माझा सह्याद्री ..आपला सह्याद्री ..

ह्या सह्याद्रीने खूप काही दिलंय …

त्यात सगळ्यात अनमोल अस काही म्हणायचं असेल तर मी म्हणेन  ..
कि हि जोडली गेलेली रत्नमाणिकांसारखे …..एक एक  माणसं.  
मग ती सह्याद्रीतल्या  नंद्वनात म्हणजेच ,  खेड्या पाड्यातून  …साधसं  जीवन  जगणारी ,
साधीशीच पण मनाचं  मोठेपण जपणारी  प्रेमळ माणसं  असतील किंव्हा
शहराकडून खऱ्या अर्थाने आपल्या  ह्या सह्याद्रीत मनसोक्त भटकणारी वा सह्याद्रीवर नितांत प्रेम करणारी ,
इथल्या जना मनांसाठी झटणारी , दुर्ग संवर्धनासाठी सतत कार्य करणारी ..हि  शहरी माणसं असतील.
दोन्ही हि तितकीच अनमोल प्रिय अन  जिव्हाळ्याची ..रत्नमाणिकं….
जी जोडली जातात. सह्याद्रीच्या प्रत्येक पाऊल वाटेवर ….

– संकेत पाटेकर 

१४..०६.२०१५ 

Leave a Reply

Your email address will not be published.