‘पाऊस मनातला पाऊस आठवणीतला’ भाग -२

‘पाऊस मनातला पाऊस आठवणीतला’ भाग -२ 

तसं ऑफिस मध्ये आज काही कामाचा  इतका ताण न्हवताच , त्यामुळे निवांत होतं सगळं ,  त्या निवांत क्षणातच पाचचा टोला वाजून गेला आणि त्या क्षणभरातच मित्राचा फोन खणाणला .

“अरे , बाहेर मस्त पाऊस आहे यार , चल जाऊ कुठेतरी. 

मी येतोय ठाण्यात . भिजूया मनसोक्त…मी म्हटलं ठीक आहे. ये ,भेटू  ठाण्यातच ..एवढंच बोलून आमच संभाषण संपलं . सहाच्या सुमारास मी ऑफिस मधून तडक बाहेर पडलो .

पावसाने आज चांगलाच झोडपलं  होतं . कालपासून त्याची रिपरिप सुरुच होती.सकाळपासून तो जरा रागातच बरसत होता जणू, त्यामुळे काही ठिकाणी पावसाच्या पाण्यानं तळ्याचं  स्वरूप प्राप्त झालं होतं .

रस्तोरस्ते , जागोजागो हि ट्राफिक  आणि  दुसरीकडे रेल्वेची नित्यनेहमीची दिलगिरी व्यक्त करणारी घोषणा सुरु होती.

लोकल ट्रेन हि  तुडूंब गर्दीने खचाखच्च भरलेली.  कसंबसं  त्या दिव्य गर्दीतून मार्ग काढत मी  ठाणे गाठलं. मित्र येण्यास अजून तरी पुष्कळ वेळ होता.

संध्याकाळचे साडे सात झाले होते.नित्य नेहमीची.. त्याची सांगून भेटण्याची वेळ आणि  प्रत्यक्ष येण्याची वेळ,  ह्यात  नेहमीच तफावत   हे जाणून मी ‘तलावपाळी’ मस्त एकाग्रचित्ताने न्हाहाळत बसलो.

तलावपाळी – ठाण्याचं वैभव :

पावसाळी तिचं रूप फारच मोहक अन तितकंच हुडहुडी आणणार होतं .एरवी रात्री उशिरापर्यंत प्रेमी युगलांनी गजबजलेलं हे ठिकाण (तलावपाळी)  आज मात्र तुरळक काहींनीच शांत पहुडलं होतं .

नियमित एकमेकांच्या हास्य खळीत , थट्टा मस्करीचा  साज चढवत , सुसंवादी मनानं , एकमेकांच्या हृदयाशी जोडणारे नाते संबंधित कट्टे , आज तसे रिकामेच दिसत होते.

कुठेशी झाडाच्या आडोश्याला मात्र काही प्रेमी युगलांचा  पावसाळी अधिवेशन भरलं होतं . ते अन त्यांचे चाळे (दुर्लक्ष करूनही) नजरेस येत अन मनातल्या मनात गुदगुल्या होत.

” साला आपलं नशिबाच खोटं ”  एक मुलगी  अजून पटत नाही. असा स्वर मनातल्या मनात उठाव करी आणि पुन्हा शांत होई .

ही वेळा तर कल्पनाच्या दुनियेत ते हरखून जातं . ह्या पावसाचं अन प्रेमाचं मनोमन चित्र डोळ्यासमोर  उभारून …

‘पाऊस’ कुणाला आवडतो तर कुणाला अजिबात आवडत नाही . कुणी त्यास शिव्या शाप देतो.कुणी त्याचं तोंडभरून कौतुक करतं . पण त्याला त्याची कसलीच देव घेव नाही.तो आपला त्याच्याच लईत  , त्याच्या स्वभावा हरकती नुसार  वावरत असतो.

कधी धो धो , कधी रिमझिम, कधी पाठशिवणीचा खेळ करत , तो आपल्या मनाशी प्रतीबिंबित होतो.

कधी कुणा काही न सांगता कुठेसा दूरवर निघून जातो. मनाची उत्कंठा वाढवत .प्रेमी युगालांच्या मनाशी तर त्याची विशेष अशी  छाप, त्यांच्या तो अगदी  जिव्हाळ्याचा विषय ..

गप्पांच्या ओघात,  नकळत कुठूनसा.. चोर पावलाने हळूच बरसणारा हा पाऊस,  वेडावून सोडतो. सुखद गोड आठवणी देऊन .नव्या हुरहुऱ्या स्पर्शाची एक वेगळीच जाणीव आणि व्याख्या देऊन जातो हा पाऊस ..

आडोसा मिळावा म्हणून घेतलेली धाव अन त्या नकळत झालेला हळुवार स्पर्श , त्या स्पर्शानं उसावलेला दीर्घ श्वास आणि शहारून आलेलं अंग, हि धुंदीच काही वेगळी, मादक, मदहोश करणारी…

कित्येकांच्या मनात पहिल्या पावसाची हि  सर आणि ह्या भाव टपोऱ्या आठवणी नव्याने फुलत असतील

आणि  आपण अजूनही तिच्या शोधात मात्र हिंडत आहोत.

कुठेशी जोरदार ठेच लागली .

स्वप्नांच्या कल्पिक दुनियेतून बाहेर येत ..कधी मी गडकरीला येऊन स्थिरावलो ते कळलेच नाही. मित्र अजूनही आला न्हवता .

पण ह्या पावसाने मात्र चांगलाच रंग भरला होता. तो बरसतच होता धो धो… धोधो, झिळमिल ताल सुरात…मनाला ओलं चिंब करत, सप्तरंगात न्हाहून देत .

@संकेत पाटेकर

फोटो गुगल साभार

Leave a Reply

Your email address will not be published.