकीच एक आसावा किल्ला…
 डहाणू व तारापूर बंदरांना देशाशी जोडणार्‍या मार्गांवर प्राचीन काळी बांधण्यात आला. 
( ट्रेकक्षितीज या वेबसाईट वरून घेतलेली माहिती)
ठाणे जिल्ह्यातील बोइसर हे एक महत्वाचे ठिकाण आहे . बोईसर ला उतरून , पुढे पाच दहा मिनिटे रस्त्याने चालत गेल्यास नवापूर येथे वारंगडे साठी दहा आसनी जीप मिळते . 
ती आपल्याला १५-२० मिनटा मध्ये विराज FACTORY च्या आधी आणून सोडते . 
तिथेच विराज FACTORY च्या आधी उजवीकडे वळणाऱ्या डांबरी रस्त्याने गडाकडे जाणारी वाट मिळते .
 
पुढे पाच- दहा मिनिटे चालत गेल्यास रस्त्याच्या वळणावर एक दुकान लागते .
त्याच्या थोड्या आणिक पुढे एक ओहळ पार करत, आपण मळलेल्या पाय वाटेतून चिखलाच्या थरांचे भार आपल्या पायंवर घेत पुढे जाऊ लागतो. 
आणि काही वेळेतच एका पुलापाशी येउन पोहचतो.  (येथेच थोड्या अंतरावर उजव्या हाताला अजून २ पूल आहेत . )  येथून असावा किल्याचे सुंदर दर्शन होते .
आपले मुख, दाट धुक्याच्या मखमली थराने झाकून घेत, तो जणू नवीन नवरी सारखा डोक्यावर पदर घेत लाजून बसलेला आहे , असे वाटू लागते .
असावा गड डावीकडे ठेवत, उजवीकडील मळलेल्या पायवाटेने एका डोंगराला वळसा घेत, धुक्याच्या पांढर्या दाट पट्ट्यातून, मोकळी वाट असलेल्या गर्द झाडीतून ,गारव्याच्या ओलसर सरी अंगावर घेत, एक दीड तासातच आपण गडाच्या माथ्यावर येउन पोहचतो. 
वर येतानाच तटबंदीची रूप रेखा आपल्यास नजरेस पडते. त्या तट बंदिवरूनच आपला गडावर प्रवेश होतो .
(गडाच्या माथ्यावर कातळात खोदलेली २ टाकी आहेत. किल्ल्याच्या दक्षिण टोकाला प्रचंड मोठे बांधीव टाकं आहे. 
या टाक्याची लांबी ५० फूट ,रूंदी २० फूट व खोली १५ फूट आहे. 
या टाक्याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या एका बाजूला कातळ आहे व उरलेल्या तीन बाजू घडीव दगडांनी बांधून काढलेल्या आहेत. टाक्याच्या पश्चिमेकडील भिंतीत टाक्यात उतरण्यासाठी पायर्‍या बनवलेल्या आहेत. 
 
कातळ उतरावरून येणारे पाणी टाक्यात जमा होण्यापूर्वी त्यातील गाळ निघून जावा यासाठी कातळात १ फूट व्यास व 6 इंच खोली असलेले वर्तूळाकार खड्डे कोरलेले आहेत. या टाक्याची भिंत फूटल्याने यात आता पाणी साठत नाही.
 
हे टाकं पाहून उत्तरेकडे चालत जातांना डाव्या हाताला पश्चिमाभिमुख प्रवेशव्दाराची जागा दिसते. 
प्रवेशव्दार व त्यापुढील देवड्यांचे अवशेष पहायला मिळतात. प्रवेशव्दारातून खाली उतरून गेल्यावर डाव्या बाजूस भिंतीचे अवशेष दिसतात तसेच कातळात खोदलेल्या काही पायर्‍याही पहायला मिळतात.
– ट्रेकक्षितीज या वेबसाईट वरून घेतलेली माहिती )
किल्ल्याचा माथा फार छोटा असल्याने , थोडा वेळ तिथे काढून , थोडी पेटपूजा करून , आपला परतीचा प्रवास सुरु होतो. पण अजूनही आपली गड फेरी काही संपलेली नसते . 
किल्ल्याच्या खालच्या बाजूस कातळात खोदलेली एक-दोन गुहा व टाकं आहे. 
साधारण अर्धा तास चालून गेल्यावर त्या नजरेस पडतात .
त्यासाठी बांधीव टाक्याच्या बाजूने खाली उतरून बारी गावाच्या दिशेला चालावे लागते.
ती गुहा पाहून आपली गड फेरी संपते . पुढे त्या गुहे जवळूनच , गर्द झाडीतून ,झर्याचा खळखलाट ऐकत, पावसाच्या रिमझिम सरी अंगावर झेलत , दगड धोंड्यातून मार्ग काढत , आपल्याच मनाशीच गुणगुणत आपण कधी मामाच्या गावात येउन पोहचतो ते कळतच नाही .
पण मामाच्या गावात पोहोचताच ओठातून ते बालपणीच काव्य हळूच बाहेर पडत आणि त्यावर… 
आपलं …तन मन सर्व त्या लयात नाचू लागतं.
झुक झुक झुक झुक,
आगीन गाडी,
धुरांच्या रेषा हवेत काढी
पळती झाडे पाहूया,
मामाच्या गावाला जाउया
जाउया मामाच्या गावाला जाउया ……!!
  
मामाच गाव म्हणजे एक RESORT आहे . येथे VALLEY Crossing हि करता येते , असा फलक जाता जाता दिसून येतो .
Picnic साठी म्हणून येथे लोकांच येणं जाणं सतत चालूच असत. पण येथे वरच किल्ला आहे , हे बर्याच लोकांना ठाऊक नसत . अन माहित असलं तरी किल्ले भेटीसाठी सहसा कुणी जात नाही . 
माझ्यासाठी हा खास ट्रेक होता, कारण ह्यापूर्वी कधी हि ट्रेकला न गेलेली , माझी खास गोड मैत्रीण स्नेहू , ह्या ट्रेकला आम्हां सोबत प्रथमच आली होती .ते ही मला न सांगता , न कळविता अचानक, surprise देऊन . त्यामुळे ट्रेकला खरी रंगत आली .
एकंदरीत ट्रेक खूपच मस्त झाला .
संकेत य पाटेकर
२४.०६.२०१३
प्रवास माहिती : आणि खर्च
पहाटे ५:३३ ची डोंबिवली – बोइसर ट्रेन :
तिकीट दर २५ रुपये प्रत्येकी .
ठीक ८:१० ला बोइसर रेल्वे स्थानक
(विरार ला हीच ट्रेन ७ ला पोहचते )
येथेच रेल्वे लगत एक restaurants आहे , तिथे पेट पूजा उरकून
पाच मिनटे रस्त्याने तसंच पुढे गेल्यास
नवापूर येथून वारंगडे साठी जीप मिळते .
प्रत्येकी १० रुपये सीट प्रमाणे .
१५-२० मिनिटा मध्ये मध्ये विराज FACATORY ,
तिथून पुढे चालत गडाचा माथा : १ ते दीड तास ,
गडाचा माथा फार मोठा नसल्याने , आणि इतक्या काही वास्तू नसल्याने गड पाहून लगेच होते .
१ ते दीड तास वर घालवल्यावर , परतीचा प्रवास
गडाच्या पोटात असलेल्या गुहा पाहत .दुसरया वाटेने, दीड -दोन तासात मामाच्या गावात उतरून .
तिथून मग पुढे एखादी जीप पडकून बोइसर …
काही क्षणचित्रे :-
विराज FACTORY कडून जाणरी वाट…

सुशांत नि स्नेहू ………..

वळणा वरचे दुकान …

छोटास ओहळ ..पार करत पुढे जाताना

चिखलात माखलेले माझे पाय…

एक सुंदर फोटो..

सुंदर मनमोहक दृश्य ..

विराज factory नि आसपासचा परिसर..

पाय वाटेची एक खून …मोठा दगड

आम्ही साद सह्याद्री ट्रेकर्स ..

भारं वाहताना , गावातले एक काका

Leave a Reply

Your email address will not be published.