नभा नभातुनी,
दऱ्या खोऱ्यांतुनी
गर्जितो माझा सह्याद्री !

दिशा दिशांना
साद घालूनी
पुलकित होतो सह्याद्री !

गड किल्ल्यांचा
रत्नमनी तो
अभिमान आपुला सह्याद्री !

महाराष्ट्राचा मुकुट
मनी तो
वेड आपुले सह्याद्री !
– संकेत पाटेकर

'सह्याद्री '

'मेल्यावर स्वर्ग दिसतं ' अस म्हणतात . पण आपल्या सह्याद्रीतल्या कुठल्याही गड किल्याच्या वा शिखराच्या माथ्यावर जा.. किंव्हा दऱ्याखोऱ्यातूनी भटका, स्वर्ग म्हणजे तरी नक्की काय? हेच का ते ? अशी अनुभती आल्याशिवाय राहणार नाही. सर्वत्र पसरलेली धुक्याची दुलई, त्यातून डोकावणारे पहाडी उंच कडे, अंग अंग भिडणारा बेभान वारा.. त्याचं तालमय संगीत, धरणी मायेने प्रेमाने पांघरलेली हिरवी शाल, कडे कपाऱ्यातुनी धो-धो उधळणारे शुभ्र धवल धबधबे..आपल्या नेत्र कड्यांचे पारणे फेडते. वाटतं तेंव्हा इथंच घर करून राहावं कायम .. - संकेत पाटेकर
नारळी पोफळीच्या सुंदर बागा, काजू – आमराईच्या वनात वसलेलं प्रशस्त टुमदार असं देखणं कौलारू घर. मोकळ्या अंगणी वर्षो न वर्षी खितपत पडलेली तरीही कोरडा घसा आजहि तितक्याच चवीनं ओलावणारी विहीर, फणसाच्या गऱ्या वाणिक गोड कोकणी माणसं. त्यांचे रसाळ मालवणी शब्द आणि जेवणात असेलली.. जिभेवर तासंतास रेंगाळणारी, पोट तृप्तीचा ढेकर देणारी चविष्ट अशी सोलकढी. ‘येवा कोकण आपलाच असा’ ….हे ब्रीद वाक्य खरंच इथे आल्यावर सार्थकी ठरतं. – संकेत य पाटेकर

जीवन हा एक प्रवास आहे. सुख दु:खाचा, गोड कटू आठवणींचा, प्रेमाचा आणि संघर्षाचा, उत्कट मोहाचा , आनंदाचा,
अश्या ह्या माझ्या प्रवासातल्या गोष्टी, काही कल्पित, काही माझे जीवनानुभव, मी तुमच्यापुढे ठेवत आहे.

मनातले काही

मी काही कवी नाही आणि लेखक हि नाही .
मला जसं सुचेल तसं लिहत जातो. मग कुठला लेख असो वा एखाद कविता वा चारोळी...
जे स्फुरत ते लिहायचं ..
असंच हे कवितेचं पान

कवितेचं पान

Quotes आणि बरंच काही ..

पुस्तकांच्या दुनियेत..( माझ्या शब्दातून )

वाचाल तर वाचाल..

Like.. share & Subscribe my channel

Click here

आणि फेसबुक पेज 'Like' करायला अजिबात विसरू नका.