असंच लिहिता लिहिता …

असंच लिहिता लिहिता …

वाऱ्याची एखादी हळुवार झुळूक क्षणभर सुखद गारवा देऊन जाते ना , तसेच काहीसे हे ‘क्षण’ असतात 
आपल्या आयुष्यातले…
हळुवार  कधी  कुठून,  गुपचूप  संधी साधून येतात अन तना  मनात रोमांच फुलवून जातात . 

मनी आसुसलेल्या  अपेक्षांची हि   पूर्तता  होवूनी जाते मग , सुखावून जातो अगदी त्या क्षणात आपण.

सुखाची एक व्याख्या तयार होते हळूहळू .. .
आनंदाच्या  परमोच्च शिखरावर ताठ मानेने , अभिमामाने आपण विराजमान होतो.
बेन्धुंद होतो बेभान होतो अगदी…

पण हे सगळ क्षणभर  ..क्षणभरच  सगळ…
वाऱ्याची झुळूक तेवढ्यापुरतीच  असते नाही का ? 
पुन्हा ती , कधी कुठून , कशी येईल त्याचा  नेम नाही …पण तोर्पयंत असंच, असंच  चालत राहायचं .
असंच  चालत राहायचं …

पण आपलं हे   मनं   ऐकेल  तेंव्हा.. .
ते एकच हेका घेऊन बसत .
जे हवं आहे ते कायम स्वरूपी …क्षणभरासाठी नको..

इथूनच  मग सुरु होते ..   मनाच्या वेदनेची कथा …

असंच लिहिता लिहिता …
आपलाच ,
संकेत पाटेकर
०१.०४.२०१५
_______________________________________________________________________
_______________________________________________________________________

काही जखमा ह्या वेदना विरहित असतात . त्या कधी आपलं व्रण सोडून देतात ते कळून येत नाही
रक्त ओघळलं  तरी त्याची जाणं होत नाही. पण जेंव्हा ते नजरेआड येतं  ,
तेंव्हा कपाळी प्रश्नार्थी आठ्या पडतात ? हे कधी झालं ? कस झालं ?कुठे झालं ?
शोधार्ती मनं मागोवा घेत राहतं.  पुन्हा ते   थांबतं.  
किंचितसं कळवळतं  . पुन्हा हसतं,  पुन्हा भरारी घेतं.

आयुष्यं  अश्याच जखमांच  एक गोफ आहे. काही जखमा अश्याच कळून न येणाऱ्या असतात .
त्याच काही वाटत नाही.  पण  काही  भरून न येणाऱ्या असतात …
पण प्रत्येकवेळी मनाला  भरारी घ्यावीच लागते .
रहदारीच्या ऐन रस्त्यावर माणसाच्या गर्दीत   कितीसा वेळ काढतो आपण , त्यातून मोकळी वाट काढावीच  लागते तेंव्हा कुठे मोकळा श्वास घेता  येतो . तसंच काहीसं  ….ह्या आयुष्याचं…

असंच काहीसं लिहिता लिहिता…
संकेत  पाटेकर
०३.०४.२०१५

Leave a Reply

Your email address will not be published.